Submitted by पाषाणभेद on 15 June, 2011 - 00:14
देशभक्ती रचना: तिरंगी आमचा भारतीय झेंडा
तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू
प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू ||धृ||
कित्येक लढले याच्यासाठी
कितीकांनी दिधले प्राण
याच्याचसाठी कितीकांनी
फासात घातली मान
देवासमान हा आम्हास
त्याचा मान आम्ही राखू ||१||
क्रांतीकारी अन समाजसेवक
हाती घेवून जातसे चालत
शत्रूच्याही उरात बसती
उंच पाहून याला धडकी
न राहू मागे आपण
चला बळ तिरंग्याचे आपण दावू ||२||
युद्ध जरी हो आज नसले
भय देशावरी रोजच कसले
दहशत घालती दहशतवादी
फुकाची करती वादावादी
झाला तिरंगा निमीत्त केवळ
वाद सारे आता बाजू सारून देवू ||३||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
१५/०६/२०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
१५ ऑगस्टची किक फार लवकर लागली
१५ ऑगस्टची किक फार लवकर लागली की.
सुपर कविता. भारत माता की
सुपर कविता.
भारत माता की जय
अमोल केळकर
१५ ऑगस्टची किक फार लवकर लागली
१५ ऑगस्टची किक फार लवकर लागली की.
>>>
जामोप्या..
जामोप्या..