मासे ३०) शिंगाळ्यांची अंडी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 June, 2011 - 04:10
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

शिंगाळ्यांची अंडी
हिंग, हळद
मसाला
१ कांदा बारीक चिरुन
मिठ
कोकम्/टोमॅटो किंवा चिंच
थोडासा गरम मसाला.
थोडी चिरलेली कोथिंबिर
तेल

हा आहे शिंगाळ्याच्या अंड्यांचा घड

क्रमवार पाककृती: 

प्रथम शिंगाळ्याची अंडी घडातुन बाहेर काढुन सुट्टी करुन घ्यावीत व स्वच्छ धुवुन घ्यावीत.

जवळून मोतीच वाटतात ना ?

ही स्वच्छ धुतलेली अंडी एका भांड्यात पाणी ठेउन, हिंग, हळद मिठ घालुन शिजवावी. कडक झाली म्हणजे शिजली असे समजतात. ही अंडी अशिच उकडूनही खातात. लहान मुले ही अंडी अशिच उकडून खातात असे कोळीण सांगत होती. आत पुर्ण कडक पिठुळ चविच मांस असत. ही नुसती खाउन मजा नाही आली म्हणुन मग मी त्याला कांद्यावर परतली.

तेलावर कांदा परतवुन त्यात हिंग, हळद मसाला घातला मग त्यात टोमॅटो किंवा काहीतरी थोडे आंबट घालुन अंडी टाकली. वरुन गरम मसाला, मिठ, कोथिंबिर टाकुन एक वाफ आणुन थोड परतुन गॅस बंद केला. झाली मसालेदार अंडी तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
तुमच्या आवडण्यावर आहे.
अधिक टिपा: 

शिंगाळा ह्या माश्याच्या पोटात ही अंडी सापडतात. अंड्यावरुनच हा मासा मोठा असतो हे समजत. त्या माशाचेही कालवण करतात तो मिळाल्यावर देते रेसिपी.

ह्या अंड्यांची भजी पण करतात.

ही अंडी डाररेक्ट तव्यावर टाकु नयेत तळण्यासाठी नाहीतर टणाटण उडतात घरामध्ये व सगळीकडे पसरतात. माझ्या सासर्‍यांनी माझ्या लग्नाच्या आधी हा प्रयोग केला होता आणि अंडी घरभर पसरली होती असे सगळे सांगतात. प्रात्यक्षिक पाहायला मी नव्हते. त्यानंतर परत घरात ही अंडी आणली नव्हती.

माहितीचा स्रोत: 
कोळीण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा.. एवढी मोठी अंडी माशाच्या पोटात???? बाजारात कोळणी बहुतेक राखीव ग्राहकांनाच देत असणार.

यांना इंडियन कॅव्हीयर म्हणायला हरकत नाही.

सुरुवातीची अंडी द्राक्षांसारखी व तयार प्रॉडक्ट छोल्यांसारखं दिसतंय.

अंडी, गाबोळी खाण्यासाठी वापरणे, प्रेग्नंट मासे खाणे ह्यात चवीचा भाग आहे पण त्याबरोबरच त्यांची संख्या कमी व्हायला हातभार लागतो आहे. ब्रीडिन्ग सीजन मध्ये तरी त्या माश्यांना मोकळेसोडले पाहिजे. किती मेहनतीने हे प्राणी प्रजोत्पादन करतात ते खाल्लेच पाहिजे का? अश्यानेच स्पेशीज हळू हळू एंडेंजर्ड होतात व मग नाहिश्या. कोळीणीचे शिक्षण करायला हवे. ते लोक त्यांच्याच पोटावर गदा आणत आहेत.

---------------------
माश्यांच्या वतीने.

अश्विनिमामी तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे.गाबोळ्यांना जास्त भाव येतो म्हणून ते त्यांचा स्वार्थ बघणार ह्यात प्रश्नच नाही. पण मासे पकडणार्‍या कोळ्यांना ते प्रेगनन्ट आहेत की नाहीत हे पकडत्यावेळी दिसतच नसणार. हे मासे डिप सी मध्ये असतात शिवाय जाळ्यात एकाच वेळी सगळे अडकतात मग ते कसे निवड करणार ?

सुरुवातीची अंडी द्राक्षांसारखी व तयार प्रॉडक्ट छोल्यांसारखं दिसतंय. >>> अगदी अगदी.

अमा, Happy

जागू, तुझेही म्हणणे बरोबर आहे. एकावेळी जाळ्यात भरपूर मासे मिळत असणार. त्यातले प्रेग्नंट शोधून परत पाण्यात टाकेपर्यंत ते आधीच रामनाम सत्य...

हे मासे डिप सी मध्ये असतात शिवाय जाळ्यात एकाच वेळी सगळे अडकतात मग ते कसे निवड करणार ? >> ब्रीडिन्ग सीझन हा वर्षानुवर्षे सेम आहे. निसर्ग चूक करत नाही. जगभरात बर्‍याच ठिकाणी स्पेशल झोन्स मध्ये अगदी टूरिस्टना पण परवानगी नसते या सीझन मध्ये त्यांना डिस्टर्ब करायला. डीप सी फिशिन्ग मुळे जगातील खूप सार्‍या माश्यांच्या जाती प्रजाती धोक्यात आल्या आहेत. टर्टल्स व इतर खाण्यायोग्य नसलेले मासे व प्राणी पण त्या जाळ्यात येतात. त्या दोन महिन्यांसाठी फिशिन्ग ला बंदी करणे शक्य आहे पण मग पैसे कसे कमविणार कोळी. some day karma will catch up with them.
http://www.grida.no/publications/rr/in-dead-water/page/1251.aspx

जागू, हे मला अनोखे. हा मासा कसा असतो, ते नक्कीच बघायला आवडेल. सामनची अंडी एवढी मोठी असतात. कॅव्हीयर मात्र लहानच असतात. रो, तर अगदी मोहरीएवढीच असतात.

अश्विनी म्हणते ते बरोबर आहे. म्हणून तर पावसाळ्यात मासेमारी बंद ठेवत असत. पण आता पावसाळ्यातही, ट्रॉलर्स घेऊन जातात.

हो अश्विनी तेही कारण असेल. पण आमच्याइथे तर जुन्-जुलैच्या दरम्यान मासेमारी बंद असते. टोलर धक्याला लागलेले असतात.

दिनेशदा हा आहे शिंगाळ मासा.
shingala.JPG

या माशाला खुप वास येतो म्हणुन बरेच जण खात नाहित.
http://fisheries.adfmaharashtra.in/index.php?option=com_joomgallery&func...

या लिंक वर जागू ने लिहलेल्या बहुतेक माशांचे फोटो आणि मराठी नावं सापडतील

हा वेगळाच मासा जागू. मी नाही कधी बघितला.

ऑक्टोपसची अंडी पण अशीच दिसतात पण जरा लंबगोल असतात. समुद्राच्या तळाशी ती मादी, एक कपार शोधते आणि त्याच्या वरच्या बाजूला ती अंडी घालते. (हजारो) त्या अंड्यांची देखभाल करत ती तिथेच थांबते. या अंड्यांवर ती अक्षरशः मायेची फुंकर घालत असते. तसे केले नाही तर त्या अंड्यांवर जिवाणूंचा हल्ला होउ शकतो. ती तेवढा काळ उपाशीच राहते. तिच्या अथक प्रयत्नांना यश येऊन, त्या अंड्यातून अगदी छोटे ऑक्टोपस बाहेर येतात पण त्या पुर्वीच तिने शेवटचा श्वास घेतलेला असतो.... या सर्वाचे मन हेलावणारे चित्रीकरण अटेंबरोंच्या लाईफ, या सिरिजमधे आहे.

अश्विनीमामींनी लिहिलेला मुद्दा बरोबर आहे. पण माशांच्या प्रजोत्पादनामध्ये त्यातली बरीचशी अंडी इतरांच्या भक्ष्यस्थानी पडणार हे गृहीत धरुनच अंड्यांची संख्या ठेवलेली असते.

