एका लग्नाची (लग्न ठरण्याची) गोष्ट
(इथे दिलेले संवाद आणि पात्र, जरी विसंवादी आणि वात्र असले तरी आमच्या समजूती प्रमाणे पूर्णत: काल्पनिक आहेत. त्याचा कुठल्याही चालू अथवा बंद आय डी अथवा बा.फ शी काडीचाही संबंध नाही. आणि जर तसला संबध कुणाला चुकून आढळलाच तर तो योगा योग किंवा दुर्दैवयोग समजावा)
.
आमच्या कथेत कुण्या एका मायबोलीकर तरुणाला कुणी एक मायबोलीकर तरुणी सांगून आलेली आहे. आणि त्या तरुणीच्याच घरी 'बघून घेण्याचा' कार्यक्रम चालू आहे
.
तरुण : नमस्कार
तरुणी : नमस्कार. तुम्ही काय करता ?
तरुण : वात्रटीका करतो, वाद विवाद आणि चर्चा करतो, भेंड्या लावतो
तरुणी : (थांबवत) म्हणजे पोटापाण्यासाठी काय करता ?
तरुण : पोटा पाण्या साठी कँटीन मध्ये जातो. नायतर भटा कडे जाऊन उसळ हाणतो
तरुणी : अगदीच बुवा तुम्ही 'हे'
तरुण : काय झाल ?
तरुणी : अहो नोकरी कुठे करता ? ते विचारतेय मी
तरुण : अस होय मी 'भविष्य निर्वाह निधी' मध्ये असतो. पण काम करतोच अस नाही (ही ... ही)
तरुणी : पूरे. तुम्हाला जेवण करता येत ? करता येत म्हणजे बनवता येत का विचारतेय. नायतर पून्हा पी जे माराल.
तरुण : जेवण ? नाय बूवा.
तरुणी : मग इतकी वर्ष मा.बो वर काय करताय हो? तूम्हाला स्वयंपाकचे कुठलेच बी बी माहीती नाहीत?
तरुण : म्हणजे माहीती आहेत. पण कधी प्रयोग नाही केलेत.
तरुणी : कस होणार बुवा तूमच आजच्या जमान्यात. बर सध्या कुठला आय डी चालवताय ?
तरुण : सध्या बघा (बोट मोडत) वाद विवाद साठी १, प्रतिक्रीया द्यायला २, भेंड्यासाठी १, गुलमोहरवर लिहायला १
तरुणी : (थांबवत) आय डी चालवताय का आग गाडी चालवताय हो? शी बाई किती हा फापट पसारा
तरुण : अरे वा 'फापट पसरा' हा मस्त आय डी आहे. समानतेवर वापरता येइल
तरुणी : आता बाई तुमच्या पुढे हातच टेकले. लग्ना नंतर असली थेर चालायची नाहीत. एक आय डी व्रतस्थ रहाव लागेल. चालेल?
तरुण : ठीक
तरुणी : आणखी एक लग्नानंतर तुम्ही मुलुंड बी बी वर येणार का मी पार्ला बी बी वर यायच ?
तरुण : काहीही चालेल. नायतर अस करू आपण ठाणे बी बी वर जाऊ. तिथे फारस कुणी नसत. चांगला एकांत मिळेल
तरुणी : चावट पणा नको
तरुण : 'चावट पणा' असला कुठलाच बी बी माझ्या माहीतीचा नाहीये
तरुणी : डांबरट पणा नको
तरुण : असलाही कुठलाच बी बी माझ्या माहीतीत नाहीये
तरुणी : आता जर का थांबला नाहीत ना तर. मी ऍडमीनना सांगेन. मग ते तुम्हाला चांगल्या कानपिचक्या देतील
तरुण : (घाबरून) नको नको. आधीच माझे दोन आय डी बंद झालेत
तरुणी : आत्ता कस वठणीवर आलात? सोनारानेच कान टोचावे लागतात.
तरुण : पण माझे कान तर ... (घाबरुन थांबतो )
तरुणी : आणखी एक
तरुण : काय ते ?
तरुणी : लग्न झाल्या नंतर पर स्त्री आय डी कडे वाकड्या नजरेन बघायच नाही अथवा पोष्टायच ही नाही. कबूल ?
तरुण : कबूल. सांगशील तर मी सरळ 'रोम प्रस्थाश्रमात' जाईन .
तरुणी : आणखी एक. दूसर्यांच्या खरडवहीत जाऊन आगाऊ पणा करायचा नाही. मान्य ?
तरुण : अरे बापरे. ही लग्नाची वचन आहेत का अणुकराराला पाठींबा देण्यासाठीच्या अमर-मूलायम अटी
तरुणी : (डोळे मोठ्ठे करुन) मान्य आहे का सांगा ?
तरुण : मान्य (न करून करतो काय बापडा. मोठ्ठे डोळे केलेत ते काय उगाच)
तरुणी : ह्म्म
तरुण मग हे देवी. मा बो वर येऊन मी काहीच करायच नाही काय?
