Submitted by नीधप on 9 April, 2011 - 02:57
जुनी कविता परत टाकलीये
----------------------------------
खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.
मी आक्रसत रहाते स्वतःला.
त्याचा फोन..
एखादी धुंद आठवण..
एक गम्मतनाच..
जुनेपाने कपडे घालून वावर..
देहामनाची तगमग...
सगळं सगळं
त्या डोळ्यात टिपलं जातं.
मी आक्रसत रहाते..
चांदीचे डोळे तसेच मोठ्ठे दिसत असतात
खरंच
बिघडलीये ही काच
बदलली पाहिजे!
- नी
गुलमोहर:
शेअर करा
वा! खुप आवडली
वा! खुप आवडली
खिडकीची काच बिघडलीये. दोन
खिडकीची काच बिघडलीये.
दोन प्रतिबिंबं दिसतात हल्ली.
एक साधंच
एक डोळे वटारणारं.
देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.
>>> वाह मस्तच !!
ह्म्म्म्म ही बरीच जुनी
ह्म्म्म्म ही बरीच जुनी दिसत्ये. आवडली
व्वा... छान लिहीलंय.
व्वा... छान लिहीलंय.
मस्ताय पण खिडकी ऐवजी 'आरसा'
मस्ताय
पण खिडकी ऐवजी 'आरसा' ही उपमा वापरली असती तर?
आता थोडीफार बदलली आहेस का?
आता थोडीफार बदलली आहेस का? आधी 'आपलातुपला गंमतनाच' असा शब्द होता का?
सगळ्यांचे आभार.. डुप्या,
सगळ्यांचे आभार..
डुप्या, किमान दोन वर्ष जुनी आहे.
मंदार, खिडकीच्या काचेत प्रतिबिंबं दिसणं इथूनच बिघडलंय ना. ते असो. मला लिहिताना खरोखरच्या खिडकीच्या काचेत प्रतिबिंबं दिसली आणि पुढचं सुचलं इतकंच.
मंजू, आपलातुपला गंमतनाच वेगळ्या कवितेतलं आहे. गमतीची गोष्ट असं शीर्षक आहे त्या कवितेचं. आहे माझ्या पाखु मधे.
नी, छानच आहे कविता...
नी, छानच आहे कविता...
आवडली..
आवडली..
होती लक्षात!
होती लक्षात!
गमतीची गोष्ट असं शीर्षक आहे
गमतीची गोष्ट असं शीर्षक आहे त्या कवितेचं>> तिची लिंक टाक ना माझ्या विपुत प्लीज
देवाच्या चांदीच्या
देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.
सही! खूप खूप आवडली.
आशय सुंदरच!! आवडला!!
आशय सुंदरच!! आवडला!!
स्मृती जागृत होणं, मनातलं
स्मृती जागृत होणं, मनातलं द्वंद्व/तगमग
याची वेगळ्या पद्धतीतील अभिव्यक्ती आवडली.
देवाच्या चांदीच्या
देवाच्या चांदीच्या डोळ्यांसारखे
माझेच डोळे
काचेत बसून रहातात.
आवडली कविता.
भिडेकाकांशी सहमत !
शुभेच्छा!
बिघडलीये ही काच >>> काच
बिघडलीये ही काच >>> काच बिघाडायला ती काय कार आहे की मोबाईल ? लोकांना काय लिहाव ते सुद्धा कळत नाही. काहीतरी फालतु लिहिलय.
आधी वाचली होती त्यात काही बदल
आधी वाचली होती त्यात काही बदल केला आहे का? समथिंग इज मिसिंग.
चांदिचे डोळे चोरलेले असतात हा
चांदिचे डोळे चोरलेले असतात हा संदर्भ काढून टाकलाय. अनावश्यक वाटायला लागला मला आणि उगाचच कन्फ्युजिंग.
येस्स! आणि मला वाटतं की
येस्स! आणि मला वाटतं की त्यावरुन गेल्यावेळेस जरा खडाखडीही झाली होती! (अस्ल्या गोष्टी बरोबर लक्षात राहतात
)
ए, सहीच झालीय गं. आवडली मला.
ए, सहीच झालीय गं. आवडली मला.
खडाखडी? हो का रे? मला नाही
खडाखडी? हो का रे? मला नाही लक्षात. पण तो संदर्भ गोंधळ निर्माण करणारा होता नक्की.
चांगलीच जमलिये, शब्द आणि
चांगलीच जमलिये, शब्द आणि भावना एकदम नेमक्या..
आधीही वाचली होती. आवडलीय
आधीही वाचली होती. आवडलीय
मुक्तछंदाचा स्वतःचा असा एक फ्लेवर आहे. चौकटीत बसवायला शब्दांची अनावश्यक ठिगळं लावावी लागत नाहीत.
खासच.
खासच.
मला आठवली ती जुनी कविता आणि
मला आठवली ती जुनी कविता आणि त्यावरचे प्रतिसादही
आगाऊशी सहमत !!
खुप छान आहे ग.
खुप छान आहे ग.
आमचे येथे बिघडलेल्या काचा
आमचे येथे बिघडलेल्या काचा दुरुस्त करुन मिळतील
का. चा. भंगारवाले
अम्या... धन्य!! जा आता दुसरी
अम्या... धन्य!! जा आता दुसरी अजून एक टाकलिये तिथेही जाऊन टवाळक्या कर.
नी, नेमकं काय बिघडलंय काच कि
नी, नेमकं काय बिघडलंय काच कि आख्ख घर?
घरघर जास्त जाणवली म्हणून विचारलं.
बाब्या, तु तर 'हिरकणी' गावल्यासारखाच बोलायला लागलायेस जणू ! गावली असेल तर तुकडोंमे बाट लेंगे.
आवडली.
आवडली.