Submitted by चातक on 5 June, 2011 - 11:13
***
फेर धरला वार्याने दाटुनी आले आभाळं
मळभ साचला वातावरणी, धावुनी आली शितलहर
सोसाट्याच्या वार्याने उडाले छत बावरुन
धुळ्-केराने घेतल्या गिरक्या
झाडे-झुडुपे.. नतमस्तक...
पाहुनी नभी अवाढव्य काळे हत्ती
प्राणी मात्रांत पसरली एक भिती
अकस्मात हे आज घडले
सुर्याने ही तोंड लपविले
भरदुपारी अंधारुन आले
होते नव्हते सगळे धावपळीला लागले..
विद्युलता ती कसली भिती तिज
काळ्यामधुनी ती 'शुभ्र' चमकली
मेघांच्या गर्भातुनी, अवकाशाच्या कवेतुनी
माणिक-मोत्यांची क्षणांत तिने सुटका केली...
पाहताक्षणी 'धरे'ला त्यांनी घर आपले ओळखिले
स्वःअस्तित्त्व त्या मोत्यांनी या मातीला समर्पिले
दरवळ दरवळ दरवळीले
चैतन्य चौफेर उधळीले
मातीतुनी आज मिठागर
गोड हासले..
आज 'सागर' गोड जाहले..
***
- चातक. ०५०६२०११
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
गौड
गौड
छान.
छान.
छान आहे
छान आहे
मस्ताय! पु.ले.शु.
मस्ताय!
पु.ले.शु.
जियो प्यारे.....
जियो प्यारे.....
प्रोत्साहनासाठी सर्वांचे
प्रोत्साहनासाठी सर्वांचे मनापासुन धन्यवाद!
ऐ खूपच छान रे... मी मिसलं
ऐ खूपच छान रे... मी मिसलं असतं हे ..धन्स!!!
चातका, मस्त. मी हे पाहिलच
चातका, मस्त. मी हे पाहिलच नव्हतं
छान जमली
छान जमली
जियो यार
जियो यार
आज आम्ही "धन्य" जाहलो.
आज आम्ही "धन्य" जाहलो.
चातका जमलीय रे..!
अकस्मात हे आज घडले सुर्याने
अकस्मात हे आज घडले
सुर्याने ही तोंड लपविले
भरदुपारी अंधारुन आले
होते नव्हते सगळे धावपळीला लागले..
चातकजी,
वाह ! क्या बात है !
सब भगवान कि लीला है !
दखल घेतल्या बद्दल आभार
दखल घेतल्या बद्दल आभार लोकहों...
वा रे वा रे वा रे, व्वा! लईच
वा रे वा रे वा रे, व्वा!
लईच आवडली...
Specially,
<पाहताक्षणी 'धरे'ला त्यांनी घर आपले ओळखिले
स्वःअस्तित्त्व त्या मोत्यांनी या मातीला समर्पिले
दरवळ दरवळ दरवळीले
चैतन्य चौफेर उधळीले
मातीतुनी आज मिठागर
गोड हासले..
आज 'सागर' गोड जाहले.. >
मला पण लईच आवडेश..:स्मितः
मला पण लईच आवडेश..:स्मितः
मस्तच....
मस्तच....
पुन्हा एकदा.... छान आहे टेक
पुन्हा एकदा.... छान आहे
टेक केअर !!
मस्तच!!!
मस्तच!!!
दरवळ दरवळ दरवळीले चैतन्य
दरवळ दरवळ दरवळीले
चैतन्य चौफेर उधळीले
मातीतुनी आज मिठागर
गोड हासले..
आज 'सागर' गोड जाहले.>>>
सुंदर
धन्यवाद मंडळी .... किर्या
धन्यवाद मंडळी ....
किर्या
मातीतुनी आज मिठागर गोड
मातीतुनी आज मिठागर
गोड हासले..
आज 'सागर' गोड जाहले.. >>>> खरच भरुन आले.....छान कल्पना!!
"माणिक-मोत्यांची क्षणांत तिने
"माणिक-मोत्यांची क्षणांत तिने सुटका केली...
पाहताक्षणी 'धरे'ला त्यांनी घर आपले ओळखिले
स्वःअस्तित्त्व त्या मोत्यांनी या मातीला समर्पिले"
"आज मिठागर
गोड हासले..
आज 'सागर' गोड जाहले"
या संकल्पना खरंच छान आहेत.
तु कविता करतोस हे माहितच
तु कविता करतोस हे माहितच नव्हतं. छान आहे.
दरवळ दरवळ दरवळीले
चैतन्य चौफेर उधळीले >>> या ओळी विशेष आवडल्या. त्या 'दरवळा'च्या रिपिटेशनमुळे वेगळाच फिल आला आहे. नाकभरुन पहिल्या पावसाच्या मातीचा वास भरुन घेतल्यासारखं.
छान कल्पना,आवडली.
छान कल्पना,आवडली.