सर्व्हे रिपोर्टः परिशिष्ट

Submitted by संयोजक_संयुक्ता on 10 March, 2011 - 08:57

भारतातील स्त्रियांसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण आकडेवारी व कटू वास्तव :


fact.gif
  • साक्षरता:

    भारतीय स्त्रियांच्या साक्षरतेचे प्रमाण : (इ.स.२००१ च्या सर्वेक्षणानुसार) : ५४.१६ %
    ह्या टक्केवारीत जास्तीत जास्त तीन ते चार टक्क्यांनी वाढ झाली असण्याची शक्यता तज्ञ मंडळी व्यक्त करतात.
    संदर्भ : http://www.nlm.nic.in/women.htm

  • आरोग्य:

    विवाहित स्त्रियांमधील कुपोषण : ३३%
    भारतीय स्त्रियांमधील अॅनिमियाचे प्रमाण : ५६. २%
    भारतात प्रशिक्षित वैद्यकीय मदतीवाचून बाळंत होणार्या स्त्रिया : ४२%
    बाळंतपणासाठी वैद्यकीय मदत व सुविधा मिळणार्या स्त्रिया : ३४%
    जागतिक आरोग्य परिषदेच्या अहवालानुसार बाळंतपणात प्राण गमावणार्या भारतीय महिलांची संख्या : दरवर्षी १,३६,०००

    संदर्भ :
    http://www.indianchild.com/womensissues/maternal-mortality.htm

  • बालविवाह:
    • वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत विवाह होणाऱ्या भारतीय स्त्रियांचे प्रमाण : ४४. ५%
    • सोळाव्या वर्षाअगोदरच विवाह होणाऱ्या भारतीय स्त्रिया : २२. ६%
    • अठरा वर्षाच्या आत विवाह होणार्या मुलींचे विविध राज्यांतील प्रमाण :
      मध्य प्रदेश - ७३%
      राजस्थान - ६८%
      उत्तर प्रदेश - ६४%
      आंध्र प्रदेश - ७१%
      बिहार - ६७%
    • युनिसेफच्या २००९ सालाच्या अहवालानुसार १८ वर्षांच्या आत विवाह झालेल्या मुलींचे प्रमाण ४७%. त्यातील ५६% मुली ग्रामीण भागातील तर उर्वरित ४४% शहरी भागातील होत. जगातील एकूण बालविवाहांपैकी ४०% बालविवाह हे भारतात घडून येतात.

      संदर्भ :
      http://www.indg.in/social-sector/social-awareness/stop-child-marriages/s...
      http://www.indianchild.com/womensissues/early-marriage.htm

  • स्त्रियांविरूध्द गुन्हे:
    • युनिसेफच्या अहवालानुसार भारतातील जन्म झालेल्या परंतु त्यानंतर काहीही ठावठिकाणा नसलेल्या मुलींची संख्या :
      ५० दशलक्ष
    • दहा - बारा वर्षांपूर्वीच्या राष्ट्रीय पातळीवरील गुन्हा-नोंदीच्या अहवालानुसार भारतात स्त्रियांविरुद्ध गुन्ह्यांच्या नोंदी : १५, ४६८ बलात्कार, ३२, ३११ विनयभंगाचे गुन्हे, हुंडाबळी ६६९९, कौटुंबिक हिंसाचार ४३८२.
      सोळा किंवा त्याहून कमी वयाच्या मुलींवर होणाऱ्या बलात्कारांचे प्रमाण : ३०%.

      संदर्भ :
      http://www.census.gov/ipc/prod/wid-9803.pdf> ,
      http://www.indianchild.com/womensissues/gender-violence.htm

    • युनायटेड नेशन्सच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी होणार्या स्त्रीभ्रूण हत्यांची संख्या : ७,५०,०००.

      संदर्भ :
      http://www.indianchild.com/girlchild/save-the-girl-child.htm

    • युनिसेफनुसार भारतात रोज बेकायदेशीरपणे होणार्या स्त्रीभ्रूणहत्या : २,०००.
    • दर १०० मुलांमागे भारतात फक्त ९३ मुली जन्माला येतात.
    • जगातील अन्य देशांमध्ये हे प्रमाण १०० मुलांमागे १०५ मुली हे आहे.
    • आजच्या घडीला भारतात ५० दशलक्ष मुली ''लापता'' आहेत.

