आशुचँपने मागेच मला विचारलं होतं कि अशा प्रकारचा धागा काढशील का? पण मला तेव्हा वेळ नव्हताच त्यामुळे हो म्हणुन पुढे काहीच केलं नाही.
पण आता माझ्या लक्षात आलं की अशा प्रश्नांना उत्तर द्यायला "कोणती गाडी .." सारखा हा धागा कदाचित उपयोगी पडेल. मला व्यक्तिश: इमेल केलेल्या काही लोकांना उत्तर द्यायला मला फार वेळ लागला (वेळ अभावी किंवा विसरल्यामुळेही) त्यामुळे इथे विचारले तर प्रश्न अनुत्तरीत रहाणार नाहीत असे वाटते.
या धाग्यावर फक्त मी उत्तरे देणार असे नसुन ज्या कोणाला अनुभव आहे, माहिती आहे त्या सगळ्यांनीच उत्तर द्यावे आणि माहीती शेअर करावी असा विचार आहे. शिवाय मला सगळ्याच प्रश्नांना उत्तरे द्यायला नेहेमीच जमेल असे नाही. माझा इतर ब्रॅंड कॅमेर्यांचा अनुभवही नाही.
सगळ्यात आधी फोटोग्राफी : कॅमेरा खरेदी
हा धागा किमान एकदा तरी वाचा हि विनंती.
काही कॅटेगरी:
#पॉईंट एन्ड शूट कॅमेरा - छोटा पॉकेट डिजिकॅम इ.
#एस एल आर लाईक कॅमेरा हा एस एल आर सारखा दिसतो. पण याच्या लेन्स बदलता येत नाहीत. हलका असतो. तरीही याची रेंज बरीच असते म्हणजे जवळचे लांबचे असे फोटो काढता येतात (10X zoom, 18x zoom etc). हे कॅमेरे जरा महाग असतात.
#माय्क्रो फोर/थर्ड्स कॅमेरा
हे डिजिकॅम पेक्षा बेटर, थोडेसे मोठे, जरा महाग आहेत. डिजिकॅम पेक्शा हा चांगला पर्याय असु शकतो ( एस एल आर लाइक सारखा, तरिही लेन्स बदलता येतात हा प्लस पॉईंट). पण लेन्स ऑप्शन फार कमी आहेत सध्या.
मिररलेन्स स्मॉल सेन्सर कॅमेरा
सध्या सोनी आणि निकॉनचे (CX)वेगवेगळे फॉरमॅट्स आहेत.
साधारण पणे फिचर्स -
सध्या फार महाग आहेत. पण लेन्स इंटरचेंजेबल आहेत. मिनी फ्लॅश चे वेगळे युनीटही विकत घेता येते. ऑप्टीकल व्ह्यु फाईंडर अर्थातच नाहीये.
#कंझ्युमर कॅमेरा SLR/DSLR म्हणजे जे सगळे सहज वापरू शकतील, वजनाला हलके ( plastic body) कॅमेरे. यात सर्वसामान्य ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. सेन्सर साईज छोटा असतो त्याला APS-C किंवा Crop body (कॅमेर्याच्या बोलीभाषेत ) असं पण म्हणतात.
#प्रोझ्युमर कॅमेरा SLR/DSLRम्हणजे ज्यांना फोटोग्राफीची खूप हौस आहे थोडीफार फोटोग्राफीची येतेही. हे अगदीच नवशिके नसतात अशांसाठी असलेले कॅमेरे. यातले कॅमेरे जड Magnesium alloy body असलेले, थोडफार weather sealing असलेले, सहसा जास्त फ्रेम पर सेकंद असलेले असे असतात.फुल फ्रेम सेन्सर किंवा APS-C. किमतही जास्त असते.
#प्रोफेशनल कॅमेरा SLR/DSLRम्हणजे ज्यांचा फोटोग्राफी हाच व्यवसाय आहे त्यांच्यासाठीचे कॅमेरे. किंमत खुपच जास्त असते. Magnesium alloy body, weather sealing असतेच. पण आणखी स्पेशालिटीसुद्धा असतात (vertical grip, १००% viewfinder, फुल फ्रेम सेन्सर ).
#मिडीयम फॉर्मेट आणि लार्ज फॉर्मेट कॅमेरामोठ्या फ्रेमचे कॅमेरे.
धन्यवाद नीलू.
धन्यवाद नीलू.
Nikon 1 J1 कॅमेरा कसा आहे?
Nikon 1 J1 कॅमेरा कसा आहे?
किट लेन्स नंतरची स्टेप म्हणून
किट लेन्स नंतरची स्टेप म्हणून टेलीफोटो लेन्स घ्यायचा विचार चालू आहे....
कॅनॉन ५५-२५० घ्यावी का सिगमा/टॅमरॉनची ७०-३०० घ्यावी?.... एनी टीप्स?
महागुरु Nikon 1 J1 छान
महागुरु
Nikon 1 J1 छान कॅमेरा आहे...पण जर थोड बजेट वाढवलत तर SONY ALPHA NEX 5 चा विचार करता येईल.
SONY ALPHA NEX 5 Higher resolution, 3D, in-built HDR हे महत्वाचे फिचर आहेत जे Nikon मध्ये नाहीत.
विसरभोळा, धन्यवाद!
विसरभोळा, धन्यवाद!
