Submitted by admin on 6 July, 2008 - 14:10
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककॄती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खजूर आधी दूधात थोडा भिजत
खजूर आधी दूधात थोडा भिजत घालावा लागेल. मुलाला शक्यतो थंडीतच द्या. खजूर उष्ण पडतो ब-याचदा.
उन्हाळ्यात रोझ सिरप दूधातून दररोज दिलं तरी चालेल.
बदामाची पूड करून ती दूधात घालून देता येईल.
मला पाणीपुरी बनवायची आहे ८-१०
मला पाणीपुरी बनवायची आहे ८-१० लोकांसाठी. पुर्या कश्या करायच्या ते मी जुन्या माबो वर पहात होते... पण जरा कन्फ्युज झाल्येय. आणि अर्ध्याहुन अधिक पोष्टी तर कुठल्या अगम्य लिपीत दिसतायत.
तरी कृपया कुणीतरी ट्राईड आणि टेस्टेड (बेस्ट) रेसिपी टाका ना. पुरीची अणि तिखट व गोड पाण्याची पण
पाणीपुरीत, उकडलेले मुग्/मटकी/बटाटे/बुंदी नक्की काय घालायच???
लाजो, गोड चटणी बघ.
लाजो, गोड चटणी बघ. पाणीपुरीसाठी किंचीत पातळ करावी लागेल.
तिखट पाण्यासाठी वरच्या लिंकमध्ये पुदिना चटणी दिली आहे ती पाण्यात घालून पाणीपुरी मसाला घालायचा असतो. मसाल्याच्या पाकिटावर किती पाण्याला किती मसाला/चटणी ते प्रमाण दिलेलं असतं.
पुरी भरताना मी त्यात उकडलेले मूग आणि खा-या बुंदी भरते.
धन्स गं मंजुडी. पण ती गोड
धन्स गं मंजुडी. पण ती गोड चटणीची लिन्क उघडत नहिये... पान हरवल्य असा मेसेज येतोय ...
मी केल्या होत्या पाणीपुरी
मी केल्या होत्या पाणीपुरी च्या पुर्या.मला देसी दुकानात पाणीपुरीच्या पुर्यान्च पीठ मिळाल होत्,ते म्हणजे बारीक रवा असतो.१ कप तो बारीक रवा/पाणी पुरी फ्लोअर त्यात थोडस कोमट पाणी घालुन मळुन घे.खूप पाणी लागत नाही जस्ट मिळोन येण्या करता घालायच. आणी मग नीट मळण्यासाठी चमचा भर मैदा घालायचा. आणी मग १५ मिनिटानी एक मोठी पोळी लाटून छोट्या वाटीने कापून घे.
मस्त टम्म फुगतात ! नकोतच त्या देसी दुकानातल्या फुसक्या पुर्या
१ जुडीतील पुदिना पाने + १/२ कप चिन्चेचा कोळ +२ हिरव्या मिरच्या थोडी कोथिम्बीर थोडेसे आल , १ चमचा जिरे मिक्सर मधुन काढ्.मग त्यात लगेल तेवधे थन्ड पाणी घालयचे.चवी पुरत सैन्धव्/मीठ ,गुळ ,पाणीपुरी मसला घाल २ चमचे लिम्बाचा रस
आणि शोर्ट कट मारायचा असेल तर दीप च फ्रोझन सेक्शन मधे तयार पाणी मिळत. ते पण चान्गल आहे
लाजो, ती लिंक दुरुस्त केली
लाजो, ती लिंक दुरुस्त केली आहे.
न फुटणारे आलू पराठे आणि मिक्स
न फुटणारे आलू पराठे आणि मिक्स व्हेज पराठे यान्च्या रेसिपीज जरा सांगा बरे कोणीतरी.
मला कुणी पीठ पेरुन भाज्या कशा
मला कुणी पीठ पेरुन भाज्या कशा करयच्या सागेंल का? माझं नेहमी काहितरी चुकत :-(.
