कोडे

Submitted by कल्पी on 22 March, 2011 - 11:31

जीवन कोडी सोडवताना
एक कोडे राहुन गेले
रक्ताला कोड्यात टाकले
आणी कुणी वाहुन गेले

दाटी होते अशीच
रोजच्या पेपरात
चौकोनातले शब्द
अडकले पुन्हा पाशात

गपगार चिवट
अडखळणारी ती वाट
कसं कुठे जुळावे
दुभंगलेले ते घाट

एका एका चौकोणात
चेहरा तुझा बसलेला
कोप-यात निमुटपणे
निटनेटका नटलेला

आता कोरा कोरा
चौकोन चौकोण दिसतो
हाताळणारा तो हात
वर जाऊन हसतो

नाराज झाले सारे
पसरले सोफ़्यात
दाता गेला आमचा
म्हणुन आसवे पूसतात

कोडी पडावी शब्दांना
असेच तुम्ही होते
राग लोभ सारे विसरुन
आमच्यात गुंतत होते

कल्पी जोशी
२२/०३/२०११

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

कल्पी.. कविता नीट नाही गं समजली. नक्की कशावर आहे?
मृत्यूनंतर पेपरात फॉटो वगैरे येतात .. त्यावर आहे का?