तरुणी : नाही कस? सकाळी येऊन किनार्यावर सुप्रभात करायचा. दूपारी जाऊन पार्ल्यावर जेवणाचे पदार्थ टाकायचे. मग कुवेतवर जाऊन 'उद्या भेटूया मंडळी' असा सगळ्यांचा निरोप घ्यायचा.
तरुण : अरे वा. इतकी सगळी विधायक काम करायची मी ? ( दबलेला 'खोचक' स्वर )
तरुणी : आणि आठवड्यातून एकदा वाद विवाद आणि चर्चा वर जाऊन ' तूमच बरोबर आहे. तब्येतीत चालू द्या' किंवा ' ह्याला जवाबदार कोण ? ' अश्या अर्थाची प्रतिक्रीया टाकून यायची. जेणे करून ती प्रतिक्रीया नक्की आपल्या साठीच अस त्या बी बी वरील प्रत्येकाला वाटाव.
तरुण : आता माझी ही एक अट
तरुणी : अट ? (ऐकाव ते नवलच अश्या भावाची एक मुद्रा )
तरुण : नाय आपल विनंती विशेष ( रुबाबात चालणार्या बोक्याच्या पाठीत काठी बसल्यावर तो 'जितका' खंबीर आणि आत्म विश्वास पूर्ण दिसेल तितका खंबीर चेहेरा )
तरुणी : बोला
तरुण : काय नाय ते आपल हेच ते. आपली ही भेट कृपया तूम्ही 'कांदे पोहे अनूभव वर टाकू नका एवढच मागण. लय नाय मागण. हे एकच
तरुणी : इश्श
तरुण : (बावरुन) काय झाल ?
तरुणी : तुम्हाला कांदे पोहे द्यायचेच विसरले. हे घ्या ना. कसे झालेत सांगा ह ?
तरुण : (कांदेपोहे खात) सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात ... (थांबून) माफ करा ह. हल्ली कुणी प्रतिक्रीया विचारली, की अश्याच प्रतिक्रीया निघतात हो.
तरुणी : चालयचच.
तरुण : तुम्ही केलेत ?
तरुणी : नाही हो
तरुण : मग आईने तूमच्या ?
तरुणी : चक
तरुण : अरे बापरे मग बाबांना करायला लावलेत की काय ?
तरुणी : अगदीच बुवा तुम्ही 'हे'
तरुण : 'हे' म्हणजे ?
तरुणी : म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे, कुत्र्याचे कान आणि उंटाची मान
तरुण : छान आहे उद्याच बी बी वर टाकतो
तरुणी : कांदे पोहे 'गृहीणी भांडार' मधून आणलेत
तरुण : हो का छान (तरुण आपल्या घराजवळ 'गृहीणी भांडार' कुठे आहे ते आठवण्याचा प्रयत्न करतो) मग मुलगा पसंत आहे का?
तरुणी : (लाजत) होय (पार्श्वसंगीताला श्री. बिसमील्ला खानांची सनई वाजते )
(तर आमच (आमच म्हणजे आमच्या मायबोलीकरांच) जमलेल आहे.लग्नाचे स्थळ काळ आपणाला कळवण्यात येइलच. तेंव्हा समस्त माय बोली करांनी लग्नास येऊन दांपत्यास सढळ हस्ताने आशिर्वाद द्यावा ही विनंती. कळावे. लोभ आहेच. तो व्रुद्धींगत व्हावा. आपलाच एक इरसाल मायबोलीकर)
***************************************************************************************
समाप्त
लगे रहो ....
लगे रहो .... मस्त जमलयं ...
>>> अरे वा
>>> अरे वा 'फापट पसरा' हा मस्त आय डी आहे. समानतेवर वापरता येइल..... आणि आठवड्यातून एकदा वाद विवाद आणि चर्चा वर जाऊन ' तूमच बरोबर आहे. तब्येतीत चालू द्या' किंवा ' ह्याला जवाबदार कोण ? ' अश्या अर्थाची प्रतिक्रीया टाकून यायची. जेणे करून ती प्रतिक्रीया नक्की आपल्या साठीच अस त्या बी बी वरील प्रत्येकाला वाटाव.... सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात ... :हाहा::D
धमाल लिहीलयंस !
***
Twinkle twinkle little star
I don't wonder what you are
Studying your spectrum, ignorance I've none
You're not a diamond, you're just hydrogen.
सुरेख.
सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात ...
रुबाबात
रुबाबात चालणार्या बोक्याच्या पाठीत काठी बसल्यावर तो 'जितका' खंबीर आणि आत्म विश्वास पूर्ण दिसेल तितका खंबीर >>>>>

अप्रतिमच रे.
अरे वा 'फापट पसरा' हा मस्त आय डी आहे. समानतेवर वापरता येइल..... आणि आठवड्यातून एकदा वाद विवाद आणि चर्चा वर जाऊन ' तूमच बरोबर आहे. तब्येतीत चालू द्या' किंवा ' ह्याला जवाबदार कोण ? ' अश्या अर्थाची प्रतिक्रीया टाकून यायची. जेणे करून ती प्रतिक्रीया नक्की आपल्या साठीच अस त्या बी बी वरील प्रत्येकाला वाटाव.... सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात ...>>>.
सही!
सही!
----------------------
Invention requires an excited mind;
Execution, a calm one.
अजून येऊ
अजून येऊ द्यात!!!!

--------------
नंदिनी
--------------
सुरेख.
सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात .............
______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!
आमच्या
आमच्या शिवाय लाडु खाउ नका...................
नायतर अस
नायतर अस करू आपण ठाणे बी बी वर जाऊ. तिथे फारस कुणी नसत. चांगला एकांत मिळेल >>

सांगशील तर मी सरळ 'रोम प्रस्थाश्रमात' जाईन . >>
धमाल मजा आणलीस!! या लग्नाची पत्रिका पण लवकरच येऊ द्यात!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
धमाल
धमाल लिहिलेयस रे. मजा आली..
---नायतर अस
---नायतर अस करू आपण ठाणे बी बी वर जाऊ. तिथे फारस कुणी नसत. चांगला एकांत मिळेल >>
हो हो. उपवनला पाठवून देऊ दोघांना.:-P
केदार
केदार

ऑडीटची परीक्षा चालू असतानाही हे असलं बरं सुचतं एकेक.....
केदार
केदार आपल्याला आवडले, एकदम मस्त कल्पना आहे ही.
केदार सहीच
केदार सहीच ... ठाणे बीबी, रोम प्रस्थाश्रम, फाफटपसारा
================
नव्यानव्या दागदागिन्यांची ददात नाही तुला तरी
कशास देहावरी जुने चांदणे मिरवतेस ... सांग ना!
सुखात आहेस ऐकतो...
-एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!
सुरेख.
सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात ...
केद्या
केद्या जिंकलस मित्रा
कसले भारी कांदेपोहे रे हे
असेच लग्न समारंभापर्यंत पोहोचा ! 
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
>>> आणखी एक
>>> आणखी एक लग्नानंतर तुम्ही मुलुंड बी बी वर येणार का मी पार्ला बी बी वर यायच ? >>>
केदार
केदार तोडलस मित्रा,
सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात ...
सहीच........
सहीच........
आय डी
आय डी चालवताय का आग गाडी चालवताय हो?
अरे वा 'फापट पसरा' हा मस्त आय डी आहे. समानतेवर वापरता येइल
अरे बापरे. ही लग्नाची वचन आहेत का अणुकराराला पाठींबा देण्यासाठीच्या अमर-मूलायम अटी
सुरेख. अप्रतिम. लाजवाब, अजून येऊ द्यात ... (थांबून) जल्ला अजून येऊ द्यात... :d :d :d
अजुन
अजुन खरोखर येउन्द्यात. म्हण्जे कांदेपोहे झालेत, आता साखरपुड्याची खरेदी ते थेट मांडव चुकवेपर्यंत लग्नाची हकीकत बयाज्वार येउदेत.
जबरी रे..
जबरी रे..

मस्तच .........
मस्तच .........
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Dream is not what you see in sleep
But it is the thing which does not let you sleep
खी खी खी लै
खी खी खी लै भारी
(No subject)
वा! पण आता
वा!
पण आता खरच कुणी 'फापट पसारा' आय डी घेतला तर?? 
पण आता खरच
पण आता खरच कुणी 'फापट पसारा' आय डी घेतला तर??>>>>>>>>..
तर आपण समजुन घ्यायच ही गोष्ट कोणाची होती
खि खि खि खि
खि खि खि खि ... सहि रे !
परागकण
धन्यवाद
धन्यवाद मंडळी
हे हे हे, ते
हे हे हे, ते कांदापोहे अनुभव बीबीची भीती मस्तच!
Pages