निकिता अशा भाज्याना जरा जास्त
निकिता अशा भाज्याना जरा जास्त तेल घालाव लागत.
लाजो, मी मागे 'वाह रे वाह'
लाजो,
मी मागे 'वाह रे वाह' या साईटवर असलेल्या पाणिपुरीच्या पुर्या करुन पाहील्या आहेत. छान झाल्या होत्या.
ही बघ युट्युब वरची लिंक!
http://www.youtube.com/watch?v=OVG9jpEJQAQ
mbjapan, इथे माझं काय चुकलं
mbjapan, इथे माझं काय चुकलं वर न फुटणार्या आलु पराठ्यान्ची खूप चर्चा झाली आहे. मिक्स वेज पराठ्याची एक चांगली कृती सायो ह्या आयडीने टाकली आहे नव्या मायबोलीत.
लाजो, मी पण तोषवीने
लाजो, मी पण तोषवीने सांगितल्यात तश्याच पुर्या करते. मस्त होतात. मी तर आपला साधा रवाच वापरते.
सोप्पे आलू पराठे न फुटणारे
सोप्पे आलू पराठे न फुटणारे म्हणजे mashed potato flakes वापरायचे. आणि कणकेत थोडा मैदा घालायचा.
बटाटयाच्या सारणामधे अजीबात
बटाटयाच्या सारणामधे अजीबात गुठळी नसेल तर पराठ फुटत नाही. त्यासाठी उकडलेला बटाटा सरळ किसुन घ्यावा.
धन्स तोषवी, मंजु, अमया आणि
धन्स तोषवी, मंजु, अमया आणि अमृता. या विकांताला करुन बघेन. आमच गटग २८ला आहे सो अजुन वेळ आहे २-४ प्रयोग करायला...
पीठ पेरुन भाज्या करताना, पीठ आधी थोड कोरडच भाजुन घ्यायच. भाजी छान होते.
आलु पराठे न फुटण्यासाठी, बटाट उकडुन मॅशर/पुरण यंत्र यातुन काढुन घ्यायचे, किन्वा अमृता म्हणते तस किसुन घ्यायचे. वरच्या परीसाठी कणिक असेल त्यच्या १/३ प्रमाणात मैदा घालायचा आणि गार पाण्याने भिजवायची.
रोझ, खस, मँगो, केसर अशी खास
रोझ, खस, मँगो, केसर अशी खास दूधाची सरबत मिळतात. ठंडाई, बटरस्कॉच असे पण काहि फ्लेव्हर्स बाजारात आहेत. स्ट्रॉबेरी, चिकू, फालूदा असे काही सरबतातले स्वाद मुंबईत मिळतात.
खजूराचा रोल (त्यात दाणे घालून ) वरुन दूध प्यायला द्यावे. खजूर वाटला तर कधी कधी कडू लागतो.
माझ्या एका मैत्रिणीकडे चाट
माझ्या एका मैत्रिणीकडे चाट बाऊल (देसी उच्चार असाच असतो :)) नावाचा प्रकार खाल्ला होता. मैद्याची की रव्याची पुरी करुन ती स्टेनलेस स्टीलच्या वाटीला चिटकवायची. जरा कड मोकळी सोडायची. मग चिमट्याने पुरी पूर्ण बुडेल अशा हिशेबाने वाटी तेलात धरायची. बाहेरची बाजु जशी तळली जाते तशी पुरी मोकळी होते मग आतली बाजू नीट तळुन ती पुरी कम वाटी निथळायला ठेवायची. गार झाली की त्यात रगडा, शेव, कांदा, टोमॅटो, चटण्या इ. घालायचे. हे असे मला आठवते आहे. पण काही वेगळे असते का ? कुणाला माहिती आहे का ?
हो, ते pastry bowl वापरुनही
हो, ते pastry bowl वापरुनही करता येते. आकार थोडा लहान असेल.
ह्याला कटोरी चाट म्हणतात,
ह्याला कटोरी चाट म्हणतात, पुरी सुटली की वाटी काढुन घ्यायची. माझ्या सासुबाई करतात.
pastry bowl सोपं पडेल करायला.
pastry bowl सोपं पडेल करायला.
माझ्याही सा. बाई करतात. त्या
माझ्याही सा. बाई करतात. त्या वाटीत आम्ही किसलेली कोबी, चाट मसाला वगैरे घालून खातो.
पण राडा होत असेल हे करताना...
पण राडा होत असेल हे करताना... वाटी थंड व्हायची वाट बघायची.. परत नविन मैदा लावताना कोरडी करायची का? कि निरनिराळ्या वाट्या वापरायच्या??
मला वाटतं तीच वाटी वापरता
मला वाटतं तीच वाटी वापरता येते. आणि मी खटाटोप केलाच नाही, फक्त खायचं काम केलं
त्यामुळे details आठवत नाहीत.
तळायलाही तेल फार लागतं, वाटी बुडावी म्हणून.
खाऊन बरीच वर्षं झाली आता.
संजीवकपूरची कटोरीचाटची कृती.
संजीवकपूरची कटोरीचाटची कृती.
tortilla bowl पण बनवता येतो.
tortilla bowl पण बनवता येतो. साधा tortilla घेऊन तो oven मध्ये बेक करायचा. त्यासाठी तो oven प्रूफ मेटलचा tortilla bowl मिळतो त्यावर ठेवायचा, मग एक करुन थन्ड झाल्यावर काढायचा. यात हवे ते भरायचे.
मुंबईत हा प्रकार बटाट्याच्या
मुंबईत हा प्रकार बटाट्याच्या किसापासून करतात. स्टीलच्या गाळणीला आतून तो किस लावायचा आणि तळायचे. पार्ल्याला रामकृष्ण मधे मिळते, पण एका माणसाला संपत नाही तो प्रकार.
चाट बास्केट माझी आई करते.
चाट बास्केट माझी आई करते. तिने मला काल तेच सांगितले
त्यात छोले, बटाट्याचे तुकडे, कांदा, टोमॅटो, हिरवी तिखट आणि गोड चटणी, वरतुन शेव. हेच करेन बहुदा. आई बास्केट च्या पुरीत थोडा ओवा पण घालते म्हणाली...
त्याला 'बास्केट चाट' म्हणतात.
त्याला 'बास्केट चाट' म्हणतात. लिंकिंग रोडला 'ओन्ली पराठाज्' आहे तिकडे हा प्रकार अप्रतिम सुंदर मिळतो.
त्याला 'बास्केट चाट' म्हणतात.
त्याला 'बास्केट चाट' म्हणतात. पुण्यात एफ सी रोडला 'मनमित चाट' ['चैतन्य पराठाज्' शेजारी] आहे तिकडे हा प्रकार अप्रतिम सुंदर मिळतो.
हो त्या मनमीत कडे मी गेले
हो त्या मनमीत कडे मी गेले आहे. त्याच्याकडे 'फाऊंटन पाणीपुरी' पण मिळते. सॉलीड सही असतो तो प्रकार.
मी आणि माझ्या मावसभावाने तिकडे बरंच काय काय हादडलं. दुसर्या भावाने त्याच्यासाठी मनमीतकडचे गुलाबजाम पार्सल आणायला सांगितले होते. ते एवढे गरमागरम होते आणि मस्त खमंग वास सुटला होता. घरी जाताना आम्हाला दोघांना अगदी राहवेना, रस्त्यात बाईक थांबवून ते चार गुलाबजाम आम्हीच संपवून टाकले आणि वरून त्या भावाला सांगितलं की मनमीतकडे आज गुलाबजाम बनवलेच नव्हते.
Pages