जेव्हा दोघे आयटीत

Submitted by sakhii on 17 March, 2011 - 01:59

आम्ही दिवसभर एकच काम करतो
मी त्याचा call cut करते आणि तो माझा call cut करतो...

दिवसभर office मध्ये घरची कामं आठवतात
हा Task कोणाचा हे ठरवायला अगदी काहीच क्षण लागतात
मला आठवलेला प़त्येक Task नेहेमी त्याचाच असतो...
मी त्याचा call cut करते आणि तो माझा call cut करतो...

कधी कधी आम्ही एकमेकांचा call घेतोसुद्धा
त्याला call केलास? तीचं Status Check केलास? असं काहीसं बोलतोसुद्धा
निरर्थकपणे Completion च्या जवळ जवळ धावत जातो...
मी त्याचा call cut करते आणि तो माझा call cut करतो...

अवास्तवाच्या मागे धावणं हीच वास्तवीकता झाली आहे
निर्मळ, हळव्या क्षणांची जागा Practicality ने घेतली आहे
Responsibilities वाढत चालल्यात एकमेकांना पुन्हा पुन्हा सांगतो...
मी त्याचा call cut करते आणि तो माझा call cut करतो...

संध्याकाळची ओढ मात्र दोघांची रोजच वाढत आहे
देवाने आम्हाला एक गोड मुलगी दिली आहे
तिच्या इवल्या स्पर्शासाठी दोघही घराकङे धाव घेतो
सगळे calls आणि सगळे Tasks दोघही क्षर्णाधात विसरुन जातो

नव्या दिवसाची नवी घाई पुन्हा एकदा सुरु होते
आम्ही office ला जातो आणि मुलगी शाळेत जाते
मग काय..........
आम्ही दिवसभर एकच काम करतो
मी त्याचा call cut करते आणि तो माझा call cut करतो...
-सखी

गुलमोहर: 
शब्दखुणा: