कारण शिवाजी, राम, भारतीय संस्कृती, अल्ला, आंबेडकर, भाषा यांच्या नावावर समाजात द्वेष पसरवणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, हा माझ्या मते शुध्द हलकटपणा आहे. डोकं अधू असलं की अशा सारख्या भावना दुखावतात.
आणि 'मुंबई-बाँबे' हाच जर मुद्दा असेल तर 'जर्मन बेकरी', 'पॅरीस ड्रायक्लीनर्स', रफीचं 'जापान्..लव ईन टोकीयो', या सर्व गोष्टी आधी बाद व्हायला हव्यात.
मुळात शाळा, कोर्टाच्या बोर्डावर बाँबेऐवजी मुंबई केलं, किंवा मराठेशाही ब्राह्मणांमुळे बुडाली, तुकाराम हेच शिवाजीचे खरे गुरू, हे मान्य केलं, किंवा चौकाचौकात, समुद्रात, प्रत्येक नदीत, तलावात शिवाजी, आंबेडकरांचे पुतळे उभारले, किंवा कोकणस्थ चित्पावनांचं 'आम्ही बुवा सगळ्यांत हुश्शार आणि सर्वश्रेष्ठ' हे मान्य केलं, तरी मला, किंवा वैशालीबाहेर फुगे विकणार्या लहान मुलांना, महिनाभर पेन्शन पुरवणार्या माझ्या आजीला, एंड्रीन पिणार्या शेतकर्यांना काय फायदा? एखादं आंदोलन करण्याइतपत हे फालतू मुद्दे महत्त्वाचे वाटूच कसे शकतात? 'एकविसाव्या शतकात आपली जात, भाषा, धर्म आपल्या घरात ठेवून घराबाहेर केवळ एक भारतीय म्हणून वावरावे' ही अक्कल पुढार्यांना नाहीच, पण बहुसंख्य भारतीयांना पण असू नये?
मराठा महासंघ, कोकणस्थ/देशस्थ ब्राह्मण संघ, बसपा/रिपाईं, पतित पावन/सनातन, संभाजी ब्रिगेड यांपैकी एकाही टोळक्याच्या नेत्याने अथवा कार्यकर्त्याने १० दिवससुद्धा खरोखर समाजोपयोगी काम केल्याचे संभवत नाही. बंग, आमटे, लवटे ही आडनावं धारण केलेली काही मंडळी समाजासाठी राबत असतात, याचा गंधही या लोकांना नसणार. अन्यथा ग्रंथालयाची तोडफोड करायला, किंवा नाट्यगृहात बाँबस्फोट करायला वेळच मिळाला नसता.
आनंदवनातली १५० अपंग, मूकबधिर मुलं पुढच्या महिन्यात विदर्भातल्या शेतकर्यांसाठी मुंबई, पुण्यात ऑर्केस्ट्रा करणार आहेत. नसीमा हुरजूक अजूनही व्हीलचेयरवरून पैसा मागत हिंडतात. आणि आपले नेते क्रिकेट मॅच बघण्यात, शिकार करण्यात, लोकांना, पाट्यांना काळे फासण्यात मग्न असतात.
सिंधूताई सपकाळांच्या पायात अजून चप्पल नाही, याची एकाही भारतीयाला लाज वाटू नये?
देशप्रेम आणि दुखावणार्या भावना
Submitted by चिनूक्स on 18 June, 2008 - 00:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
chinoox, चांगले
chinoox, चांगले विचार मांडलेत, मला तरी पटलेत.
'एकविसाव्या शतकात आपली जात, भाषा, धर्म आपल्या घरात ठेवून घराबाहेर केवळ एक भारतीय म्हणून वावरावे' ही अक्कल पुढार्यांना नाहीच, पण बहुसंख्य भारतीयांना पण असू नये?
--- आपण काय भुमिका घेतली म्हणजे बहुसंख्य लोकं आपल्या मागे येतील याचा अंदाज घेऊन पुढारी भुमिका (तत्व!) ठरवतात. त्यांना व्यक्तिशः त्या मुद्यांमधे रस असतोच असेही नाही, पण जनतेसाठी सर्व काही सहन करावे लागते.
डोकं अधू
डोकं अधू असलं की अशा सारख्या भावना दुखावतात. >> खरय. पण गम्मत अशी आहे की असा विचार करनारे लोक वेडे की आपण जो तसा विचार करत नाहीत ते वेडे हे ठरवन आजच्या भारतीय समाजात अवघड झालय. बहुतांश भारतीय समाज डोक्याने अधु असल्यामुळे त्यांना त्यांचेच खरे वाटते.
मराठा महासंघ, कोकणस्थ/देशस्थ ब्राह्मण संघ, बसपा/रिपाईं, पतित पावन/सनातन, संभाजी ब्रिगेड यांपैकी एकाही टोळक्याच्या नेत्याने अथवा कार्यकर्त्याने १० दिवससुद्धा खरोखर समाजोपयोगी काम केल्याचे संभवत नाही. >> अतिशय योग्य व परखड मत. ज्यांना समाज म्हणजे फक्त आपली जात असे वाटते ते समाजात वावरायला पण घातक आहेत. बर झाल ते काम करत नाहीत.
आजच्या म टा मध्ये साहेबांनी (पवार) अग्रलेख लिहीलाय. दुतोंडीपणाचे हे फार मोठे उदाहरण आहे. ज्या मेट्याला आबा झाकतात त्याला पवार उघडे पाडतात. आणि दोघेही एकच.
बंग, आमटे,
बंग, आमटे, लवटे ही आडनावं धारण केलेली काही मंडळी समाजासाठी राबत असतात, याचा गंधही या लोकांना नसणार.
अगदी बरोबर. तिकडे राहूल गांधीने पावटे खाल्ले याची बातमी छापून येते, कुमार केतकर सोनियावर स्तुतिपर लेखावर लेख लिहितो. त्याने कधी बंग, आमटे यांच्याबद्दल काही लिहीले आहे? त्या लोकांनी काही चांगले केले आहे त्याबद्दल काही लिहीले?
कुणा तोडफोड करणार्या लोकांनी बंग, आमटे यांना मदत केली आहे? ते सत्पुरुष कुणाचीहि जातपात न बघता, केवळ मदत करतात. त्यांना स्वतःसाठी पैसा, मते काही नको.
मला वाटते काही वृत्तपत्रकारांनी केवळ या सत्पुरुषांचे कार्य कायम समाजासमोर ठेवण्याचे कार्य केले तर बरेचसे लोक त्यांच्या कार्याकडे आकृष्ट होतील. आहेत का कुणि वर्तमानपत्र चलवण्याचा, प्रसिद्धि करण्याचा अनुभव असलेले लोक, जे मदत म्हणून हे काम करू शकतील?
चिनूक्स,
चिनूक्स, इतकं परखड, प्रांजळ आणि विचार करायला लावणारं काही खूप दिवसांनी वाचलं!
>>>>>>>>आनंदवनातली १५० अपंग, मूकबधिर मुलं पुढच्या महिन्यात विदर्भातल्या शेतकर्यांसाठी मुंबई, पुण्यात ऑर्केस्ट्रा करणार आहेत. नसीमा हुरजूक अजूनही व्हीलचेयरवरून पैसा मागत हिंडतात. आणि आपले नेते क्रिकेट मॅच बघण्यात, शिकार करण्यात, लोकांना, पाट्यांना काळे फासण्यात मग्न असतात.
सिंधूताई सपकाळांच्या पायात अजून चप्पल नाही, याची एकाही भारतीयाला लाज वाटू नये?<<<< कोडगेपणाची झूल पांघरून बसणारे लोक आम्ही!
चिनूक्स,
चिनूक्स, इतकं परखड, प्रांजळ आणि विचार करायला लावणारं काही खूप दिवसांनी वाचलं!.....>>>खरय.
आहेत का कुणि वर्तमानपत्र चलवण्याचा, प्रसिद्धि करण्याचा अनुभव असलेले लोक, जे मदत म्हणून हे काम करू शकतील?>>
अशी कामे वेळोवेळी प्रसिध्द होत असतात नाहीच असे नाही. पण समान्य माणसे मुख्यत्वे मध्यमवर्गीय (वर म्रुणमयीने लिहिल्याप्रमाणे कोडगेपणाची झूल पांघरून बसणारे लोक आम्ही ,अगदी मी सुध्दा)अरे वा छान म्हणुन गप्प बसतात. प्रत्यक्श मदत करायची वेळ आली की नाही हो वेळ नाही,पैसे नाहीत म्हणुन पळ काढतात.ह्याच लोकान्कडे shopping mall,cosmetics,muliplex,hotelling वर उडवायला पैसा असतो आणि वेळही असतो.अस काही वाचले की थोडी लाज वाटते स्वतःची ,पण आता कोडगेपणा इतका भिनलाय की विसरुन जायलाही वेळ लागत नाही.
असा
असा कोडगेपणा घालविन्यासाठी देशप्रेमाची लाट मोठ्या स्वरुपामध्ये आणने भाग आहे पण सध्या तशी कुठलीही राजाकिय पार्टी नाही. मी पार्टी हे जाणिवपुर्वक लिहीले आहे कारण आपण भारतीय मुळात देशप्रेमी नाही आहोत. आपले देशप्रेम हे बेगडी आहे. (अपवाद आहेतच पण बाकी ९०%)
आम्ही साधे माणस आम्ही काय बदल आणनार? हा विचार आला की आपल्यातला कार्यकर्ता सपंतो. उलट आपल्यासारखे १०,००० साधे माणसंच बदल आणु शकतात. शिवाय हा बदल नुसत्या पैशांनी येनारा नाही कारण आपल्याला समाजाच्या सध्याच्या विचारसरनीला बदलायच. आर्थीक बदल हवाच पण त्या पेक्षा वैचारीक सध्या जास्त आवश्यक आहे.
आम्ही काय करनार? मदत तरी कोणाला करावी? तिकडे लोकच तसे? पैसे खाणारे भ्रष्टाचारी त्यामुळे आम्ही मदत करनार नाही असेही म्हणने चुक. बर्याच लोकांना कागदी बडबड करायची फार सवय असते. ते लोक पण घातकच कारण त्यांना बदल हवा असतो पण ते स्वत बदल घडवुन आणायला तयार नसतात. मग ते आपली शिक्षीत मत मित्रांवर लादत फिरत असतात. मागे एकानी तर भारत सुधारवन्यासाठी भारत सोडा व ऐन आर आय व्हा हा बीबी काढला होता. त्यातला उद्वेग मी समजु शकतो पण शिक्षीत लोकांनी तरी ही मेंटॅलीटी बदलायला हवी. स्वत काम तर करत नाहीत वर दुसर्यांना शिव्या देने हा आजकाल लोकांचा धर्म होत चालला आहे. फार कशाला अगदी मायबोलीवरही या व अशा बीबी वर लिहीनार्याला काय म्हणतात हे ईकडे तिकडे फिरल्यावर सहज दिसुन येईल.
गरज आहे ती या अशा चर्चेतुन मी काही तरी काम करेन हा विचार मनात निर्मान होऊन त्यावर हालचाल करन्याची. (उसासा सोडन्याची वा स्वतला कोडगे म्हणुन गप्प बसन्याची तर नक्कीच नाही) निदान माझ्या गावात / गल्लीत / जिल्ह्यात मी काही समाज कार्य करेन ज्यामुळे माझे जे समाजासाठी देने आहे ते मी फेडायचा प्रयत्न् करेन. भलेही मग ते चिचार कुठलेही असो, उजवे, डावे तरी चालतील पण हालचाल मात्र करावी. कारण तशी वेळ आत्ता आहे.
अगदी डिव्होशन देऊन एक दोन वर्षे द्यायची गरज नाही तर रोजच्या वेळातील १ १/२ तास दिला तर हा बदल सहज येऊ शकतो.
काम करायचे असेल तर काय करावे ह्या आयडियाज आपोआप येतात. कामच करायचे नाही म्हणल्यावर सर्व खेळच खल्लास.
केदार
केदार योग्य लिहिलं आहेस!
>>>उसासा सोडन्याची वा स्वतला कोडगे म्हणुन गप्प बसन्याची तर नक्कीच नाही<< अगदी मान्य! भारताबाहेर असताना आर्थिक सोडून आणखी कशी मदत मी करू शकते?
>>>>देशप्रेमाची लाट मोठ्या स्वरुपामध्ये आणने भाग आहे पण सध्या तशी कुठलीही राजाकिय पार्टी नाही. <<< देशप्रेमाची लाट आणणं म्हणजे नेमकं काय? ती आणणार कशी? बरं आणायची म्हंटलीच तर त्यासाठी राजकीय पार्टी कशाला हवी?
लाट म्हणजे
लाट म्हणजे नेमकं काय? >>
आपण (भारतीय) हे ईतर देशींयाऐवढे देशप्रेमी नाही आहोत. कुठल्याही सरकारी ऑफीस मध्ये गेल्यावर पैसे देऊन काम करवुन घेने हा आपला विचार. रस्तात खड्डा असेल तर असेनाचा मी चुकवुन जाईन, रस्तावर बेवारशी प्रेत आहे, पडेनाका मला उशीर होतोय, मारामारी चाललीय, की कशाला पोलीसाला बोलावू? ऍक्सीडेंट झालाय, ठिकाय एक तर मेलाय ६० रुला कांदा भेटतोय , मी घेऊ शकतो ना मग झाले ही आपली वृत्ती, ( हे फक्त उदा आहेत).
या सर्व प्रश्नांच्या तळाशी "मी" आहे "आपण" नाही. ज्या दिवशी तिथे आपण, भारत, असे पहिलेंदा दिसेल त्या दिवशी तो समाज बदलेले. आपण (तु आणि मी) अमेरिकेत राहतो व येथील व्यवस्थेचे गुणगाण करतो. ९११ चे कौतुक करतो. ह्या व्यवस्था आणन्याचे श्रेय येथील समाजाला आहे, त्यांचा कॉमन मानसीकतेला आहे. ती कॉमन मानसिकता आणने म्हणजे देशप्रेमाची लाट आणने असे मला वाटते.
ती कशी आणु शकतो? >> माहीत नाही. कारण आपण ईतके "स्व"त्व जपनारे झालोत की शेजारी १० रु साठी दिवसभर काम करनारा माणुस आपल्याला "दिसत" नाही. तो दिसला की आप्ण भरकन किक मारुन निघून जातो.
बरं आणायची म्हंटलीच तर त्यासाठी राजकीय पार्टी कशाला हवी >> खरे तर नकोय. पण सध्या जी नेतेगीरी व त्यांची गुंडागर्दी आपण पाहतोय ती बर्याच जनांना ड्राईव्ह करतेय. फक्त काही वैचारीक लोक समाज बदलु शकत नाहीत तर समाजाने जेव्हा बदलायचे ठरवीले तेव्हा तो बदलतो. हेड कमांड ने सांगीतले की काम करनारे लोक आहेत त्या लोकांचा योग्य वापर करुन घेन्यासाठी राजकिय पार्टी असे लिहीले . मला माझ्या मामाने एकदा सांगीतले होते तुला डब्बा बनायचे का ईंजींन? मी त्याला विचारले की दोन्ही म्हणजे काय? तर ड्ब्बा म्हण्जे हे तळगाळातील कार्यकर्ते. पण त्यांना ड्राईव्ह करनारा इंजीन आणि तो ही कधी काळी ह्या ड्ब्यांतुनच तयार झालेला तर आपल्याला हे दोन्ही हवे आहेत म्हणुन राजकिय पार्टी पण आवश्यक.
पण राजकीय पार्टी नाही म्हणुन आपण ड्ब्बा बनन्याचे सोडु नये. कारण ड्ब्बा बनायला राजकिय पार्टीची गरज नसते. आजच्या लोकसत्तेत औरंगाबाद मधील पंचशिल बचत गटाचा उपक्रम आला आहे.
भारताबाहेर असताना आर्थिक सोडून आणखी कशी मदत मी करू शकते? >> तु तुझ्या सोबत असनार्या भारतीयांना बदलु शकतेस. येथील भारतीय भारतात न जाताच भारताला जास्त नाव ठेवतात. त्यांचा वैचारीक बदल आणु शकतेस तो फार महत्वाचा आहे. शिवाय त्यांना काही संस्थांना आर्थीक साहाय करन्यास त्यांना भाग पाडु शकतेस, ईंटरनेटचा वापर करुन (जसे मायबोली) आपले विचार निदान १०० जनांपर्यंत पोचवु शकतेस.