शक्यतो टॅमरॉन किंवा सिग्माला
शक्यतो टॅमरॉन किंवा सिग्माला जाऊ नका...त्या लेन्स नंतर सॉफ्ट होतात असा बरेच लोकांचा अनुभव आहे....असाही या सेगमेंटमध्ये कॅननच्या लेन्स फार महाग नाहीयेत....
कॅनन५५ -२५० साधारण १३ हजार पर्यंत जाईल आणि कॅनन ७० - ३०० ही ११ पर्यंत...(आता रुपयाच्या घसरणीमुळे किंमती वाढल्या असण्याची शक्यता आहे)
५५ -२५० चा फायदा असा की त्याला इमेज स्टॅबिलायजर आहे...त्यामुळे कमी प्रकाशात फोटो काढताना उपयोग होतो...
पण हात स्थिर असेल किंवा ट्रायपॉड असेल तर मग ७० - ३०० घेणे चांगले
धन्यवाद आशुचॅम्प.... मी
धन्यवाद आशुचॅम्प....
मी साधारण याच निर्णयापर्यंत आलो आहे पण कॅनॉन ५५-२५० ची १५+ किंमत आणि ७०-३००ची किंमत साधारणतः ८ हजारापर्यंत आहे.... बर्यापैकी डिफरन्स आहे किमतीत!
५५-२५० आणि ७०-३०० चे परफॉर्मन्स पुण्यातल्या कुठल्या शोरुममध्ये ट्राय करता येतील का?
>>५५-२५० आणि ७०-३०० चे
>>५५-२५० आणि ७०-३०० चे परफॉर्मन्स पुण्यातल्या कुठल्या शोरुममध्ये >> फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर कॅननची शोरुम आहे.
धन्यवाद शैलजा..... मला
धन्यवाद शैलजा..... मला विचारायचे होते की या शोरुम्सम्ध्ये लेन्स हाताळायला मिळतात का?
बाय द वे.... कॅमेरा घ्यायच्या वेळेस मी त्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरच्या शोरुममध्ये गेलो होतो.... फारच उर्मट वाटली तिथली माणसं!
हो? लेन्स मिळतील की
हो? लेन्स मिळतील की हाताळायला. त्याशिवाय कसे खरेदी करणार?
मी तिथे गेले होते ट्रायपॉडसाठी. व्यवस्थित हाताळू दिले ट्रायपॉड्स. ब्रोशर, किंमती सगळे व्यवस्थित सांगितले. मला काही उर्मटपणाचा अनुभव आला नाही.
स्वरूप - दगडूशेट हलवाई
स्वरूप - दगडूशेट हलवाई गणपतीजवळ महावीर आहे..तिकडे जा...चांगले डील मिळेल आणि माहीती पण....
५५-२५० आता १५+ आहे...बापरे कैच्याकै वाढलीये किंमत...कदाचित आयएस २ आल्यामुळे असेल...
७०-३०० घेऊन टाका...मी वापरलीये..मस्त लेन्स आहे...आयएस असल्याचा तोटा म्हणजे बॅटरी भसाभस संपते...मला आधी हे कळलेच नव्हते..मग आता फक्त ठराविक वेळीच आयएस मोडवर ठेवतो
आज लेन्स बघून आलो.... कॅनॉन
आज लेन्स बघून आलो.... कॅनॉन ५५-२५० साधारणतः १७,३०० पर्यंत जातीय
आणि सिग्मा, टॅमरॉनच्या ७०-३०० साधारणतः ८ ते ९ हजाराच्या रेंज मध्ये आहेत..... सिग्मा आणि टॅमरॉनम्ध्ये कोणती चांगली आहे?
नळ स्टॉप वर शौकीन पान
नळ स्टॉप वर शौकीन पान दुकानाच्या डाव्या बाजुला आत्मध्ये डाबी डिजिटल्स म्हणून कॅननवाले आहेत. स्वतः फोटोग्रफर असल्याने तांत्रिक माहिती उत्तम. वर्तन नम्रतेचे. सला फायदेशीर. आम्ही ६००डी तिथेच घेतला.
गेल्या वीकांताला कॅनॉन ५५-२५०
गेल्या वीकांताला कॅनॉन ५५-२५० घेतली.... महावीरमधून.... १५के ला मिळाली..... फिल्टर फ्री मिळाला
तुमच्या सगळ्यांच्या सल्ल्याबद्द्ल धन्यवाद!
माझ्याकडे kodak easyshare
माझ्याकडे kodak easyshare max z990 कॅमेरा आहे. तो मी गेले ३ वर्ष वापरत आहे. आता नवीन घ्यायचा विचार करत आहे. मला थोडी मदत करणार का?
फिरायला जातो तेव्हा फोटो काढणे तसेच क्लोज अप काढ्णे यासाठी उपयोगी पडणारा कॅमेरा घ्यायचा आहे. कोणता घ्यावा? DSLR घ्यायचा विचार चालला आहे, पण mirrorless बद्दल माहिती नाहिये. कोणता अधिक चांगला?
DSLR घेतला तर किटसह घ्यावा का? अधिक काही लेन्स घ्यावी का? मॅक्रो लेन्स घ्यावी का? घेतल्यास सेकंड-हँड/ सिग्मा सारखी स्वस्त लेन्सेस घेण्याचे काय तोटे? आणखी कोणकोणत्या accessories आवश्यक आहेत?
Pages