कासव महोत्सव २०११. वेळास ...

Submitted by सेनापती... on 10 March, 2011 - 06:30

काही दिवसांपूर्वी वेळास येथे कासव महोत्सवास गेलो होतो. २ दिवसात तब्बल १५० ओलिव्ह रिडले बघायला मिळाली.. Happy

जगभरात आढळणाऱ्या खाऱ्या पाण्यामाधल्या ७ जातींपैकी भारतात ५ जाती आढळतात. ओलिव्ह रिडले ही त्यापैकी एक. कोकण किनारपट्ट्यात थंडीच्या हंगामात म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी ते जानेवारीपर्यंत मादी कासवे येतात. रात्रीच्या वेळी भरती रेषेच्यावरती सुरक्षित ठिकाणी वाळूमध्ये एक ते दीड फुट खड्डा करून त्यात अंडी घालतात. वेळासमध्ये समुद्र किनाऱ्यावर अशी अंडी शोधण्यास एक माणूस ठेवलेला आहे. ते गेली १५ वर्षे हे काम करत आहेत. मादी कासव येऊन गेल्याच्या खुणा शोधून ते अंडी शोधून काढतात आणि मग तिथून उचलून बनवलेल्या संरक्षित भागात ती आणून ठेवली जातात. बाकी सर्व माहिती सुद्धा नोंदवून ठेवली जाते. उदा. किती अंडी होती, किती तारखेला सापडली, साधारण कधी ह्यातून पिल्ले बाहेर पडतील वगैरे...

साधारण ५५ दिवसांनी त्यातून पिल्ले झाल्यावर ती लगेचच समुद्रात सोडण्यात येतात. रिडलेची मादी अंडी घातल्यानंतर समुद्रात निघुन जाते ती कधीच परत येत नाही. पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यावर स्वत:हून समुद्राकडे निघून जातात. वेळास येथे मात्र ती समुद्रात जी पर्यंत त्यांना कुठलाही धोका पोचू नये यासाठी अंड्यांवर टोपली टाकून संरक्षित केले जाते आणि पहाटे ६ वाजता सर्व टोपल्या उचलून एकत्रपणे देखरेखीखाली समुद्रात सोडण्यात येते.

गुलमोहर: 

सहीच रे. मलाही एकदा तरी इकडे जायचे आहे. या कासवांचा प्रजनन कालावधी कधी असतो. वेळासमधे किंवा एकुणच कोकण किनारपट्ट्यात ही कधी येतात. त्यांचे वेळासमधे कसे संगोपन केले जाते व अंड्यामधुन पिल्ले यायला किती वेळ लागतो, पिल्ले झाल्यावर किती दिवसात ती परत समुद्रात सोडण्यात येतात. पिल्ले अंड्यातुन बाहेर येईपर्यंत रिडलेची मादी समुद्रकिनारी रहाते का अंडी घातल्यानंतर समुद्रात निघुन जाते अशी सर्व माहीती पण यात देता आली तर बरे होईल असे वाटते.

शोभा हे ग काय? मला पहिला प्रतिसाद द्यायला मिळतोय म्हणून मी किति खूष होते Sad

मी स्वतः हे बघितले आहे. कासवांच्या पाठीवरुन हात फिरवलाय. अशी पिल्ले हाताने गोळा करुन, समुद्रात नेऊन सोडली आहेत.
( कासवांचे सूर नावाचा एक लेख असेल जून्या मायबोलीवर. )

प्रज्ञा, आत्ता अगदी मी तुला हेच लिहीणार होते कि, "आज माझा पहिला नंबर आहे". पण म्ह्टल नको तुला चिडवायला तर तूच सांगितलस. पुढच्यावेळी तुला संधी देईन. Lol

सहीरे रोहन... १०-१२ वर्षांपुर्वी ह्या दिवसांमध्ये दिवेआगरला हे सर्व बघीतले होते त्याची आठवण झाली...

जबरदस्त रे भटक्या...
बरेच दिवसांनी उगवलास..पण सुंदर भेट घेऊन..
शेवटचे प्रचि तर दृष्ट लागण्यासारखे...
कसली गोडुली पिल्लं आहेत

शेवटचा फोटो फारच आवडला. तो फोटो बघून असेच १०-१२ कासव उचलून घेवुन यावेसे वाटतात घरी, एकदम क्युट आहेत ती पिल्लं. Happy

सुंदर!

कोकण किनारपट्ट्यात थंडीच्या हंगामात म्हणजे नोव्हेंबरच्या शेवटी ते जानेवारीपर्यंत मादी कासवे येतात. रात्रीच्या वेळी भरती रेषेच्यावरती सुरक्षित ठिकाणी वाळूमध्ये एक ते दीड फुट खड्डा करून त्यात अंडी घालतात. वेळासमध्ये समुद्र किनाऱ्यावर अशी अंडी शोधण्यास एक माणूस ठेवलेला आहे. ते गेली १५ वर्षे हे काम करत आहेत. मादी कासव येऊन गेल्याच्या खुणा शोधून ते अंडी शोधून काढतात आणि मग तिथून उचलून बनवलेल्या संरक्षित भागात ती आणून ठेवली जातात. बाकी सर्व माहिती सुद्धा नोंदवून ठेवली जाते. उदा. किती अंडी होती, किती तारखेला सापडली, साधारण कधी ह्यातून पिल्ले बाहेर पडतील वगैरे...

साधारण ५५ दिवसांनी त्यातून पिल्ले झाल्यावर ती लगेचच समुद्रात सोडण्यात येतात. रिडलेची मादी अंडी घातल्यानंतर समुद्रात निघुन जाते ती कधीच परत येत नाही. पिल्ले अंड्यातून बाहेर आल्यावर स्वत:हून समुद्राकडे निघून जातात. वेळास येथे मात्र ती समुद्रात जी पर्यंत त्यांना कुठलाही धोका पोचू नये यासाठी अंड्यांवर टोपली टाकून संरक्षित केले जाते आणि पहाटे ६ वाजता सर्व टोपल्या उचलून एकत्रपणे देखरेखीखाली समुद्रात सोडण्यात येते.

कासवांच्या पाठीवरुन हात फिरवलाय. अशी पिल्ले हाताने गोळा करुन, समुद्रात नेऊन सोडली आहेत.

>>> दिनेशदा... आम्हाला सुद्धा तसेच करायला मिळाले... Happy

Pages