विचार

Submitted by कारागिर on 15 March, 2011 - 08:12

मि तुझा विचार करतो
आणि तु मला जोडलि जातेस
तडफडणारं शरीर आणि
कातडि खाली वेदना देतेस

ताणलं नाही गं मि
लांब पर्यंत पसरत गेलो
माझं मन तुला सांगण्या साठी

भांडलो नाही गं मि
मान-अपमान विसरत गेलो
तुला परत मिळवण्या साठी

पण जे तुझ्यापशि सुरु झालं नाही
ते तुझ्यापशि संपलं ही नही

शेवटी राहीलं ते एकटे पण
आंधार्‍या विहिरी सारखं
घाबरवणारं, चिडवणारं
खोल नेउन बुडवणारं

डोळे उघडुन पाहिलं
तु दुरावताना दीसलिस
ते हि पाठमोरी फिरलेली
आणि हे पाठमोरेपण रहिलं मझ्याकडे
कायमचं...

नाव काय द्याव हे मला कळत न्हवतं, म्हणुन आत्ता पुरतं "विचार" असं नाव दिलय. तुम्हि कोणि जर एखादं नाव सुचवु शकलात तर फार उत्तम.

गुलमोहर: 
शब्दखुणा: