Submitted by sahitya_rasik on 8 July, 2008 - 04:51
विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले
अवघेची झाले देह ब्रह्म
आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले
नवल देखिले नभाकार गे माये
बापरखुमादेविवरु सहज निटू झाला
ह्रदयी न दाविला ब्रह्माकारे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ज्ञानेश्वरांची एक विराणी दिन
ज्ञानेश्वरांची एक विराणी
दिन तैसी रजनी झाली गे माये |
पडीले दूरदेसी, मज आठवे मानसी |
नको नको हा वियोग, कष्ट होताती जिवासी ||
अवस्था लावोनी गेला अजून का न ये ||
गरूडवाहना गुणगंभीरा, येईगा दातारा |
बापरखुमादेवीवरू श्रीविठ्ठला ||
ही विराणी येथे ऐकता येईल.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Din_Taisi_Rajani_Jhali_Ge
ही विराणी किशोरी ताईंनीसुद्धा गायली आहे.
http://www.aathavanitli-gani.com/Song/Padile_Door_Deshi
माझ्या मराठीची बोलू कौतुके
माझ्या मराठीची बोलू कौतुके
परि अमृतातेही पैजा जिंके |
ऐसी अक्षरे रसिका मेळवीन ||१||
जिये कोवलिकेचिन पाडे |
दिसती नादिचे रंग थोड़े |
वेधे परीमळ बिक मोड़े |
जायाचेनी||२||
एका रसाळपणाचिया लोभा |
की श्रवानिंचे होती जीभा |
बोले इंद्रिय लगे कळम्भा |
एकमेका||३||
सहजे शब्दे तरी विषो श्रवणाचा |
परि रसना म्हणे रसु हा आमुचा |
घ्रानासी भावो जाय परीमलाचा |
हा तोचि होईल ||४||
नवल बोलतीये रेखेचे वहाणी |
देखता डोळ्याही पुरो लागे धणी |
ते म्हणती उघडली खाणी |
रुपाची हे ||५||
जेथे संपुर्ण पद उभारे |
तेथे मनची धावे बहिरे |
बोलू भुजाही अविष्कारे |
आलिंगावया ||६||
ऐशी इन्द्रिये आपुलालिया भावी |
झोम्बती परि तो सरीसेपणेची बुझावी |
जैसा एकला जग चेववी |
सहस्त्रकरू ||७||
तैसे शब्दांचे व्यापकपण |
देखिजे असाधारण |
पाहातया भावादन्या फावती गुण |
चिंतामणीचे ||८||
Pages