तो माणूस भणंग होता
Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago
11
निराधार माझे स्वत्व बुडवताना
पाण्यातून उठला तो 'माझा'च तरंग होता
.
चित्रातला मी अर्थ शोधताना
मज सापडला जो रंग तवंग होता
.
आरश्यात आपुला भाव पाहताना
परि दिसला मज तो मनुष्य कबंध होता
.
पळभर मनी जगलो लाख मरताना
जन म्हणतील तो माणूस भणंग होता
.
(हा पहिला आणि कदाचित शेवटचा प्रयत्न. मायबोली करांनो चुकलो माकलो तर माफी करा )
**************************************************************
विषय:
प्रकार:
शेअर करा
(No subject)
छानच्...पण
छानच्...पण शेवटचा प्रयत्न नको...असेच लिहित रहा..
चांगला आहे
चांगला आहे रे प्रयत्न. काहीच्या काही नाही.
फक्त, आशयाच्य द्रुष्टिने गोलकावे खाल्लेत. म्हणजे दुसरे कडवे थोडे Off आहे. शेवटच्या कडव्यात पहिली ओळ मस्त dynamic आहे.
केद्या
केद्या चालु राहु दे ! मस्त लिहु शकतोयस
.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **
आरे भणंग
आरे भणंग आहेस ना ! मग माफी कशाला लिहा दणकुन
गोदेय
छान आहे !
छान आहे ! शेवट्चा प्रयत्न वगैरे विसरुन जा !
उत्तम
उत्तम लिखाण.
न्यून गन्ड ठेवायचे कारण नाही.
लिहीत रहा....
टोणगा...
धन्यवाद
धन्यवाद प्रशंसा, असामी, चाफ्या, गोदेय, बिपीन आणि टोणगा
वा केदार.
वा केदार. 'कबंध' आणि पहिले कडवे फारच आवडले.
धन्स ग
धन्स ग चिन्नू
केदार.. सही
केदार.. सही सुरुवात.. पण असाच प्रवास सुरु राहु दे...
आशय खुप छान आहे... लगे रहो...