ब्रेकिंग न्युज — ४ मायबोलीकरांनी सर केला वसईचा किल्ला

Submitted by जिप्सी on 24 March, 2011 - 01:18

ब्रेकिंग न्युज...............ब्रेकिंग न्युज...............ब्रेकिंग न्युज

नमस्कार,

मायबोली दूर्गभ्रमण चॅनेलवरच्या "ब्रेकिंग न्युज"मध्ये मी योगेश२४ आपल्या सर्वांचे स्वागत करतो. नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार होळीच्या दिवशी ४ मायबोलीकर (जिप्सी, यो रॉक्स, रोहित एक मावळा आणि दिपक डि*) वसईचा किल्ला सर करून आले.
(*दिपक डि हा मायबोलीवर नविन आयडी असुन त्याचे प्रतिसाद फक्त जिप्सीच्या पोस्टवर असल्याने तो जिप्सीचा डुआय असावा असा दाट संशय आहे.)

सर्वप्रथम जाणुन घेऊया त्याबाबतच्या ठळक बातम्या जाणुन घेऊया आमच्या वसईच्या प्रतिनिधीकडुन.

१. शुक्रवारी रात्री वसईच्या किल्ला सर करण्याचा कट शिजला. जिप्सी आणि त्याचा मित्र असे दोघेच जाणार होते पण आदल्या दिवशी मायबोलीकर यो रॉक्स आणि रोहित-एक मावळा (रोमा) येण्यास तयार झाले आणि दोनाचे चार झाले.

२. सकाळी सकाळी ठिक ५:३५ वाजता कोपर स्टेशनवर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर रोहित आणि प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर जिप्सी, दिपक आणि (पुन्हा) रोमा यांची जॉगिंग.

३. ठिक ६:३० वाजता तिघे वसई स्टेशनला पोहचले. तब्बल अर्धा तास उशिराने यो रॉक्स याचे आगमन.

४. मायबोलीकर एक पाकळी यांच्या खास आग्रहास्तव हॉटेल "ऋषिकेश" येथे अल्पोपहार आणि उशीरा आल्याबद्दल यो रॉक्सला अल्पोप्रहार.

५. सकाळी ७:३५च्या नवघर-किल्ला गाडीने किल्ल्याकडे प्रयाण

६. सकाळच्या मस्त वातावरणात विविध पक्ष्यांचे दर्शन आणि त्यांचे काढलेले फोटो

७. किल्याच्या मजबूत तटबंदीवरून किल्ल्यावर प्रभात फेरी.

८. किल्ल्याच्या मुख्य भागात अकस्मात अप्सरा, मुन्नी, शिला आणि चुलबुल पांडेचे आगमन आणि त्यांचा भन्नाट नृत्याविष्कार.

९. भरपूर फोटोसेशन (स्वतःचे आणि किल्याचे)

१०. बर्फाचा गोळा खात मुंबईकडे प्रयाण

बातम्या विस्ताराने:

वसई, १८ मार्च/विशेष प्रतिनिधी
पेबच्या ट्रेकने थकविल्यानंतर जवळपास दोन-तीन आठवडे जिप्सी कुठेच गेला नव्हता आणि या भर उन्हात कुठे जायला कुणी तयारच होत नव्हते. त्यामुळे एखादा छोटासा भुईकोट किल्ला करायचा असे मनात आले. यासाठी पहिल्यांदा जिप्सी आणि त्याचा मित्र दिपक असे दोघेच जायचे ठरले. पण आदल्यादिवशी अजुन दोन मायबोलीकर यो रॉक्स आणि रोहित-एक मावळा तयार झाले आणि दोनाचे चार (भटके) झाले. होळीचा दिवस असल्याने संध्याकाळी लवकर घरी पोहचावे म्हणुन सकाळी ५:४०ची डोंबिवली-बोईसर या गाडीने वसईला जायचे ठरले. जिप्सी (विक्रोळी), रोहित उर्फ रोमा (ठाणे) आणि दिपक (डोंबिवली) असे तीघांनी ५:३५ पर्यंत कोपर स्टेशनवर यायचे नक्की केले.