देशातील एखाद्या संस्थेचे कार्य येथील मराठी मंडळत मांडु शकतेस जेने करुन त्या सस्थेंला साह्यय मिळेल. न जानो उद्या भारतात गेलीस तर ह्या तयार केलेल्या बेसमेंटंची नक्कीच मदत होईल व तुझ्यातिल लिडर ला वाव मिळेल व अशा अनेक आयडियाज आपोआप येतील.
मागे मी ऍडमीनना लिहीले होते की आपण वेगवेगळ्या विषयांवर निबंध लिहुन्याचा स्पर्धा (मायबोली युजर्स) घेऊयात. जसे मी पंतप्रधान झालो तर? आरक्षण का हवे का नको? सारख्या विषयावर. भावना बाजुला ठेवुन डोक्याने निंबध लिहीने. हे जरी मजेशिर वाटले तरी यात आपलेच वैचारिक मंथन होते, जे एका कार्यकर्त्याला आवश्यक असते.
आपण
आपण (भारतीय) हे ईतर देशींयाऐवढे देशप्रेमी नाही आहोत.
--- माझे थोडे वेगळे मत आहे, ईतर देशीय खुप काही देश प्रेमी असतात असे नाही. माझ्या बाहेरील वास्तव्यात मला कुठेही ओसंडून जाणारे देशप्रेम दिसलेले नाही. आपण भारतीय कशावर (देव, धर्म, देश, आई, गुरू, मित्र, शहर, प्रांत, भाषा) तरी प्रेम करतच असतो कधी ते आंधळं असते कधी डोळस.
जर ईतरांच्या मानाने आपण कुठे कमी पडत असु तर तो म्हणजे प्रामाणिकता या बाबत कमी पडु (ईकडे पण अप्रामाणिक लोकं आहेतच...). भ्रष्टाचार हा देखील त्या अप्राणिकतेचाच भाग आहे, तो मी इथे चर्चीत नाही. मी माझे दोन छोटे अनुभव सांगेल. सरकारी वर्कशॉप चे काम सकाळी ०८:०० ते सायंकाळ ४:३० असे असते. कार्यालयातच ९ वाजता येणार, मग ईतरांची विचरपुस/ बात चीत, अर्धा - पाऊण तास काम, मग १०:३० ला चहाची सुट्टी, ११:१५ ला पुन्हा कामाला लागायचे की ११:४५ पुन्हा थांबायचे कारण काटा १२:०० कडे वेगात सरकतोय -जेवणाची सुट्टी. असेच दुपारचे सत्र देखील, म्हणजे एकंदरीत जास्तीत जास्त २.३० ते ३ तास काम, या पेक्षा जास्त नाहीच. ३:३० नंतर तर दरवाजेच बंद (दुसर्या दिवशी तुमचे काम सर्वात प्रथम म्हणजे १०:३० ला करु हे आश्वासन!). मी NZ मधे होतो तेव्हा माझा मित्र ०८:०० वाजता आला की, ०८:०१ ला कामाला सुरवात, ५ मिनटात एव्ह्ढा तल्लीन होउन काम करणार की कामाच्या व्यातिरिक्त ईतर सर्व विसरणार. मग सलग १०:३० वजेपर्यत काम करणार, कॉफी च्या टेबल वरच ईतर गप्पा. दिवस भरात ७ तास काम होणारच. आपल्या कडची लोक कामे न करण्याची अनेक कारणे आहेत (पगार, आऱक्षण, सरकारी सौरक्षण) आणि तुलना करणे योग्य होणारही नाही पण जर एकत्रित विचार झाला तर नुकसान हे देशाचेच होते.
आता उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात, माझ्या विद्यापिठात एक फार नावाने मोठे असे पुर्ण वेळ प्राध्यापक होते, हेच महाशय मग अजुन ३-४ ठिकाणि पण कामे करायचे, ११ ला येणार आणि ११:३० ला सह्या करून जाणार, की पुढच्या ठिकाणि काम. ही सर्व कामे विद्यापिठाचीच होती पण प्रत्येक ठिकाणि एक पुर्ण वेळ व्यक्तिची अवशक्ता होती... पगार एकच, कामे तीन पदांचे... भ्रष्टाचार वगैरे नाही पण मी याला शुद्ध अप्रमाणिक पणा म्हणेल. हे म्हणजे कसे कृषी मंत्रालय आणि अजुन एक मोठे पद... आता कोण नाही म्हणेल की एका पदाचा दुसर्या पदाच्या कामावर परिणाम होत नाही? येथे व्यक्ती कितीही कर्तुत्वान असली तरी निर्णय घेण्यात दिरंगाई होतेच, जेव्हढा हवा तेव्हढा सखोल वेळ देऊ नाही शकत, पण मग त्याचे (दुष)परिणाम हे होतातच, आणि ते दिसत नाही.
दैनंदीन जिवनात आपण 'स्व'त्व थोडे जपतो, पण वेळ आलीच तर त्याला विसरतो देखील... मुंबई मधे बाँब स्फोट झाल्यावर आधी लोकच मदतीला धावतात, पावसाच्या पाण्याचे संकट आले तेव्हा लोकान्नीच सर्व काही विसरून मदत केली, किती तरी रेल्वे अपघातात आस-पास चे लोकच प्रथम मदतीला धावतात (पण एका- व्यक्तीला रस्त्यावर मदत करायला कां कचरतात?) - चहा, पाणि, जेवण देतात - याचे असंख्य उदाहरण देता येतील, किल्लारीला भुकम्प झाल्यावर मदतीचा ओघ (हा ओघ एव्हढा असतो कि मग नियोजन कमी पडते, आणि आपण हरतो).
चिनूक्स
चिनूक्स केदारजोशी, उदय - चांगली चर्चा चालू आहे. सगळ्याच पोस्टस प्रगल्भ आहेत. आम्ही वाचत आहोत आणि माहीतीत भर पडत आहे. नेहेमीच्या रहाटगाडग्यातून या विषयांवर सखोल चर्चा करण्याइतका वेळ तुम्ही देताय याबद्दल अभिनंदन.
केदार यार
केदार यार फार छान लिहिइल आहेस.
इतक मुलगामि चिंतन फार दिवसानि वाचल.
फारच छान.
अरे राज्कारानि काहि बदल घडवतिल अशि आशा का बाळ्गायचि.
प्रत्येकान थोडा हात्भार लावला तर हे सहज शक्य आहे.
च्यायला हे नविन पध्दतिन टाइप करणे फार अवघड जाताय.
चिनूक्स,
चिनूक्स, खूप परखड आणि सत्य लिहिले आहेत. केदार, तुझे पोस्ट्सही विचार करायला लावणारे आहेत.
चिनु, विचार
चिनु,
विचार अतिशय चांगले आहेत पण तुम्ही कोकणस्थ/देशस्थ ब्राम्हण संघ याना इतर राजकीय पक्षांच्या पंगतीत बसवलेले पाहुन जरा आश्चर्य वाटले.
देश/समाज म्हणजे देशातील माणसे..आणि त्यात मला वाटते कोकणस्थ/देशस्थ पण येतात नाही का?
कोकणस्थ/देशस्थ ब्राम्हण संघ आणि त्यांचे कार्य हे वधुवर सुचक मंडळ/लग्नासाठी हॉल उपलब्ध करणे/गरजु विद्यार्थ्याना शिष्यव्रूत्ती /व्याख्यान्माला वगैरे आहे. त्यातुन ते मर्यादीत प्रमाणात का होइना सेवा करत असतातच की. यातल्या एकाही संस्थेने जाळ्पोळ, दगड्फेक यासारख्या प्रकारात भाग घेतला असेल असे मला वाटत नाही.
तुम्ही दहा दिवस म्हणता पण माझ्या माहितीत या संस्था अनेक वर्षे चुप्चाप आपले काम करत आहेत.
समाजसेवा म्हणजे अगदी तळागाळासाठी काम करणे एवढाच अर्थ होतो का? सामान्य माणसासाठी कोणी काही केले ते फारसे फान्सी नसते किंवा ते काही फारसे छापुनही येत नाही याचा अर्थ ते काम स्वार्थासाठी केले आहे असा काढायचा का? हे कामही देशासाठी /समाजासाठी आहे असे वाटत नाही का?
जाळ्पोळ आंदोलने करणारे हे राजकीय हेतुने प्रेरीत असतात आणि त्यांचे एकमेव ध्येय हे खुर्ची मिळवणे हे असते याबाबत दुमत होण्याचे काही कारण नाही. हे सगळे बिनडोक लोक आहेत पण त्यांच्या माळेत तुम्ही (काहीसे मर्यादीत का होइना) विधायक कार्य करणार्याना बसवता हे काहीसे योग्य नाही वाटले.
धन्यवाद.
येथील
येथील भारतीय भारतात न जाताच भारताला जास्त नाव ठेवतात.
१०० टक्के अनुमोदन. विशेषतः जे अनेक वर्षांपूर्वी आले आहेत, ज्यांनी फक्त नेहेरूंचे राजकारण पाहिले आहे, त्या लोकांचे असे असते. तिथे काही प्रगति झाली असेल हे त्यांच्या गावीहि नाही.
खरे तर जाळपोळ करणारे, राडा करणारे यांना जास्त प्रसिद्धी देण्यापेक्षा, शहाण्या बातमीदारांनी चांगले वेचक, अचूक प्रश्न त्यांना विचारून, त्यांच्या उत्तरावर टीका (संस्कृत अर्थाने, म्हणजे नुसतेच त्याला नावे ठेवणे नव्हे, तर त्यात काय बरोबर असेल तर तेहि सांगणे) असलेले लेख छापावेत. निदान शिकलेले लोक तरी ऐकतील.
तिथे इथल्या ६० मिनिट्स सारखा शो नाही का? ज्यावर या लोकांना बोलावून त्यांना अवघड प्रश्न विचारता येतील, की तुम्ही जाळपोळ करून देशाचे नुकसान का करता? वैध मार्गाने जाणे तुम्हाला जमत नाही का? तुम्ही करता ते कायद्याविरुद्ध आहे, जनतेला तुम्ही हाच धडा शिकवणार का?
एखादा शो, ज्यावर कम्युनिस्ट नि काँग्रेस दोन्ही पक्षाचे नेते बोलावून त्यांच्यात वादविवाद करता येईल?
ज्यावर या
ज्यावर या लोकांना बोलावून त्यांना अवघड प्रश्न विचारता येतील, की तुम्ही जाळपोळ करून देशाचे नुकसान का करता?