माशांची संख्या घटण्याची इतर अनेक कारणेही आहेत, त्यातले नदी/समुद्रात सोडण्यात येणारे दुषित पाणी हे सगळ्यात महत्वाचे आहे. भारतात सण/उपासतापास इ. गोष्टी निसर्गाचा विचार करुनच तयार केलेले होते पण आता कोणीच असल्या गोष्टींना भाव देत नाही. बाजारात बाराही महिने सगळॅ येते आणि लोक खातातही. १० वर्षांपुर्वी पावसाळ्यात जेमतेम मासे मिळायचे. आता बाजार भरलेला असतो. अर्थात कोल्डस्टोरेजमधलेही मासे येतात पावसाळ्यात.

some day karma will catch up with them.

हे काय नविन मामींच्या तोंडून. कर्मावर विश्वास कसा काय???

जागु ही अंडी वाटतंच नाहीत, चक्क द्राक्षासारखी दिसतायंत.. Happy
कित्ती नविन नविन रेसिप्या येतात नै तुला? Happy

साधना आणि अग ही माश्यांची अंडी रुजुन त्यातून पिल्ल बाहेर आलीकी इतर मोठे मासेही गिळतात त्यांना.

अखी नाही ग ही वेगळी ठेवतात विकायला. मासा वेगळा ठेवतात.

दक्षे मग द्राक्ष समजुन खाउ शकतेस तु.

केवढी मोठी अंडी आहेत ती. कोंबडीच्या अंड्यात जसा पिवळा बलक आणि पांढरा भाग असतो तसे माश्याच्या अंड्यात असते का?
आम्हा शाकाहारी लोकांना भलत्याच शंका Proud

जागू त्या अंड्यांबरोबर दुसरे काहीतरी जसे नाणे इ. ठेव ना म्हणजे त्यांची साईज नक्की किती ते कळेल.
इथे साल्मनची अंडी मिळतात आणि ती कच्ची ही खातात. सुंदर केशरी लाल रंगाची दिसतात. पण मी कधी खाऊन बघायचा धीर केला नाहीये.

मॉ.गॅ. वापरुन हव्या त्या रंगाची, हव्या त्या स्वादाची "अंडी" तयार करता येतात. सावली, अश्विनी खास आपल्यासाठी सोय आहे ही !!

शिंगाला नवरा झायलाय गो
कोलबी नवरी झयली गो बाय............

जागुतै आणि अकेतै... अंडी भेटली तरी ठीक... नाही तरी ठीक... जी प्रजाती नष्ट व्हायची आहे ती देवाच्या अवकृपेने नष्ट होइलच.... खाल्ली तरी नाही खाल्ली तरी.

जगुतै खरेच वितभर शिंगाड्यातही गाभोळी मिळण्याची शक्यता ५०% असते...

चातक गाण्याची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

रुनी नाही कोंबडीच्या अंड्यासारखा ह्यात पिवळा पांढरा बलक नसतो.

सावली साधारण गोटीपेक्षा थोदी लहान साइझ असते ह्या अंड्यांची.

दिनेशदा Happy

प्लेटवरुन अंदाज येतोय आकाराचा. मला परत परत आश्चर्य वाटतेय एवढी मोठी अंडी माशाच्या पोटात. सामान्यतः खसखशीपेक्षाही लहान अंडी असतात माशाची. जॅग्स, मला एकदा दाखव ग शिंगाळ्याची अंडी.

http://dsc.discovery.com/videos/life-flying-fish-fly.html

साधना / जागू वरच्या लिंकवर उडणार्‍या माशांचा व्हिडीओ आहे तो बघाच. या चित्रीकरणाच्या वेळी, ती झावळी बुडाल्यावर या माश्यांनी चित्रीकरण करणार्‍या टिमच्या बोटीवरच अंडी घालायला सुरवात केली. त्या टीमला तिथून पळून जावे लागले, नाहीतर या अंड्यांच्या वजनाने त्यांची बोट बुडण्याच्या धोका निर्माण झाला होता.
या भागाचे चित्रीकरण, याच सिरीजमधे, ऑन द लोकेशन, विभागात आहे.

जागु तै, कव्हियार म्हणतात ते असलेच असते काय हो?? ही अंडी रॉ म्हणजे कच्चीच खारवुन वगैरे खाता येतील का??

Pages