कोपर स्टेशनवर जिप्सी आणि दिपक वेळेत हजर, पण रोहितचा पत्ता नाही. फोन केला असता दिवा स्टेशन क्रॉस केले आहे असे समजले. इकडे कोपर स्टेशनवर बोईसर गाडीची अनाऊन्समेन्ट झाली तरी रोहितची ट्रेन काही येताना दिसली नाही. हि ट्रेन चुकली तर परत ठाणे किंवा दादरला जाऊन वसई गाठायचे ठरले. पण थोडयाच वेळात रोहित येत असलेली ट्रेन दिसली. ट्रेनमधुन उतरताच रोहितची जॉगिंग सुरु झाली. एकमेकांशी ओळखही न करून घेता ताबडतोब तीघेही प्लॅटफॉर्म क्रमांक तीनवर (कोपर स्टेशनवर वसईला जाण्यासाठी प्लॅटफॉर्म वरती आहे) जाण्यासाठी जॉगिंग करू लागले. एव्हाना गाडी प्लॅटफॉर्मला लागली आणि तिघांनीही धावत पळत जाऊन एकदाची गाडी पकडली. गाडीतच जिप्सीने रोहित आणि दिपकची ओळख करून दिली. त्यावर रोहित म्हणाला, जिप्सी अरे आपणही आजच पहिल्यांदा भेटतोय ना?" (खरंच मायबोली, प्रचि/लेख यावरचे प्रतिसाद, विपु यामुळे कधी वाटलंच नाही कि पहिल्यांदा भेटतोय. इतकी Virtual ओळख आधीच झाली होती.)

ठिक ६:३० वाजता तिघांचेही वसईला आगमन. यो रॉक्सला फोन केला असता तो बोरीवलीला होता (:प्रचंड चिडलेले तीन बाहुले:) त्याला येण्यास अवधी होता आणि बाकी तिघांना वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. तेव्हढ्या वेळेत नाश्ता करून घेऊया असे सर्वानुमते ठरले आणि मायबोलीकर एक पाकळी यांचा जिप्सीला फोन आला. त्यांनी सांगितले कि स्टेशनजवळच "ॠषिकेश" हॉटेलमध्ये नाश्ता करा आणि "बिल दिल्यावरच" माझे नाव सांगा. (:दात काढुन हसणारा बाहुला:). त्यांच्या सांगण्याप्रमाणे हॉटेल नाश्ता करण्यासाठी तिघांनी प्रयाण केले. अल्पोपहार करत असतानाच यो रॉक्स याचे आगमन झाले आणि उशीरा आल्याबद्दल दोघांनी त्याला अल्पोपहार ऐवजी अल्पोप्रहार दिला.

एक पाकळी यांनी सांगितल्याप्रमाणेच वसई डेपोतुन नवघर-किल्ला गाडीतुन वसईचा किला सर करण्याकरीता चार मायबोलीकर निघाले. साधारण अर्धा-पाऊण तासातच किल्ल्याजवळ पोहचले. यो रॉक्स आधी जाऊन आला असल्याने यावेळी तोच इतरांचा गाईड होता. सकाळच्या प्रसन्न (होय, कडक उन्हाळा असला तरी) वातावरणात या मिनी ट्रेकला सुरुवात झाली. सुरुवातीलाच शाल्मलीच्या (काटेसावर) फुलांनी बहरलेले झाड आणि त्यावर भिरभिरणारी पाखरं दिसली. त्यांनाच टिपण्यासाठी लगेच तीन कॅमेरे सरसावले आणि पक्ष्यांचे फोटोसेशन सुरू झाले. पण काढलेले काही काही फोटो असे येत होते कि मायबोली आस्चिग यांच्या "हा पक्षी कोणता ?" या बाफवर हे सगळे फोटो देऊन त्यांची ओळख पटवून घेण्याचे ठरले.