--- जो कुणि दगडफेकीत मारला गेला आहे ती घटना अत्यंत दुर्देवी घटना आहे. मी किंवा माझ्या अनुयायांपैकी कुणिही जाळ-पोळ केलेली नाही आहे, पक्षाचा/साहेबांचा सक्त आदेशच होता की 'सामान्य जनतेला आपल्या आंदोलनाचा काडिचाही त्रास होता कामा नये'. ही जाळ-पोळ, दगड-फेक मला आणि पक्षाला बदनाम करण्यासाठी काही समाजकंटकां करवी कुणितरी केलेली आहे. मी आता नाव सांगत नाही पण जनताच (म्हणजे जनतेला माहीत आहे) त्यांना अद्दल घडवेल.
"अस्सं
"अस्सं व्हय?" आम्हाला हे कळ्ळंच नाही! मग बरोबर आहे!! तुमचे काही चुकले नाही!
लोक बहुतेक उगाचच तुमच्या पक्षाचे नाव घेत होते! बहुधा भय्या, बिहारी यांनीच राडा केला नि नाव मात्र राज ठाकरेचे! मागे नाही का, भांडारकर संस्थेवर ब्राह्मणांनीच हल्ला केला नि संभाजी ब्रिगेडचे नाव खराब केले!
पण तुम्ही मात्र सांभाळून रहा, कारण एखादे वेळी तुमच्याच पक्षाचे लोक तुमच्या घराची जाळपोळ करतील नि तुमच्या विरुद्ध असलेल्या पक्षाचे नाव सांगतील. सांगता येत नाही काही या समाजकंटकांचे! एकदा जनतेला अक्कल शिकवण्याची जबाबदारी दिली की काय होईल नि काय नाही!
चर्चा
चर्चा संपुष्टात आलेली दिसते
उदय, उत्तर एकदम अचूक आहे.
|| हरि ओम
|| हरि ओम ||
उदय तुम्हि असा कोणता प्रकल्प हाति घेतलाय का कि ज्यामुळे आपल्या समाजाला फायदा होतोय? असल्यास नक्कि सान्गा. हे विचार मन्थन होत असताना आम्हाला नेहमि प्रश्न पडत असतो कि काहितरि करयचय पन काय आनि कसे हे कळत नाहि. असे एखादे करता येइल का कि दुर्गम खेदेगावे दत्तक घ्याय्चि. ( सरकार एत्यादि मधे आणण्याचि गरजच नाहि) आखणि करुन ज्याला जमेल तसे त्याने त्या त्या छोट्या गावासाठि करावे. ( जसे समजा एक अदिवासि गाव आहे त्या गावा चि नीट पाहणी करुन बेत करावा. गावातिल लोकाना बोलावुन त्या समस्या जानाव्यात आनि उपाय योजना करावी) मला माहित आहे कि हे एक्दम शक्य नाहि. पन सुरुवात करु शकतो ना? आज बराच अतिरिक्त पैसा लोका कडे आहे. बर्याच लोकना समाजासाथि कारायचे पन असते. पन कलत नाहि. अशा ना व्रुत्त्पत्रे , नेट, टि वी वरुन आवाहन करयचे कि त्यानि एक गाव दत्तक घ्या. पप्रत्येक गोश्ट पैसे देवुअन्च होते असे नाहि. श्रम दानाने आपन खुप काहि करु शकतो. [ मला नेहमि असे वाटते आजच शेत्करि दुखि आहे , वीज नाहि पाणि नाहि. पैसा नाहि? तर मग आपण सर्वनि मिलुन फक्त सर्कार ल दोश देवुन काहि होनर आहे का?
नाहि , ह्यात काहिहि बदल होनार नाहित. त्यापेक्शा लोकानि पुर्वि सारखे लोकन्चे लोकनि लोकन्साठि चालावलेले उपाय योजावेत.
एकत्र येवुन. मी माझे घर माझी बायको मझ्झी नोकरि हे सर्व सन्कुचित विचार दुर करुन क्रुति करयला हवि.
शाळा बेकार अवस्थेत आहेत तर चला रन्ग विकत आणु आणि रन्गवुन देवु श्रम दानाने. रस्ते नाहित कारन सरकार उदासीन आहे तर चला मगा बेत आखुन श्रम दानाने रस्ते तयार करु. गावात रोजगाराचि साधने निर्माण करु. लोकाना सन्घटित करुन उपाय्योजना करु. कशाला सरकार देइल तरच करु असे म्हनुन गप्प रहयचे? करुयात कि आपन सर्व मिलुन .
अशे योजना जर अधिच असेल तर क्रुपया मला सान्ह्गा. मी स्व खुशिने त्यात भाग घेइल.
ज्याना वेळ देता येइल त्यनि वेळ द्यवा. ज्यना पैसे देता येतिल त्यन्नि अर्थिक मदत करावि ( हि मदत रोख असु नये.) कोनिहि पैसे जमा करु नये. तर एकदा येवुन सर्व समजुन घेवुन ज्य ज्या वस्तुन्चि गरज आहे अशा वस्तु घेवुन देणे.
उदहरनार्थ नुकतेच वाचले कि एका गावात म्हणे नदिवर पूल नाहि. २० वर्शे तिथलि लोके एका दोरिवर लटकुन नदि पार करतात. आता मला सान्गा २० वर्शे हे गाव काय झोपलय? रोज एक फळि बन्धलि आनि चुका ठोकुन एकाला एक जोदलि तर १ महिन्यात लाकडि पूल बनु शकतो. पन एकानेहि २० वर्शात हे काम केले नाहि? वाचुन अश्चर्य वाटले आनि कीवहि आलि.
