युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा समोश्यांचा प्लॅन रद्द झाला.पण जेव्हापण करेन तेव्हा ईथल्या सल्ल्यांचा नक्कि ऊपयोग होईल.धन्यवाद सगळ्यांना.

समोसे कुर्कुरीत राहण्यासाठी तळणे ही महत्वाची कृती आहे. मंजुडीने सांगितल्याप्रमाणे पारीसाठी पीठ भिजवावे. कढईत भरपूर तेल समोसे बुडतील इतके तेल तापवायला ठेवायचे थोडे गरम झाल्यावर गॅस बारीक करायचा व समोसे टाकायचे तळून होईपर्यंत गॅस अजिबात मोठा करायचा नाही. वेळ खूप लागतो पण समोसे कुरकुरीत राहण्याची शंभर टक्के खात्री!:)

समोसा/कचोरी तळण्यातच मेख आहे.तेल गरम झाले कि त्यात समोसे/कचोरी सोडायचे.गॅस अगदी कमी करायचा.समोसा/कचोरी खालुन तळ्ला गेला कि वर येतो .त्यानंतरच तो उलटवायचा.पुन्हा मंद आचेवर छान होवु द्यायचा.कि कुरकुरीत्पणा येतो.

दक्ष, खायच्या आधी मावेमधे गरम करुन गार कर. परत क्रिस्प होतात. पण लागतील तसेच कर. एकदम करुन ठेवलेस तर परत सॉगी होतात. मी कालच उरलेले खाकरे संपवले आहेत, म्हणुन एकदम ताजा आणि सच्चा अनुभव आहे. Happy

तो कच्चा पाक असतो. फ्रीजमधे ठेवून वर जर काही जमले तर ते काढून, गाळून घेऊन.

चहासाठी वापरता येईल. सरबतही करता येईल,
पुडींगमधे, ब्रेडच्या जिलेबीत वापरता येईल.

दक्षीणा 'गुजराथी फुड फॅन क्लब' मध्ये मी लिहीलेली ही खालची पोस्ट कदाचीत तुला उपयोगी पडेल

माझ्या गुजराथी कलीगने आणलेला पदर्थ.
त्याच नाव विसरले पण लेफ्ट ओव्हर खाकरे आणि भाजलेले पापड (४/१ प्रमाणत) बारीक चुरा करुन घ्यायचेत. कढाइत अगदी थोड तुप गालुन हिंग जीरे घालुन वरचा चुरा घालुन कुरकुरीत होईपर्यंत परतणे वरुन चाट मसाला / लाल तिखट / जिरालू आपल्याला हव तस. मस्त लागत.

दक्ष, खायच्या आधी मावेमधे गरम करुन गार कर. परत क्रिस्प होतात. पण लागतील तसेच कर. एकदम करुन ठेवलेस तर परत सॉगी होतात. मी कालच उरलेले खाकरे संपवले आहेत, म्हणुन एकदम ताजा आणि सच्चा अनुभव आहे.
>>>

मला वाटलं माझ्याकडचे खाकरे मऊ झाले म्हणजे खराब झाले Uhoh
म्हणुन मी फेकून दिले काल Sad

मला Red Swiss Chard पण लाल माठासारखंच लागतं...म्हंजे हे तेच नसेल कदाचीत पण मी फक्त खायच्या उद्देशाने सांगतेय.... Happy

मला Red Swiss Chard पण लाल माठासारखंच लागतं>>मलाही.
नाहीतर red swiss chard वर भागवावं लागेल>>मी तेच करते.

अमरंथ म्हणजे आपला राजगिराच. कच्चा राजगिरा नेता आला आणि पेरता आला, तर त्याची रोपे सहज उगवतात.
अगदी आठ दहा रोपे उगवली, तरी मोठी पाने आणि जाड देठ, यामूळे भरपूर भाजी होते.
लाल माठाच्या बियाही, बाजारात मिळतात.

वाढदिवसाचा मोठा केक किंवा कपकेक्स आदल्या दिवशी बनवुन, फ्रॉस्ट करून, फाँन्डंट ने सजवून फ्रिज्मध्ये ठेवले तर चालतील कां? आणि कसे स्टोअर करावे? ते ड्राय जसे शिळे झाल्यावर होतात तसे होउ शकतात कां दुसर्‍या दिवसापर्यंत?

वाढदिवसाचा मोठा केक किंवा कपकेक्स आदल्या दिवशी बनवुन, फ्रॉस्ट करून, फाँन्डंट ने सजवून फ्रिज्मध्ये ठेवले तर चालतील कां? आणि कसे स्टोअर करावे? ते ड्राय जसे शिळे झाल्यावर होतात तसे होउ शकतात कां दुसर्‍या दिवसापर्यंत?

मनी, सध्या तिथले हवामान कसे आहे ? दमट नसेल तर केक एक दिवस बाहेरही टिकेल.
आयसिंग वगैरे बाहेरही सुकेल.
काही केक्स जरा शिळे झाल्यावरच चांगले लागतात. काही केक्सवर गरम असतानाच रम / सिरप ओतल्यास ते ओलसर राहतात.

दिनेशदा, मी जेव्हा केक करणारेय तेव्हा फार थंड वातावरण असेल मग फॉन्डण्ट ने सजवून केक बाहेरच ठेवू कां म्हण्जे फ्रिज्मधून बाहेर काढल्यावर केकला घाम येणार नाही की फ्रेश क्रीम्चे डेकोरेशन जास्त चांगले राहील? मधल्या लेयरसासाठी मी क्रीम चीज + फळाचा रस + जॅम लावायचा विचार कर्तेय.
मी माझ्या मुलीचा वर्षाचा वाढदिवस करणार आहे तर अजून काही कल्पना असतील तर प्लीज सांगा.

मनी केक बाहेर ठेवला तरी चालेल. आइसिंग जर फेश किमचे असेल, तर पार्टीच्या आधी २/३ तास करुन, मग फ्रीजमधे ठेवला तर ते घट्ट होईल. अंड्याचे आयसिंग असेल, तर बाहेरच ठेवावा लागेल, म्हणजे वार्‍याने ते सुकेल.

काळे चणे माऊ शिजण्या साठी काही युक्ती आहे का? माझे अत्तापर्यंत कधीच नीट शिजले नाहित (किती पण शिट्ट्या केल्या तरी Sad ).

करवंटीचा तुकडा घालायचा शिजवताना म्हणजे राजमा, छोले, वाटाणे असे शिजायला कठिण पदार्थ नीट शिजतात म्हणे. Uhoh (ही युक्ती कमलाबाई ओगलेंच्या पुस्तकात वाचली आहे.)
एक माझं ऑब्झर्वेशन मोठ्या आचेवर कोणताही पदार्थ शिजवायचा प्रयत्न केला की तो चिवट होतो किंवा डाडरतो. लो सिमवर पदार्थ छान मऊ शिजतात.

Pages