ही कविता २००२ च्या माबो गणेशोत्सवाच्या कवितास्पर्धेसाठी लिहिली होती. मग अचानक आम्हा तिघांवरच परीक्षकपदाची जबाबदारी आल्यामुळे आमच्या तिघांच्या कविता डिबार झाल्या. त्यातली ही माझी. आतल्यासहित माणूस या प्रयोगात ही कविता होती. पेशव्याची 'प्रिय' ही कविता आणि माझी 'वादळवेडी' अश्या दोन्ही कविता एकत्र गुंफून तो बीट तयार केला होता. 'प्रिय' ने सुरूवात व्हायची मग 'वादळवेडी'चा पहिला भाग मग परत 'प्रिय' चा उरलेला भाग आणि 'वादळवेडी'च्या पुढच्या भागाने शेवट. रंगमंचावर १० एक मीटरचं गुलबक्षी रंगावर सोनेरी अक्षरं असलेलं पत्र अनफोल्ड होत जायचं आणि दुसर्या विंगेत ते विरून जायचं. प्रयोगातल्या माझ्या लाडक्या बिटस पैकी हा एक होता. अंबरीष देशपांडे, मयूर हरदास आणि राजेश्वरी वैद्य करायचे पण मस्त.
http://sites.google.com/site/neerajasspace/aatalyasahitmaan इथे वरून दुसर्या ओळीतले डावीकडचे दोन फोटो. पहिला आहे तो प्रिय कवितेचा दुसरा भाग/ शेवट आणि दुसरा आहे तो वादळवेडीचा शेवट.
-------------------------------------------------------------
तिला सुसाट वार्याचं वेड होतं
वेळीअवेळी बांबुच्या बनातुन वारा घुमायचा,
अन् तिच्या पोटातुन चंद्र आडवा उभा सरकायचा.
भारल्यासारखी ती बाहेर पडायची,
पिसाटल्यासारखी काहितरी शोधत रहायची
"कन्या राजे पुरे आता, परतूया."
धापा टाकत दासी म्हणायची.
हो, तशी ती होती राजकन्या,
लाडाकोडात वाढलेली, दुधातुपात न्हायलेली.
तिच्यासाठी महालात कितीतरी झरोके होते,
भर दुपारी मंद झुळका येईल असे,
आणि कितीतरी पंखे,
गोर्या साहेबाच्या राज्यातले.
पण तरी तिला सुसाट वार्याचं वेड होतं
एकदा अरण्यात रानपाखरं अचानक ओरडायला लागली
मिळेल त्या आसर्याला जाउन राह्यली.
तिनं चकीत होऊन बघितलं
येणार्या वार्याच्या लोळानं तिला खेचून घेतलं.
जीवाच्या जिवलगानं मिठीत घ्यावं तसं.
तिनंही त्या वादळाला सगळं अर्पून टाकलं
हलकी झाली आणि हवेत वर वर चालली
असं तिला सुसाट वार्याचं वेड होतं
वेडे लोक!
सांगतात तिला झंझावातानं उडवून नेलं
- नी
सही..... खूप छान.............
सही..... खूप छान............. प्रचंड आवडली
नीधप, ही कविता आवडली. शायर
नीधप,
ही कविता आवडली.
शायर अहमद फराज यांची गाजलेली गझल आपल्याला माहीत असेलच, रंजिश ही सही, दिलही दुखानेके लिये आ!
ती गझल प्रेयसीवर नसून पाकिस्तानातून सतत नष्ट होणार्या लोकशाहीवर आहे असे त्यांनी स्वतःच सांगितले.
आपली ही कविता भारतीय (स्वातंत्र्यपुर्व) राजकारण्यांमध्ये असलेली व आत्ताच्या राजकारण्यांमध्ये शोधूनही न सापडणार्या नीतीमत्तेला चांगली लागू पडावी असे एक आपले वाटले. त्यात वादळ म्हणजे मग भ्रष्टाचार होईल!
तशीही कविता आवडलीच!
अभिनंदन!
-'बेफिकीर'!
सुरेख
सुरेख
आवडली
आवडली
नी, आवडली ही कविता.
नी, आवडली ही कविता.
छानच.
छानच.
मस्तच.
मस्तच.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
अशक्य.. खूप सुंदर कविता..
अशक्य.. खूप सुंदर कविता..
खरोखर वेडेच आहेत लोक. हि
खरोखर वेडेच आहेत लोक. हि सुद्धा आवडली. "आतल्यासहित माणूस " ची लिंक दिल्याबद्दल धन्यवाद. सुंदरच दिसतोय तो प्रयोग. पून्हा परत तो प्रयोग घेवून यायचा काही विचार? असेल तर नक्की कळवा.
सुरेख
सुरेख
सुंदर होता तो प्रयोग. <<
सुंदर होता तो प्रयोग. << तुम्ही पण पाह्यला होतात? ग्रेटच.
परत होणं मुश्कील आहे. एवढी माणसं मिळणं, डेलि सोप आणि अॅडस च्या गोंधळातून त्यांचा इंटरेस्ट टिकणं इत्यादी... जाम जाम अवघड!
मस्त!!! "आतल्यासहित माणूस "
मस्त!!!
"आतल्यासहित माणूस " ची रेकॉर्डींगस नाहीत का?
सुरेख शब्दांकन
सुरेख शब्दांकन
नाही मी तो प्रयोग पाहीला
नाही मी तो प्रयोग पाहीला नाही. पण पहायची इच्छा मात्र आहे. त्याचे फोटो पाहिले.एकंदरीतच थिम आणि प्रेझेंटेशन उत्तम जमली असेल असा अंदाज असावा. वरती प्रतिसादात ते चुकून झालं.
ओह ओके. काही गोष्टी बर्या
ओह ओके. काही गोष्टी बर्या होत्या, काही तेवढ्या बर्या नव्हत्या. पण एक बरंच काही शिकवून गेलेला अनुभव होता. माझ्यासाठी.

सत्या, नाही रे शूट पण नाहीय करून ठेवलेलं या प्रयोगाचं. ते करायच्या आधीच डेलि सोप्स आणि इतर इंस्टंट अभिनयसंधींनी ग्रासलं सगळयांना.
नी, कुठे भेटेल हि वादळवेडी ?
नी, कुठे भेटेल हि वादळवेडी ? एकेक ओळ नि ओळ आणि वादळ कसं समांतर दिसायला लागतंय.
भन्नाट ! मस्त. खूप आवडली !
भन्नाट ! मस्त. खूप आवडली !
नाद्या वादळवेडी भेटायला आपण
नाद्या वादळवेडी भेटायला आपण वादळ असायला हवं ना आधी...
भन्नाट............ !
भन्नाट............ !
खूप सुंदर नीरजा, तुझ्या या
खूप सुंदर
नीरजा, तुझ्या या शिकऊ आणण्यामुळे गुलमोहराला एक वेगळाच मस्त फ्लेवर आला आहे