      संदर्भ :
      http://www.indg.in/social-sector/social-awareness/stop-female-infanticid...

    • १,६०,००० नेपाळी स्त्रियांना भारतातील वेश्यागृहात ठेवलेले आहे. (कार्यकारी संचालक SANLAAP, इंद्राणी सिन्हा, ‘पेपर ऑन ग्लोबलिएशन एण्ड ह्यूमन राइटस्’)
    • भारतात कर्नाटक, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, आणि तामिळनाडु या राज्यांत वेश्याव्यवसायातील स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात व्यापार केला जातो. विजापूर, बेळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतून स्त्रिया मोठ्या शहरांत एका संघटित अनैतिक व्यापार समूहाच्या नेटवर्कचा एक भाग म्हणून स्थलांतरीत केल्या जातात. (सेंट्रल वेलफेअर बोर्ड, मीना मेनन, "दि अननोन फेसेस्")
    • महाराष्ट्र आणि कर्नाटक जिल्ह्यांच्या सीमा ‘देवदासी पट्टा’ (देवदासी बेल्ट) म्हणून ओळखला जातो. येथून विभिन्न पातळीवर अनैतिक व्यापार करण्यात येतो. येथील स्त्रिया वेश्याव्यवसायामध्ये असण्याचे कारण म्हणजे त्यांच्या पतींनी त्यांना सोडलेले असते किंवा त्यांना विश्वासघात व बलात्कार यांसारख्या प्रसंगातून वेश्या बनण्यास भाग पाडले जाते. पुष्कळशा देवदासींना वेश्याव्यवसायासाठी देवी यलम्माला समर्पित करतात. कर्नाटक येथील एका वेश्यागृहातील सर्व १५ मुली देवदासी आहेत. (मीना मेनन, "अननोन फेसेस्")
    • भारतातील वेश्यागृहांमधील १००००० ते १६०००० नेपाळी स्त्रिया आणि मुलींना (म्हणजे सुमारे ३५ टक्के) चांगली नोकरी देण्याच्या आमिषाने किंवा लग्न करण्याच्या खोट्या आश्वासनावर येथे आणलेले आहे. (राधिका कुमारस्वामी, यूएन स्पेशल रिपोर्ट ऑन व्हायोलंस अगेन्स्ट विमेन, गस्टावो कॅपडेलिव्हा, आईपीएस, 2 एप्रिल 1997)
    • भारतामध्ये दररोज सुमारे ५००० ते ७००० नेपाळी मुलींचा अनैतिक व्यापार केला जातो. १००००० ते १६००००
      नेपाळी मुली भारतातील वेश्यागृहांमध्ये डांबलेल्या आहेत. सुमारे ४५००० नेपाळी मुली मुंबईतील वेश्यागृहांमध्ये आहेत आणि ४०००० कोलकातामध्ये आहेत. (विमेन्स ग्रुप्स् इन नेपाल, ट्रॅफिकिंग इन विमेन एण्ड चिल्ड्रन: द केसेस ऑफ बांगलादेश, pp.8 व 9, UBINIG, 1995)
    • भारतातून अनेक स्त्रिया आणि मुलांना दररोज मध्य-पूर्व राष्ट्रांमध्ये पाठविले जाते. भारत, पाकिस्तान आणि मध्यपूर्वेतील घरकाम करणार्या आणि वेश्याव्यवसायातील मुलींना यातना दिल्या जातात, कैदेत ठेवले जाते आणि बलात्कार करण्यात येतात. (इंद्राणी सिन्हा, SANLAAP भारत, ‘पेपर ऑन ग्लोबलिएशन एण्ड ह्यूमन राइटस्’)

      संदर्भ :
      http://www.indg.in/social-sector/social-awareness/stop-girl-trafficking/...

    (संकलन : अरुंधती कुलकर्णी)

विषय: