आपली प्रत्येक पेशी (cell) अनेक यंत्रांनी बनलेल्या अत्यंत सुंदर आणि कार्यक्षम कारखान्याप्रमाणे आहे. पेशीचे केंद्रक (nucleus) म्हणजे त्याचा व्यवस्थापक, ज्याच्या आदेशाप्रमाणेच सगळी कामे होणार. परितालिका (cell membrane) आहे सुरक्षा अधिकारी, कारखान्याचा पुरवठा आणि वितरण नियंत्रित करणारी. गॉल्गी बॉडीज, एंडोप्लाझ्मीक रेटीक्युलम आणि रायबोसोम हे या कारखान्याचे कनव्हेअर बेल्ट्स कम प्रॉडक्शन मॅनेजर, तर वेगवेगळ्या प्रकारचे एंझाइम्स, प्रोटीन्स आणि आरएनए हे सुपरवायझर्स आणि कामगार!
मात्र या सगळ्या व्यापाला लागणारी उर्जा पुरवणारे उर्जाकेंद्र मात्र एकच- मायटोकाँड्रिआ!
आपण जे अन्न ग्रहण करतो त्यात साठवलेली रासायनिक उर्जा आपल्याला जशीच्यातशी वापरता येत नाही. उदा. तुम्हा काहीतरी बोलायचे आहे, तर या कृतीसाठी लागणारी उर्जा तुम्ही तुमच्या पेशीतील ग्लुकोज/ प्रथिनांपासून थेट मिळवू शकत नाही. त्यासाठी या पदार्थातील उर्जा ऑक्सिडेशनच्या मदतीने 'अॅडोनोसिन ट्राय-फॉस्फेट अर्थात एटीपी (ATP)' या रेणूंमध्ये रुपांतरीत करावी लागते. शरीरात होणारी प्रत्येक घटना उर्जेसाठी याच रेणूंवर अवलंबून असते त्यामुळे त्यांना 'शरीरातील उर्जेचे चलन (Energy currency)' असेही म्हटले जाते. अन्नाचे ऑक्सिडेशन आणि एटीपीची निर्मिती मायटोकाँड्रिआतच प्रचंड मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे पेशी आणि अर्थातच संपूर्ण शरीरासाठी त्यांचे महत्व अनन्यसाधारण आहे.
पण हे मायटोकाँड्रिआ आपल्या पेशीत येतात कुठून? आपण आपल्या आयुष्याची सुरुवात आपल्या आईच्या गर्भात फक्त एका पेशीपासून (zygote) करतो. त्या पहिल्या पेशीतले मायटोकाँड्रिआ कुणाचे असतात? ते असतात फक्त आपल्या आईचेच!!!
मानवी शुक्राणू (sperm cell) ही एक अत्यंत खास प्रकारची पेशी आहे. स्त्रीची अंडपेशी (ovum or egg cell) शोधून, फलनाची प्रक्रिया (fertilization) पूर्ण करणे या कामासाठी त्यांची रचना अत्यंत वैशिष्ठ्यपूर्ण आहे. एखाद्या माश्याप्रमाणे अत्यंत वेगाने 'व्हिपलॅश अॅक्शन'ने अंडपेशीपर्यंत पोचण्यासाठी शुक्राणूंना प्रचंड उर्जा लागते. ती अर्थातच त्यांच्या मध्यभागात (mid-piece) एकवटलेल्या मायटोकाँड्रिआकडून मिळते. मात्र जेंव्हा एखादा शुक्राणू फलनाच्या प्रक्रियेत असतो तेंव्हा मात्र त्याचा मध्यभाग अंडपेशीत प्रवेश करत नाही. त्यामुळे फलनानंतर तयार झालेल्या आपल्या पहिल्या पेशीत आपल्या शुक्राणूतील (वडिलांचे) मायटोकाँड्रिआ अजिबात नसतात. केवळ अंडपेशीतील मायटोकाँड्रिआच पुढे नवीन तयार होणार्या पेशीत जातात. त्यामुळे आपल्या प्रत्येक पेशीतील, आपल्याला सतत उर्जा देणारे सर्व मायटोकाँड्रिआ फक्त आणि फक्त आपल्या आईचीच देणगी असतात!