असो. तर अश्या प्रकारे आपन माय्बोलिकर का नाहि करत असे काहि? किवा उदय तुम्हि साहेबाना सन्गुन हि योजना का नाहि अमलात आनत? मी तयार आहे साथ दद्ययला. मनापासुन वाटते एका छोट्या गावा पासुन सुरुवात केलि तर सगले नक्किच येतिल.
उदय तुम्हि
उदय तुम्हि साहेबाना सन्गुन हि योजना का नाहि अमलात आनत?
---- भुमीका, माझे कोणते साहेब? मी वर जे लिहीले आहे ते उपरोधीक आहे. मला तुमची शेवटची पोस्ट खुप आवडली, त्याला लवकरच अनुसरून लिहेल.
|| हरि ओम ||
|| हरि ओम ||
अछा मला कळलेच नाहि ( ही ही ही )साहेब? महन्जे मला वाटले तुम्हि कोनत्या तरि साहेबा कडे आहात
शमस्व
भूमिका,
भूमिका, तुम्ही म्हणता तसे करायला पाहिजे हे खरे. पण सहसा कुणि काही करतो आहे म्हंटले की गावच्या फुडार्यांच्या पोटात दुखते. आता हा माणूस आपल्यापेक्षा जास्त प्रसिद्ध किंवा लोकप्रिय झाला तर? शिवाय हा जे काही करतो आहे, त्यात माझा हिस्सा काय (म्हणजे कामाचा हिस्सा नाही, पैशाचा!). 'साहेब, तुमि चांगले करता आहात. काही मदत लागली तर कळवा.' मग अचानक काही गुंड तुमच्या कार्यात अडथळा उत्पन्न करतात, मग हे फुडारी येऊन तुम्हाला सांगतात, की 'तुमि आपल्याला जरा इतके इतके पैसे दिलेत, तर मी बघून घेईन या गुंडांना. त्रास नाही देणार तुमाला ते'.
पुढे हळू हळू ते, किंवा त्यांचे मेव्हणे, भाचे तुमच्या संस्थेत घुसू लागतात. विशेषतः निवडणुकी जवळ आल्या की! त्यांची उद्दिष्टे वेगळीच असतात. त्यात अडथळा आला, तर गावात तुमच्या संस्थेबद्दल काय काय अफवा उठतील सांगता येत नाही.
अश्या अनेक गोष्टी ऐकल्या आहेत.
एकंदरीत वाटते तितके सोपे नाही!
|| हरि ओम
|| हरि ओम ||
हो मलाहि कळतेय ते. पण कोनतिहि सन्स्था नसेल तर हे होनारच नाहि ना? प्रत्येकाने आपले आपले गाव निवडा आणि गावच्या पुढार्याशी बोलुन बघा. कळेलच कोन किति पाण्यात आहे ते. आणि जिथे असे काहि असेल ( गुन्ड गिरि एत्यादि ) तिथे नकोच जायला. त्यामुळे सध्या तरि प्रायोगिक तत्वावर हे करुन मग यश आले तर मोठ्या प्रमाणात करायला हवे.
खरे म्हणजे गावच्या लोकना विश्वसात घेतले तर सहज आहे. अम्हि स्वतः श्रमदान करायला गेलो होतो तेव्हा गावातल्या लोकान्चा खुप छान प्रतिसाद होता. आणि ह्या असल्या गोश्तिना घाबरुन जर विधायक कामे करणे बन्द केले तर देशाला रासातळाला जायाला वेळ लागनार नाहि . स्वा. वीरानि " अभिनव भारत " स्थापन केलि तेव्हा त्यनाहि असे बरेच अड्थळे आलेच असतिल पन त्यानि न डगमगता केव्हढे मोठे कार्य केलेय. आपन नुसता प्रयास करायला काय हरकत आहे>?
भूमिकाताई
भूमिकाताई तुमचा असा समज झालाय का की समाजात कुणीच कुणासाठी करत् नाहिये...
भरपूर संस्था आहे जिथे अत्यंत नि:स्वार्थीपणाने काम केलं जातय. सरकारने पण संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानासारखे प्रकल्प राबवलेले आहेत. कित्येक लोकानी खुशीने त्यासाठी काम केलेले आहे (अगदी तथाकथित गावगुंडानी सुद्धा!!)
फार मोठ्या योजना आखण्यापेक्षा (गाव दत्तक घेणे इत्यादि) छोट्या गोष्टीना सुरुवात करा. उदा, एका अशिक्षिताला लिहा वाचायला शिकवणे. आठवड्यातून एखाद्या दुपारी झोपडपट्टीमधल्या मुलाचा अभ्यास घेणे. एखादे घर व्यसनमुक्त करणे.
मायबोलीवर झुलेलाल आणि चिनूक्स यानी लिहिलेले लेख वाचा. त्यातून तुम्हाला काहीतरी करायला नक्की प्रेरणा मिळेल.
--------------
नंदिनी
--------------
मी हा बा.फ
मी हा बा.फ आजच पाहिला.