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

फोटोसेशन झाल्यावर किल्ल्याच्या मजबूत तटबंदीवरून किल्ला भटकंतीला सुरुवात झाली. वाटेतच ताडाची (कि माडाची????) झाडे आणि त्याखाली ठेवलेली मडकी दिसली. त्यातल्याच एका झाडावरून थेंब थेंब पडणारी पहिल्या धारेची चाखण्याचा मोह रोहित आणि यो ला आणि त्यांचे फोटो काढण्याचा मोह जिप्सीला आवरला नाही. अर्थात पहिल्या धारेची चाखण्याआधी उडी मारून फोटो काढण्याचा "उडीबाबा" हा पारंपारीक कार्यक्रम यथासांग पडला होता. अशाच प्रकारे धम्माल मस्ती करत, विविध पक्षी, फुले, झाडे यांचे फोटो काढत, त्यांना पाहत किल्याची प्रदक्षिणा सुरु झाली.

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९
उडीबाबा!!!

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

(सर्व प्रकाशचित्रे रोहितच्या कॅमेर्‍यातुन आमच्या कॅमेरामन यो रॉक्सने काढले आहेत)

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

अशीच हि किल्ला भटकंती चालु असताना किल्ल्याच्या मध्यभागी यो रॉक्सने आपल्या मायबोलीप्रसिद्ध नृत्यअविष्कार दाखवण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला सोबत होती ती रोहित उर्फ रोमाची. पहिल्यांदा यो च्या रुपाने अप्सरा आली आणि धम्माल उडवून दिली, त्या नंतर त्याला साथ लाभली ती रोमाची (यावेळी यो ने अप्सरा नृत्याविष्काराचे धडे रोहितला हि दिले, म्हणजे पुढच्या ट्रेक पर्यंत दोन अप्सरांची जुगलबंदी बघायला मिळणार तर). जिप्सी आणि पहिल्यांदाच असे भन्नाट नृत्य पाहणारा दिपक यांची हसुन हसुन पुरेवाट झाली. नंतर खास आग्रहास्तव मुन्नी आणि शिला यांनाही स्टेजवर बोलाविण्यात आले. शिला आणि मुन्नी नाचुन गेल्यावर परत आपले दोन चुलबुल पांडे चुळबुळ करत, "हुड हुड दबंग दबंग" करत स्टेजवर मनसोक्त हुंदडले.

प्रचि २०

या नृत्याबाबत यो आणि रो चे काय म्हणणे आहे ते आमच्या वसईच्या प्रतिनिधीकडुन जाणुन घेऊया.

Over to आमचा वसईचा प्रतिनिधी

आमचा वार्ताहर : रो, यो याबाबत आपले काय म्हणणे आहे?

(पलिकडे शांतता. )

आमचा वार्ताहर : यो, रो माझा आवाज ऐकु येतोय का?

(पुन्हा शांतता)

व्यत्यय

:लालचुटुक सफरचंदामधुन हिरवीगार किड बाहेर येतानाचा फोटो:

क्षमा असावी. काही कारणास्तव आमच्या वार्ताहराचा त्यांच्याशी सध्या संपर्क होऊ शकत नाही. तरी ते त्यांचे म्हणणे त्यांच्या प्रतिसादातुन येथे मांडतीलच.

अशा प्रकारे मनोरंजनाचा कार्यक्रम पार पाडल्यांनतर किल्ल्याचा उर्वरीत भाग पहावयास सगळे निघाले. स्वत:चे आणि किल्ल्याचे मनसोक्त फोटो काढुन घेतल्यावर परतीच्या मार्गावर निघालो. वाटेत बर्फाचा गोळावाला दिसला आणि मग काय २ काला खट्टा आणि दोन मिक्स असे गोळे/चम्मच गोळे घेऊन खाऊन या मिनी ट्रेकची सांगता झाली. साधासा, छोटासा असा हा ट्रेक असल्याने वृतांत कमी आणि क्षणचित्रे जास्त आहेत. :हळुच हसणारा बाहुला:

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५
c

प्रचि ३६

प्रचि ३७
एकही स्मायली (हास्यचित्रे) न टाकता दिलेल्या या होत्या आतापर्यंतच्या बातम्या पुन्हा भेटुया पुढच्या ट्रेक वृतांतामध्ये तो पर्यंत नमस्कार.

===============================================
===============================================
कुठलेहि पूर्वनियोजन न करता केलेला एखादा छोटासा ट्रेकही किती आनंद/समाधान देऊन जाते हे या वसई किल्ल्याच्या भटकंतीत समजले. :पुन्हा अशाच सुंदर ट्रेकच्या प्रतिक्षेत असलेला बाहुला:

प्रचि ३८

===============================================
===============================================

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मामी, आशु, अम्या, वर्षा, रचु प्रतिसादाबद्दल धन्स Happy

साप नाही दिसले का ? हरणटोळ दिसतात, बर्‍याच वेळा तिथे.>>>>दा, नाही ना दिसला. Sad

नुसते फोटोंतून आणि वर्णनातून भेटताय...प्रत्यक्ष भेटा की राव आता...>>>>>आशु, भेटु कि नक्की एका ट्रेकला किंवा भटकंती गटगला. Happy

अरे असा छोटासा (न दमवणारा) कार्यक्रम असेल तर कळवत जा की रे>>>>अम्या, पुढच्या वेळेस नक्की रे Happy

फोटो छान आलेत. सॉरी पण हा किल्ला तसा सोपा आहे ना ? मग ब्रेकिंग न्युज का ? मी तिथे जाऊन आले आहे. वसईला दोन किल्ले आहेत का ?

प्रतिसादाबद्दल धन्स, सिंडरेला Happy

सॉरी पण हा किल्ला तसा सोपा आहे ना ? मग ब्रेकिंग न्युज का ? मी तिथे जाऊन आले आहे. वसईला दोन किल्ले आहेत का ?>>>>>भुईकोट किल्ला आहे. सोप्पाच आहे पण थोड्या वेगळ्या प्रकारे वृतांत लिहायचा म्हणुन "बातम्या" हि थीम घेतली आणि हे सर्व "ब्रेकिंग न्युज" (या शब्दा) शिवाय Happy संपूर्ण नाही म्हणुन शिर्षकात तेच लिहिले Proud

जिप्सीला भुईकोट असो वा डोंगरावरचा किल्ला असो.. त्याला अवघडच वाटतात.. म्हणून ब्रेकींग ! Wink Proud

जिप्सीला भुईकोट असो वा डोंगरावरचा किल्ला असो.. त्याला अवघडच वाटतात.. म्हणून ब्रेकींग ! >>>>:फिदी:

रैना, सह्हीये फोटो Happy

व्वा. जिप्सी, ठळक बातम्या आणि विस्तारीत बातम्या दोन्ही स्पष्ट ऐकू आल्या. धन्यवाद. Lol
फोटो तर मस्तच.
यो. चे वर्णन व फोटो पण छानच.
रैना, तुमची 'रोझी स्टारलिंग' भारीच.

जिप्स्या अत्यंत सुरेख फोटो, एक ही कमी आवडला म्हणून सांगण्याजोगा नाही.
माझा सलाम तुझ्या फोटोग्राफिला.. Happy
आवडत्या १०त.. Happy

उत्तम प्रकाशचित्रे.... Happy
माझ्या मुलुखात आला होतात..पण मीच मुलुखगिरीवर(!) असल्याने भेट झाली नाही...

Pages