Submitted by सखीप्रीया on 9 May, 2011 - 07:53
थोडसं मनातले....
म्हणे देवाला नव्हते शक्य सर्वांजवळ पोचणे.....
म्हणून तर त्याने गायले "आई" नावाचे सुरेल गाणे.....
माझ्याजवळ आहे त्यातलेच एक अनमोल कडवे......
वाटे मी अनंत जन्म तेच गावे.....
"आई" जणू स्वाती नक्षत्रातला शिंपल्यातील मोती.....
तिची महती सर्वच गुणगुणती .....
"आई"ची जागा आईच घेऊ जाणे.....
......तिच्याविना जीवनगाणे होई निव्वळ विराणे !
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
भावना चांगली / उत्तम आहे.
भावना चांगली / उत्तम आहे. अजुन खुलवता आली तर बघा...
पुलेशु
आईबद्दल कितीही लिहीले तरी
आईबद्दल कितीही लिहीले तरी भावना पुर्णपणे व्यक्त कधीही होऊ शकत नाहीत हेच खरं !
आईबद्दल कितीही लिहीले तरी
आईबद्दल कितीही लिहीले तरी भावना पुर्णपणे व्यक्त कधीही होऊ शकत नाहीत >> हेच ते कडवे सखे... हीच पुर्ण कविता
पल्लीशी सहमत !
पल्लीशी सहमत !
(No subject)