प्रथम शिंगाळ्याची अंडी घडातुन बाहेर काढुन सुट्टी करुन घ्यावीत व स्वच्छ धुवुन घ्यावीत.
ही स्वच्छ धुतलेली अंडी एका भांड्यात पाणी ठेउन, हिंग, हळद मिठ घालुन शिजवावी. कडक झाली म्हणजे शिजली असे समजतात. ही अंडी अशिच उकडूनही खातात. लहान मुले ही अंडी अशिच उकडून खातात असे कोळीण सांगत होती. आत पुर्ण कडक पिठुळ चविच मांस असत. ही नुसती खाउन मजा नाही आली म्हणुन मग मी त्याला कांद्यावर परतली.
तेलावर कांदा परतवुन त्यात हिंग, हळद मसाला घातला मग त्यात टोमॅटो किंवा काहीतरी थोडे आंबट घालुन अंडी टाकली. वरुन गरम मसाला, मिठ, कोथिंबिर टाकुन एक वाफ आणुन थोड परतुन गॅस बंद केला. झाली मसालेदार अंडी तय्यार.
शिंगाळा ह्या माश्याच्या पोटात ही अंडी सापडतात. अंड्यावरुनच हा मासा मोठा असतो हे समजत. त्या माशाचेही कालवण करतात तो मिळाल्यावर देते रेसिपी.
ह्या अंड्यांची भजी पण करतात.
ही अंडी डाररेक्ट तव्यावर टाकु नयेत तळण्यासाठी नाहीतर टणाटण उडतात घरामध्ये व सगळीकडे पसरतात. माझ्या सासर्यांनी माझ्या लग्नाच्या आधी हा प्रयोग केला होता आणि अंडी घरभर पसरली होती असे सगळे सांगतात. प्रात्यक्षिक पाहायला मी नव्हते. त्यानंतर परत घरात ही अंडी आणली नव्हती.
बापू, कॅव्हियर म्हणजे अंडीच
बापू, कॅव्हियर म्हणजे अंडीच असतात. पण ती खास माश्याच्या पोटातून मिळतात. ती शिजवत नाहीत. काळ्या मोत्यासारखी दिसतात आणि खुप महाग असतात. त्याला पर्याय म्हणून रो Roe नावाची वेगळ्या जातीच्या माश्याची अंडी पण खातात. ती केशरी रंगाची असतात.
सोन्याबापू कॅस्पियन
सोन्याबापू
कॅस्पियन समुद्रात आढळणार्या स्टर्जन प्रकारातल्या माशांच्या ( Beluga, Ossetra and Sevruga) अंड्यांना कॅव्हिआर म्हणतात.
रो म्हणजे कुठल्याही माशाची गाभोळी . सामन माशांची अंडी सामन रो नावाने विकतात. जपानी रेस्टॉ मधे काही प्रकारच्या रोल्स वर फ्लायिंग फिश एग्ज किंवा फ्लायिंग फिश रो म्हणून आढळतात . नॉर्वे व आसपासच्या देशात कॉड माशांची अंडी कॉड रो म्हणून स्प्रेड/ डिप्स मधे वापरतात. ग्रीक लोकांचे कॉड किंवा कार्प माशांच्या अंड्यापासून बनवलेले taramosalata नावाचे स्प्रेड सुद्धा इथे बरेच पॉप्युलर आहे.
इतर समुद्रातल्या स्टर्जन किंवा इतर माशांची अंडी कॅव्हिआर सब्स्टिट्युट म्हणून विकतात.
कॅव्हिआर आणि रो म्हणजे हापूस आणि आंबा यासारखे समजा
अग्गोबाई....जागुले...काय गं
अग्गोबाई....जागुले...काय गं हे? काय काय एकेक नवीनच करत असते ही!
हो पण कथा कादंबर्यांमधे वाचलेली कॅव्हियर्स / गाबोळी हीच ती बहुतेक!
Pages