व वि सां का: 'दिवस जुळ्यांचा' आणि 'जोडीने ओळख'

Submitted by ववि_संयोजक on 9 July, 2008 - 05:30

'दिवस जुळ्यांचा' आणि 'जोडीने ओळख'

काळी जीन्स, काळा गॉगल, काळा टी शर्ट, काळा वर्ण Proud असलेले दोन मायबोलीकर एकमेकांसमोर उभे आहेत. सगळं काळं काळं बघून एकदम 'गोविंदा... गोविंदा..' चे सूर ऐकू यायला लागतात. (कुणीतरी चटकन टेप बंद करतो.)
का. मा. १: तू...?
का. मा. २: तू...?
का. मा. १: ही काळी रंगसंगती....
का. मा. २: हो हो हीच काळी रंगसंगती...
का. मा. १: गॉगल फॅशनस्ट्रीटवरचा?
का. मा. २: हो... तुझाही?
का. मा. १: हो... बूट १० नंबरचे?
का. मा. २: हो... तुझेही?
का. मा. १: हो.... मायबोलीवर चार डुप्लिकेट आयडी?
का. मा. २: हो... तुझेही????
का. मा. १: हो... आवडता बीबी व्ही अँड सी?
का. मा. २: (अश्रुपात) हो हो हो... दादाSSSSSS.
का. मा. १: (गोंधळून) दादा?
का. मा. २: होय रे दादा होय. मायबोलीवर तुझं रजिस्ट्रेशन १ जूनचं नि माझं २ जूनचं. एकाच साली बरं.
जुन्या मायबोलीतून नवीन मायबोलीत येताना गर्दीत तू माझा हात सोडलास... तेव्हापासून जे बेपत्ता झालास तो इथे व विला दिसत आहेस. दादाSSSSSSSS

(दोघे यथाशक्ती अश्रुपात करतात.)

दृश्यबदल.

ते दोघे ओळखपरेडीसाठी उभे आहेत.
का. मा. १: (उत्साहाने) हा माझा जुळा भाऊ... नाव.... पत्ता... याचे आवडते बीबी... याचे डुप्लिकेट... (का. मा. २ घाईघाईने का. मा. १ चे तोंड दाबतो.)

का. मा. २: बस दादा बस.... माझी अल्पशी ओळख पुरे आहे रे.... इतकं का सांगतोस मज पामराविषयी? नको नको...

(दृश्य हळूहळू धूसर होत जाते.)

तर सज्ज व्हा वविकरांनो, आपापल्या हरवलेल्या जुळ्या वविकराला शोधायला. हा शोध तुम्हाला आत्तापासूनच सुरू करायचा आहे. आणि तुम्ही दोघे खरेच जुळे आहात हे व विला आम्हाला पटवून द्यायचं आहे. तसंच आपापल्या जुळ्याची ओळखही इतर वविकरांना करून द्यायची आहे.

नियम खालीलप्रमाणे:
१. मुंबईकरांनी पुणेकरांमधून 'हरवलेले जुळे' शोधावेत. तेच पुणेकरांनाही लागू. त्यांनी मुंबईकरांमधून जुळे शोधायचे आहेत.
२. जुळ्यांनी सारखेच दिसणे आवश्यक आहे. Proud (उदा. एकाला चष्मा असेल तर दुसर्‍याने ० नंबरचा का होईना चष्मा लावणे अत्यावश्यक, नाहीतर हाच जुळा आहे, हे कळणे कठीण होईल.)
३. आपल्याशी अतिपरिचित असलेले वविकर शक्यतो निवडू नये. म्हणजे, नवरा - बायको जुळे म्हणून आपसूक बाद होतात.
४. आपल्या सापडलेल्या जुळ्याची इतर वविकरांना ओळख करून द्यायची आहे. त्यामुळे त्याच्याविषयी माहिती गोळा करणे, हे काम करायचे आहे. त्या जुळ्यानेही तेच करणे अपेक्षित आहे.
५. खाली मदत म्हणून मुंबईकर व पुणेकर वविकरांची आतापर्यंतची यादी दिली आहे. जुळे शोधा आणि इथेच जुळे सापडल्याची पोस्ट टाका म्हणजे आम्ही यादी अपडेट करू.

काही शंका असल्यास 'विचारा तुम्ही, सांगतो आम्ही'. Proud

मुंबईकर्स:
.
इंद्रधनुष्य
शोनूनिल १
शोनूनिल २
मंजुडी
नील वेद
योगायोग
गौरवी १
गौरवी २
आनंदसुजू
ऍश अनन्या
आनंदमैत्री
रीना
भ्रमर विहार
घारूअण्णा
स्वा_२६
अज्जुका
यो रॉक्स
किशोर मुंढे

पुणेकर्स:
.
केमयुरेश२००२ १
केमयुरेश२००२ २
यशवर्धन १
यशवर्धन २
अरभाट
अटल्या
हिम्सकूल १
हिम्सकूल २
अरुण
पीएसजी १
पीएसजी २
राज्या
रामचंद्रसी
साजिरा
आदित्य_डी १
आदित्य_डी २
चिन्मय १
चिन्मय २
महादेवा
गोविंदा

*येथे १ आणि २ म्हणजे मायबोलीकर व त्याचे अर्धांग असे समजावे. लहान मुलांचे नंबर अपूर्णांकांत येतील, म्हणून त्यांना यातून वगळले आहे. Happy
*जुळे शोधायबाबत एक उदाहरण: समजा, इंद्रा व मयुरेशने ठरवले की मयुरेश आणि तो जुळे आहेत तर त्यांनी पोस्ट टाकायची इथे 'इंद्रा - मयुरेश' अशी. त्यांची नावे मग लिस्टमधून कमी केली जातील. राहिली, तर तिळे वगैरे बनायचे. Proud
*नवीन वविकर्स रजिस्टर होतील तशी तशी त्यांची नावे इथे येतीलच.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेरेको एक शंका हे..
ह्यो जो जुला भाव हरवलेला हाय त्याला शोधताना त्याची कापडं आनि माझी कापडं येकाच रंगाची असया पाहिजे काय?
नाय जर त्यानी मायबोलीचं पीच रंगाचं कापडं घेतलं असेल आन म्ह्या काल्या रंगाचं.. तर कस काय जुले भाव वाटनार!!!!
==================
डिंग डाँग डिंग

हिम्सकूल,

हो. कापडाचा रंग सेम पाहिजे. तू आणि तुझा जुळा मायबोली टीशर्टच घालणार असाल आणि दोघांचे टीशर्ट वेगळ्या रंगाचे असतील तर कुणातरी एकाला तात्पुरता दुसर्‍या एखाद्या वविकराकडून उधार घेता येईल.
तसेच या खेळाकरता सारखे कपडे जुळ्यांनी आपापसांत चर्चा करून ठरवायचे आहेत. मायबोली टीशर्ट असावेतच असे गरजेचे नाही. (नाहीतर नॉन मायबोलीकर 'अर्धांगांची' पंचाईत व्हायची.) Happy

ओके, तर कपडे, एकमेकांची माहिती, एकमेकांची माबोकरांना ओळख करून देणे, आणि काही लकबी सारख्या असणे हे अपेक्षित आहे, बरोबर? याची वेगळी 'राऊंड' असेल का 'बेस्ट जुळे' शोधायला, का 'सांस' पूर्ण वविभर निरिक्षण करेल आणि शेवटी 'विजेता जुळे' घोषित करेल? Happy
अजून एक, मी पुण्याची आहे, तर माझा 'जु़ळा' मुंबईचाच असणं आवश्यक आहे का? की पुण्याचाही चालेल?
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

वहिनी रेफर नियम क्रमांक एक.... पुणे मुंबई जुळे असेच असायला पाहिजे
==================
डिंग डाँग डिंग

पूनम,माझ्या मते हा खेळ सुरूवातीच्या ओळखपरेडपुरताच रिलेटेड आहे.. दिवसभर जुळे म्हणून फिरणं अवघड आहे. Happy

का हो सां स, अश्रुपात करणे अगदीच आवश्यक आहे का? Wink

पूनम, शक्यतो जुळा मुंबईचाच हवा. पुणेकरांना तू अतिपरिचित आहेस. Happy शेवटी शेवटी अगदीच शक्य नसेल तरच एकाच शहरातले जुळे स्वीकारले जातील. Happy
.
बेस्ट जुळे ओळख परेडीनंतर पब्लिक वोटद्वारे निवडण्यात येतील.
.
मंजू, आपण पावसातच जाणार आहोत. पावसाचे थेंब हेच अश्रू मानू शकतेस. Happy

संयोजक, इथे 'मी' हे जनरल होते हो Happy
मी 'सुपरिचित' आहे, त्यामुळे मी फक्त मजा बघीन Happy
----------------------
The cheapest face-lift is a SMILE
Happy

ये मेरेकु कुछ झेप्या नही. ऊपरका नंबर देखके वविको सिर्फ २८ लोग जा रहेले है क्या काय? लोकसंख्या बहुत रोडवली है ऐसा नही लगता आप लोगोंको? Lol

केपी,वर दिलेला आकडा हा अंतीम आकडा नाहिये वविकरांचा.. आतापर्यंत जेवढया लोकानी रजिस्टर केलय त्यांची नावं आहेत ती. जसजशी नविन नोंदणी होईल तसतशी इथल्या नावांमध्येही भर पडत जाईल...

वर जो खेळ दिलेला आहे त्यात जुळं शोधण्याचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी लोकांना वेळ मिळावा म्हणुन आत्ता आहे तेवढी यादी देण्यात आलेली आहे.

काय हे लोक्स? अजूनही जुळे सापडत नाहीयेत कुणालाच?
येऊ द्या एंट्रीज भराभर. Happy
.
पूनम, तू अतिपरिचित असलीस तरी तुला नुस्तं मजा बघायची परवानगी नाही हं. जुळा शोध बघू लौकर.

पूनम पुण्याहून येणार अन कायम गडावर टी पी करते म्हणुन काय ती लगेच पुण्याची झाली का? मुलुंडला यायचं की नाही परत? अजून तरी मुलुंड मुंबईतच आहे ना? Happy

जनता, काय हे?
इतक्या वविकरांमधून एकालाही आपापला जुळा सापडू नये ना अजून? असं नाही चालायचं. Happy
जागे व्हा आणि शोधा बघू लौकर. Happy

अरे वा. लिस्ट अपडेट झाली.... मुंबईकर वाढले... Happy

आयला.. नंदिनी नाय येणार का वविला?? रत्नागिरी दौरा कि काय?

स्वा,
मी नाहिये असं कुणी सांगितलं तुला??
सांस मधे नाव आहे माझं..
--------------
नंदिनी
--------------