अजयने इथे लिहिलेल्या http://www.maayboli.com/node/23746 या लेखापासून प्रेरणा घेऊन मोलेक्युलर गॅस्ट्रॉनॉमीचे हे किट ऑर्डर केले - http://www.molecule-r.com/ ते शुक्रवारी आल्यावर या वीकेन्डला त्यातला प्रयोग करुन पाहिला.
किटसोबत एक डीव्हीडी येते. त्यात रेसिपीज आहेत. त्यातली सर्वानुमते 'मोलेक्युलर एग' ही करुन पहायची ठरवली.
दूध, दही, साखर, आंबा वापरुन 'एग फ्राय (सनी साईड अप)' सारखा दिसणारा गोड पदार्थ.
किटमधील लागणार्या बाकी गोष्टी-
Sodium Alginate - १ टीस्पून
Agar Agar - १/२ टीस्पून
calcium Lactate - १ टीस्पून
मूळ रेसिपीत आंब्याच्या फोडी साखर आणि Calcium lactate बरोबर ब्लेन्डर मधून काढल्यात त्या ऐवजी मी माझ्याकडचे 'देसाई मँगो tidbits' वापरले. मग त्याचे छोट्या गोलाकार पळीने गोळे Sodium Alginate बाथमध्ये सोडले. तीन मिनिटांनी काढून पाण्यात टाकले आणि मग बाहेर काढले.
पाण्यातला अंड्याचा बलक असा दिसतो. आधीचा एक उचलून टाकताना फुटला. त्याचे तुकडे बाजूला दिसत आहेत.
दुधात Agar Agar टाकून ते उकळवून घेतले आणि योगर्टमध्ये मिसळले. व्हॅनिला एक्स्ट्रॅक्ट्चा एक थेंब त्यात टाकला आणो थोडी साखर घातली. मूळ रेसिपीत व्हॅनिला योगर्ट वापरायला सांगितले आहे. मग हे मिश्रण प्लेटमध्ये फ्रायच्या पांढर्या भागासारखे दिसेल असे ओतले आणि त्यावर आंब्याच्या रसाचा तयार झालेला गोळा ठेवला. 'सनी साईड अप' तयार!
वरुन एकदा "मिरपूड" म्हणून वेलदोड्याची पूड घातली आणि 'बेकन बिट्स' म्हणून स्ट्रॉबेरीचे तुकडे.
पांढरा भाग म्हणावा तसा घट्ट झाला नाही. दूध उकळताना त्यातले agar agar थोडे भांड्याला खाली चिकटले त्यामुळे कमी पडले असावे. आंब्याचा रसाचे गोळेही जरा सरावाने जमले. त्या बाथमध्ये सोडतानाच गोळा पडावा लागतो. चव अर्थातच छान होती.
पुढच्या यशस्वी/अयशस्वी प्रयोगांबद्दल लिहीनच.
सह्हीच गं लालु... ग्रेटच
सह्हीच गं लालु... ग्रेटच आहेस.. भारी उत्साह आहे तुला
मस्त दिसतेय रेसिपी.
मस्त दिसतेय रेसिपी.
अभिनंदन. अजून एकाला/एकीला चटक
अभिनंदन. अजून एकाला/एकीला चटक लागली
>त्या बाथमध्ये सोडतानाच गोळा पडावा लागतो.
मी पण पहिल्यांदा इथेच मार खाल्ला. ते अजूनही जमले नाही. मला तेवढा धीर न धरवल्यामुळे मी सरळ दुसरी पाककृती करायला घेतली.
मस्तच!!
मस्तच!!
मस्तच!!
मस्तच!!
लालू तुझ्याकडे कधी यायचं हे
लालू तुझ्याकडे कधी यायचं हे खायला?
अरे वा लालू मस्तच दिसतय. खरच
अरे वा लालू मस्तच दिसतय. खरच कधी येऊ खायला?
असल्या पाककृतींसाठी वेगळा
असल्या पाककृतींसाठी वेगळा सेक्शन ठेवा आणि तिथहेहा सगळा मालमसाला एकत्र ठेवावा, ही अॅडमिन चरणी प्रार्थना..