आता प्रश्न हा आहे की हे आपल्याला कळले कसे? मायटोकाँड्रिआचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणजे त्यांच्याकडे स्वतःचा डीएनए आहे जो आपल्या केंद्रकातील डीएनएपेक्षा वेगळा आहे आणि त्याचे कामही स्वतंत्रपणे चालते. या डीएनएमधील घटकांची क्रमवारी (DNA sequencing or mapping) लावता येते. अशा क्रमवारीचा अभ्यास केला असता हे स्पष्ट होते की तुमच्या मायटोकाँड्रिआच्या डीएनएची क्रमवारी, तुमच्या आईच्या मायटोकाँड्रिआतील डीएनएच्या क्रमवारीशी तंतोतंत जुळते. पण ही क्रमवारी तुमच्या वडिलांच्या क्रमवारीपेक्षा वेगळी असते. याचाच अर्थ हा की आपला प्रत्येक मायटोकाँड्रिआ केवळ आपल्या आईकडूनच आलेला असतो.
विचार करा, तुमच्या शरीरातील मायटोकाँड्रिआ तुम्हाला तुमच्या आईकडून मिळाला, तिला तिच्या आईकडून (म्हणजे तुमच्या आजीकडून), तुमच्या आजीला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून............ही साखळी अंतहीन आहे.....किंवा ती कोण्या एका आद्य, महामातेपर्यंत जाउन थांबते.
या मातृदिनी त्या मातेचे स्मरण करु आणि म्हणू ' थँक्स फॉर द मायटोकाँड्रिआ, मॉम!'
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
तळटीपा:
१] काही कोटी वर्षापूर्वी मायटोकाँड्रिआ हे स्वतंत्र जीव असावेत आणि नंतर मोठ्या पेशींनी त्यांना आपले कायमचे रहिवासी बनवले, अशी एन्डोसिंबायोसीस थिअरी आहे.
२] मायटोकाँड्रिआतील डीएनएच्या मदतीने तुम्हाला तुमचे पूर्वज शोधता येणे आता शक्य आहे. खालील लिंकला भेट द्या- https://genographic.nationalgeographic.com/genographic/lan/en/participat...
लेख खूप आवडला .मातॄदिनाला
लेख खूप आवडला .मातॄदिनाला वैज्ञानीक दृष्टीकोन मिळाला .धन्यवाद .
वा अगदी जीवशास्त्राची आठवण
वा अगदी जीवशास्त्राची आठवण झाली. ह्य सर्व व्याख्या जीवशास्त्रात शिकल्या होत्या. ATP, Zygote वगैरे १२ वीला होते झुऑलॉजी मधे.
ह्या लेखाची लिंक मी बर्याच
ह्या लेखाची लिंक मी बर्याच मैत्रिणी, बहिणी वगैरेंना मातृदिनानिमित्त पाठवली होती. पब्लिक जाम खुश!!! एक मावस बहिण तर म्हणाली, तुझ्या-माझ्यात रक्ताचं नातं आहे असं म्हणण्यापेक्षा आता आपण तुझ्या-माझ्यात मायटोकॉन्ड्रिआचं नातं आहे असं म्हणूयात!
मस्त रे.. परफेक्ट टायमिंग
मस्त रे.. परफेक्ट टायमिंग
इन्टरेस्टिंग आणि समयोचित
इन्टरेस्टिंग आणि समयोचित माहिती
तुझ्या-माझ्यात रक्ताचं नातं
तुझ्या-माझ्यात रक्ताचं नातं आहे असं म्हणण्यापेक्षा आता आपण तुझ्या-माझ्यात मायटोकॉन्ड्रिआचं नातं आहे असं म्हणूयात! >>>> वा! मस्तच.
आगाऊ, मस्त लेख आणि तो ही
आगाऊ, मस्त लेख आणि तो ही मातृदिनाचं औचित्य साधून. ग्रेट!!!!
..
..
मस्त लेख रे! आवडला.
मस्त लेख रे! आवडला.
ग्रेट!!! फारच उपयुक्त
ग्रेट!!! फारच उपयुक्त लेख...धन्यवाद!
तुझ्या-माझ्यात रक्ताचं नातं आहे असं म्हणण्यापेक्षा आता आपण तुझ्या-माझ्यात मायटोकॉन्ड्रिआचं नातं आहे असं म्हणूयात!<< हे सही आहे
एवढं कौतुक!!! मी फार इमोशनल
एवढं कौतुक!!! मी फार इमोशनल प्राणी नाही, पण आज हे सगळं वाचून एकदम भरुन आलं, आय अॅम ओव्हरव्हेल्म्ड!!! मनापासून धन्यवाद.
हे सगळं वर्गात अनेकदा शिकवले आहे, मुलांच्या डोळ्यातला तो 'इट्स ऑस्सम' चा भाव लाखमोलाचा असतो आणि प्रत्येकवेळी मलाही ते तितकेच रोमांचक वाटते.
तुझ्या-माझ्यात रक्ताचं नातं
तुझ्या-माझ्यात रक्ताचं नातं आहे असं म्हणण्यापेक्षा आता आपण तुझ्या-माझ्यात मायटोकॉन्ड्रिआचं नातं आहे असं म्हणूया >>>

मुलांच्या डोळ्यातला तो 'इट्स ऑस्सम' चा भाव लाखमोलाचा असतो आणि प्रत्येकवेळी मलाही ते तितकेच रोमांचक वाटते >>>
आगावा, खरोखर हॅट्स ऑफ.
आगावा, खरोखर हॅट्स ऑफ.
मस्त मस्त मस्त.
मस्त मस्त मस्त.
मस्त, माहीतीपूर्ण लेख.
मस्त, माहीतीपूर्ण लेख.
आगावा, ललित किंवा लेख लिहावे
आगावा, ललित किंवा लेख लिहावे तर तूच रे ! अतिशय थोडक्या शब्दात बरंच काही सांगुन जाण्याची क्षमत फार कमी जणात असते. तू कविता करत नाहीस हे आमच्यासारख्यांचे नशिबच !
विशालभाय, आज सकाळपान्स कोन
विशालभाय, आज सकाळपान्स कोन गावलं नाय काय? फिरभी जर्रानवाजी का शुक्रिया!!!

रच्याकने, कविता करायची काय अक्कल नाय आपल्याला, पन इथल्या काही लोकांच्या कविता मी वाचत नाही हे मात्र त्यांचं नशिब असू शकते!!!
क्लास! (घेतलास पण आणि भारी
क्लास! (घेतलास पण आणि भारी पण.)
मुलांच्या डोळ्यातला तो 'इट्स ऑस्सम' चा भाव लाखमोलाचा असतो >> बारावीच्या बायोचे सर आठवले. इतकं अवघड तरी किती सोपं! बायोलॉजी म्हणजे अक्षरशः अलिबाबाची गुहा! धन्यवाद रे.
विचार करा, तुमच्या शरीरातील
विचार करा, तुमच्या शरीरातील मायटोकाँड्रिआ तुम्हाला तुमच्या आईकडून मिळाला, तिला तिच्या आईकडून (म्हणजे तुमच्या आजीकडून), तुमच्या आजीला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून, तिला तिच्या आईकडून............ही साखळी अंतहीन आहे.....किंवा ती कोण्या एका आद्य, महामातेपर्यंत जाउन थांबते. >> थांबणार नाही हे,अंतहीनच राहील.
मायटोकाँड्रिआ सहिच आहे. जाम आवडलं.
अकुला अनुमोदन १० वी नंतर
अकुला अनुमोदन

१० वी नंतर विज्ञान या विषयाशी काडीचाही संबंध नि (किचकट शास्त्रीय भाषेमुळे) रुक्ष वाटणार्या या विषयात रस न राहिलेल्या आमच्यासार्ख्या कला शाखेच्या विद्यार्थ्यांना हा विषय मातृभाषेत अतिशय सोप्या शब्दात समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद गुरुजी..
भन्नाट...
भन्नाट...
मस्त!
मस्त!
मस्त!! आगाउ, खूप धन्यवाद हे
मस्त!! आगाउ, खूप धन्यवाद हे आम्हाला सोप्या भाषेत समजावल्याबद्दल.
खुप्प्प मस्त!!!! आवडलं एकदम!
खुप्प्प मस्त!!!!
आवडलं एकदम!
शीर्षक तर फारच मस्त दिलंय... 
छान माहिती!! आवडली...
छान माहिती!!
आवडली...
खूप छान माहिती खूप रंजक
खूप छान माहिती खूप रंजक पद्धतीने दिलीत.
धन्यवाद, आगाऊ!
खूप मस्त माहिती सोप्या भाषेत
खूप मस्त माहिती सोप्या भाषेत दिलीत.
मनापासून धन्यवाद, आगाऊ!
झकास लेख.
झकास लेख.
मस्त
मस्त
मस्त माहिती.. थँक्स आगाऊ.
मस्त माहिती.. थँक्स आगाऊ.
Pages