चिनुक्ष,
"मुळात शाळा, कोर्टाच्या बोर्डावर बाँबेऐवजी मुंबई केलं, किंवा मराठेशाही ब्राह्मणांमुळे बुडाली, तुकाराम हेच शिवाजीचे खरे गुरू, हे मान्य केलं, किंवा चौकाचौकात, समुद्रात, प्रत्येक नदीत, तलावात शिवाजी, आंबेडकरांचे पुतळे उभारले, किंवा कोकणस्थ चित्पावनांचं 'आम्ही बुवा सगळ्यांत हुश्शार आणि सर्वश्रेष्ठ' हे मान्य केलं, तरी मला, किंवा वैशालीबाहेर फुगे विकणार्या लहान मुलांना, महिनाभर पेन्शन पुरवणार्या माझ्या आजीला, एंड्रीन पिणार्या शेतकर्यांना काय फायदा"
१००% टक्के अनुमोदन. मला वाटत या उठ्सुठ दुखावल्या जाणार्या भावना ही च एक मोठि समस्या होउन बसलेलि आहे. लाखोंच्या संख्येने बांग्लादेशि मुम्बैत वावरत असताना आणि कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याचि शक्यता असताना आपले (तथाकथित) नेते मात्र बिहारि आणि भैय्यांच्या सांस्क्रुतिक आणि राजकिय (हे खरे दु:ख) दहशतवादाच्या नावाने गळे काढण्यात मग्न. ह्याच माननिय इत्यादि इत्यादि नेत्यांनि स्वतःच्या कारकिर्दित रमेश किणिचा बळि घेतला ह्याचा संताप तर दुरच पण आज कोणा पत्रकाराला त्याचि साधि आठवण हि येत नाहि. किति उबग आणणार आहे हे सारच. स्वतःच्या मुलाला इंग्रजि माध्यमात शिकायला पाठवुन इतर संस्थाचालकांना पत्र लिहुन जाहिर तंबि देणारे आपले नेते थोर, त्यांच्या भाषणाने भावना दुखावुन घेणारे आणि तोडफोड करायला निघणारे त्यांचे अनुयायि थोर आणि हे सर्व मुकाटपणे सहन करणारे आपण सामान्य नागरिक तर फारच थोर!
पण भावना
पण भावना दुखावण्यात गैर काय आहे? आपल्या भावना किती संकुचीत आणि किती सर्वसमावेशक असाव्यात हे ठरवण्याची प्रगल्भता हवी, जी आपल्यात नाही. मणि शंकर ऐय्यर सावरकरांबद्दल काही बाही बोलतो तेंव्हा बाकी सगळ्या बरोबर एक मराठी माणुस म्हणुनही माझ्या भावना दुखावतात की. मागे एकदा मी एका माणसाच्या तोंडुन ऐकले "ये साला घाटी लोग", बाकीचं काही मी ऐकलं नाही. पण त्याने माझ्या भावना दुखावल्या होत्याच की. मी काढला त्याच्या कानाखाली आवाज. शेवटी सद्गुणविक्रुती देखील समाजाच्या र्हासाचे कारण होऊ शकते.
कुणी समाजकंटकानी एखाद्या पुतळ्याला चपला अडकवल्या म्हणुन आपल्या भावना दुखावतात आणि आपण रस्त्यावर येतो पण भारत पाकीस्तान बरोबर सामना हरला की कुर्ल्याला कटले जल्लोश करतात त्याने दुखावत नाहीत ही शोकांतीका आहे.
राग येणे हे जीवन्तपणाचं लक्षण आहे. फक्तं तो किती योग्य आणि किती अयोग्य याचं ताळतंत्र जमणं हे महत्वाचं.
>> पण भावना
>> पण भावना दुखावण्यात गैर काय आहे? आपल्या भावना किती संकुचीत आणि किती सर्वसमावेशक असाव्यात हे ठरवण्याची प्रगल्भता हवी, जी आपल्यात नाही.
पूर्ण अनुमोदन जयदीप.
मला वाटत चिनूक्ष, केदार यांनी पोटतिडीकिने लिहिलेले विचार "सकारात्मक काम" ह्या सदरात मोडतात आणि जयदीप ने लिहीलेले "प्रतिक्रियात्मक"- एक बलशाली राष्ट्र होण्यासाठी दोन्ही आवश्यकच! पण दोन्ही विचारांमध्ये एक समान दुवा आहे आणि तो म्हणजे आपण आपली मने "भारत" ह्या एका विषयाशी जोडुया. अटलजींची एक ओळ आठवते -
एक हाथमे सृजन दुसरे मे हम प्रलय लिये चलते है
सभी किर्ती ज्वालामे जलते, हम अंधियारेमे जलते है
जय्दीप यु आर राइट? पण काय
जय्दीप
यु आर राइट?
पण काय करणार.
चिनूक्स सारख्या खूप कमी
चिनूक्स सारख्या खूप कमी जणांना हे लिखाण शोभतं.
बाकी सर्व ठीक आहे पण कोकणस्थ
बाकी सर्व ठीक आहे पण कोकणस्थ चित्पावनांचं 'आम्ही बुवा सगळ्यांत हुश्शार आणि सर्वश्रेष्ठ' हे मान्य केलं, आम्हाला हुश्शार आणि सर्वश्रेष्ठ म्हणा असा दावा कोणा कोकणस्थाने केल्याचे ऐकीवात नाही.
जर असा दावा कुणी केला असेल तर तो चुकीचा आहे. जिथे परिस्थीती वाईट असते तिथे प्रत्येक मानव विचार पुर्वक परिस्थीतीवर मात करण्याचा प्रयत्न करतो. मग तो राजस्थानामधला किराणा दुकानदार असो किंवा कारवारमधला शेट्टी.
होय... सारख काय झाल की
होय... सारख काय झाल की कुणाच्यातरी भावना दुखवतात..... काही बोलायची पण चोरी आहे........आणि सुतावरून स्वर्ग गाठायला सगळे राजकारणी आहेतच.... आणि सगळे सुशिक्षित लोक उगच आपापसात वाद घालण्यात वेळ वाया घालवतात.......खरच कन्टाळा आलाय सगळ्याचा......
Pages