Submitted by प्रविण मारुती भिकले on 12 June, 2011 - 08:10
निवडनुकांत केले मतदान
बाळगुण विकासाची आशा नेत्यांच्या उराशी
आमच्या मतांवर बांधले त्यांनी बंगले
म्हणून उघड्यावर राहतोय हा आदिवासी
गावागावात शाळा अनेक जाहल्या
वाटल शिक्षणा तू मला अंधाराकडून प्रकाशाकडे नेशी
पण अजुनही कचरतोय शाळेत पाठवायला मूल मुलीना
म्हणून अशिक्षित राहिला हा आदिवासी
आमच पोट आहे मजुरिवर
संबंध फ़क्त नावापुरता सरकारी धान्याशी
हजारो टन धान्य सडतय सरकारी गोदामी
तरीही उपाशी राहिला हा आदिवासी
सरकारी दरबारात मान फ़क्त builder loby ला
तिथे सदैव नांदत असते थैलिशाही
मला अन्यायाची जाणीव होउनही मी लढत नाही
म्हणून आजही दरिद्र्यात जगतोय हा आदिवासी
नेत्यां कडून तर नेहमीच चालू आहे आमची अवहेलना
मग आता आशा बाळगू कुणापाशी
नक्षाली पण घेताहेत आमचेच बळी
मग असाच मरत राहिल का हा आदिवासी ?
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
(No subject)
गावागावात शाळा अनेक
गावागावात शाळा अनेक जाहल्या
वाटल शिक्षणा तू मला अंधाराकडून प्रकाशाकडे नेशी
पण अजुनही कचरतोय शाळेत पाठवायला मूल मुलीना
म्हणून अशिक्षित राहिला हा आदिवासी
मला अन्यायाची जाणीव होउनही मी लढत नाही
म्हणून आजही दरिद्र्यात जगतोय हा आदिवासी >>> अनपेक्षित जळजळीत वास्तव..!
सुंदर कविता.. ! आवडली