मस्त!
मस्त!
इथे नवीन ग्रूप केला आहे
इथे नवीन ग्रूप केला आहे
या विषयावरील पाककृतीही तिथे
या विषयावरील पाककृतीही तिथे हलवल्या तर बरे होईल.
सह्हीये. एक एप्रिलला करून
सह्हीये. एक एप्रिलला करून खिलवायचं.
छान दिसतेय. खूप जून्या मराठी
छान दिसतेय. खूप जून्या मराठी पुस्तकात. अंड्याच्या रिकाम्या कवचात असेच मिश्रण भरुन, "कृत्रिम अंडे" करायची कृति वाचली होती
लालू छान केलाय
लालू छान केलाय प्रयोग...
उत्साह जबरदस्त. मला लाजो की लालू गोंधळायला झाले. लाजोनेच टाकलीय पाकृ असे वाटले. तुम्हा दोघींचा काहीतरी हटके पाकृ करण्याच्या आणि वर त्या इथे स्टेपबायस्टेप टाकण्याचा उत्साह पाहुन माझ्या आळसाची मला लाज वाटते.
पळीला तुपाचा हात लावून गोळा
पळीला तुपाचा हात लावून गोळा पाडला तर पटकन पडेल का?
सह्हीये हा प्रकार! मस्त....
सह्हीये हा प्रकार! मस्त....
चव कशी होती? म्हणजे अंड
चव कशी होती? म्हणजे अंड वापरुन केलेल्या 'सनी साईड ' सारखी होती का?
लै भारी! आता मलाही करुन
लै भारी! आता मलाही करुन बघायचा मोह होतोय.
धन्यवाद. वत्सला, नाही गं
धन्यवाद.
वत्सला, नाही गं
माझ्या धाकट्यानेपण हेच विचारले. आंबा आणि व्हॅनिलाची चव होती.
अश्विनी, ते बुळबुळीतच होतं त्यामुळे पटकन पडत होतं. उलट थोडी पळी बाथमध्ये द्रावणात बुडवून अलगद सोडल्यावर गोळा नीट झाला.
दिनेश, काय भरले होते अंड्यात? इथे इस्टरला जेलो भरुन अशी अंडी करतात तो यातलाच प्रकार म्हणायचा. त्यासाठी वेगळे अंड्याच्या आकाराचे साचे मिळतात.
वा वा! वेल्कम टू द क्लब.
वा वा! वेल्कम टू द क्लब.

मस्त दिसतंय सनी साइड अप.
लालू, तुझ्या उत्साहाला सलाम!
लालू, तुझ्या उत्साहाला सलाम!
लालू सही आहे...मस्तच.
लालू सही आहे...मस्तच.
लालू, तो प्रकार लक्ष्मीबाई
लालू, तो प्रकार लक्ष्मीबाई धुरंधरांच्या पुस्तकात आहे. त्यात चायना ग्रास वापरायचे सूचवलेय पांढर्या भागासाठी, आणि पिवळ्या भागासाठी खवा.
सनी साईड अप फारच मस्तं
सनी साईड अप फारच मस्तं दिस्तंय!
आज घरी याचा प्रयोग होण्याची
आज घरी याचा प्रयोग होण्याची दाट शक्यता आहे. (आज किट आलं तर).
सहीये हे पण.
सहीये हे पण.
मस्त!! ते स्ट्रॉबेरीचे तुकडे
मस्त!!
ते स्ट्रॉबेरीचे तुकडे मला कांदा, टोमॅटोच्या तुकड्यांसारखेच वाटले.
मस्तच आहे हे.
मस्तच आहे हे.
हे सही आहे. दिसायला हाफ
हे सही आहे. दिसायला हाफ फ्राईड एगसारखे आणि चवीला आंबा चक्क! भारी!
ते जे किट आलं, त्यातले घटक वापरून अन्नपदार्थांच्या रेण्वीय घटकांची रचना बदलते का? Molecular Gastronomyचा crux हाच आहे का?