वारांचे गाणे

Submitted by सुरेखा कुलकर्णी on 8 May, 2011 - 09:47

महादेवाचा सोमवार
बेल वाहूया हिरवागार,

गणपतीचा मंगळवार
उंदीरमामाची शानच फार,

पांडुरंगाचा बुधवार
टाळ,चिपळ्या,बुक्का,हार,

दत्ताचा तो गुरूवार
आजोबांनी दिले पेढे चार,

जगदंबेचा शुक्रवार
आईला शालु हिरवागार ,

हनुमंताचा शनिवार
करा रामाचा जयजयकार,

खंडोबाचा रविवार
शाळेला सुट्टी मजाच फार,

वारांचे गाणे गाऊया
आनंदाने नाचू या.

गुलमोहर: 
शब्दखुणा: