लेकानं केलेली कविता
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
61
'मराठी भाषा दिवस'निमित्ये लेकानं कविता केली होती. 'मायबोली'च्या उपक्रमाअंतर्गत ही कविता 'बालकवी'मध्ये द्यायची असेही ठरले होते. पण ऐनवेळी बरेच घात झाले आणि ही कविता त्या उपक्रमास वेळेत देता आली नाही. म्हणून ही आता इथे देत आहे.
कवितेतल्या सर्व कल्पना लेकाच्या आहेत. मी काही ठिकाणी यमकं जुळवायला मदत केली आहे. त्याचे मराठी शुद्धलेखन म्हणजे शुद्ध भाषेत सांगायचं तर बोंब आहे! पण मी मुद्दामच त्यात बदल/ सुधारणा नाही केले. काही अवघड शब्द जसे की एल्ड्रॅगो, सॅजिटेरिओ वगैरे (ही विविध बेब्लेड्जची नावं आहेत) मी पाटीवर लिहीले आणि त्याने ते बघून उतरवलेत. त्यातही परत काही चुका आहेतच!
कविता आवडली तर जरूर लिहा. त्याला प्रतिसाद पाहून हुरूप येईल. धन्यवाद
विषय:
प्रकार:
शब्दखुणा:
शेअर करा
समग्र नीक, कार्टून नेटवर्क
समग्र नीक, कार्टून नेटवर्क
मस्त आहे नचिकेत तुझी कविता, मला आवडली. मी एन्जॉय केलीच पण माझ्यापेक्षा जास्त एन्जॉय सानिका करेल जेव्हा मी तिला वाचून दाखवेन
@पूनम, "आई जोरात मारते हाका" मधला "हाका" शब्द तू सुचवलास ना? त्याला मारते हाच शेवट करायची इच्छा असणार बहुतेक

मस्तचं.. फार आवडली.
मस्तचं.. फार आवडली.
जरा स्वच्छ शब्दात, तीच कविता
जरा स्वच्छ शब्दात, तीच कविता
माझे आवडते कार्टून
मला पहायला आवडतात कार्टून
पाहताना मी जातो रंगून
टॉम अॅन्ड जेरी हसवतात
आई-बाबांनाही आवडतात
जेरी काढतो टॉमच्या खोड्या
टोम शोधतो फसवायची idea
जेरी नेहमी सटकतो
टॉमच त्यात अडकतो
दोघेही सतत भांडतात
कधी कधी मित्रही बनतात
भीम आहे ताकदवान
भीम अडचणीत सापडलेल्या राजाला साहसाने नेहेमी वाचवतो असं टिपिकल कार्टून आहे)
राजूची तलवार फार बलवान
जग्गू मारतो कोलांट्या उड्या
चुटकीच्या काढतो खोड्या
भीम ढोलकपूरला वाचवतो
राजा त्याला शाबासकी देतो
(छोटा भीम म्हणून एक कार्टून आहे. महाभारतातल्या भीमाशी ह्याचा संबंध नाही
बेब्लेड बेब्लेड हो जाय शुरू
एक दोन तीन म्हणत गंमत शुरू
जिंगा, क्योयो, बेन्टो, केन्टा
बेब्लेड सोडतात सटासटा
पेगसिस, लिऑन, एल्ड्रॅगो, सॅजिटेरियो
स्टेडियममें आजाओ
जिंगा नेहेमी जिंकतो
कॅन्टा नेहेमी हरतो
पण ऐका!
बेब्लेड जास्त खेळू नका
आई जोरात मारते हाका.
छान लिहिलीय गं कविता. नचिकेत,
छान लिहिलीय गं कविता. नचिकेत, तुला एक मोठ्ठे कॅडबरी सिल्क या कवितेसाठी.
या कवितेतले कार्टुन नेटवर्क पाहायला पाहिजे एकदा...
एवढी जम्माडी गंमत असते त्यात माहित नव्हते.
गुड.. एकुण हे बेब्लेड चे वेड
गुड.. एकुण हे बेब्लेड चे वेड आंतर भारतीय दिसतय.
आँ. एवढे सगळे असते कार्टुनात
आँ. एवढे सगळे असते कार्टुनात ते तुझ्यामुळे कळले रे नचिकेत.
शाब्बास. मस्त कविता करतोस रे तू.
नेहमी करत जा आणि आईला इथे टाकायला सांग.
एकुण हे बेब्लेड चे वेड आंतर
एकुण हे बेब्लेड चे वेड आंतर भारतीय दिसतय. >>> अगदी अगदी
नचिकेत छानच आहे तुझी कविता
मस्त कविता...
मस्त कविता...
कविता! सानूला आवडली का ते
कविता!
सानूला आवडली का ते कळव
(आवडेलच ;))
बाप्रे! बेब्लेड प्रकार झिणझिण्या आणणारा आहे (आपल्याला)! ती नावंसुद्धा किती अवघड आहेत (लिहायला!) मुलं तल्लीन होऊन खेळत असतात. सर्व मुलग्यांकडे बेब्लेड आहेच. मी एकदा वैतागून त्याला विचारले, की कोणाकडे बेब्लेड नाहीये तुझ्या माहितीत, सांग बरं, तर खूप विचार करून म्हणाला, 'गर्ल्सकडे'
कमाल म्हणजे ह्याच खेळाची फॅशन माझा भाचा लहान असताना, म्हणजे साधारण ८-९ वर्षांपूर्वीही आली होती आणि तेव्हाही अशीच क्रेझ होती!
सगळ्यांचे आभार. संध्याकाळी नक्की वाचून दाखवेन सर्व प्रतिसाद
नचिकेत, कविता छान झाल्ये
नचिकेत, कविता छान झाल्ये
नचिकेत, तुझी कविता ज्याऽऽ म
नचिकेत, तुझी कविता ज्याऽऽ म आवडली.
वा वा. खरच मस्त झालीये कविता
वा वा. खरच मस्त झालीये कविता

शाब्बास.
खरच मराठी भाषा दिनासाठी द्यायला हवी होतीस
शाब्बास नचि!! झक्कास कविता.
शाब्बास नचि!! झक्कास कविता. मला खूपच आवडली.
पूनम, त्याचं मराठी आणि इंग्रजी अक्षर खूप छान आहे. आणि इतक्या लवकर त्याने सराईतपणे मराठी लिहावं अशी अपेक्षाही नाही. कवितेतून त्याचा निरागसपण पुरेपूर उतरलाय. एक छोट्टासा मुलगा अगदी गोड चेहर्याने आपल्याला आवडणार्या कार्टूनांविषयी बोलतोय हे माझ्या डोळ्यांसमोर आलं.
बेब्लेड काय असतं?
शाब्बास नचिकेत. छान लिहिलियेस
शाब्बास नचिकेत. छान लिहिलियेस कविता.:)
मला यातलं एक टॉम अँड जेरी सोडलं तर दुसरं कोणतंच कार्टून माहित नाहीये. एखादा दिवस कार्टून नेटवर्क लावून बसावं लागणार बहूतेक.
भारी आहे.
भारी आहे.
छान
छान
कविता छान आहे मला पण टॉम अँड
कविता छान आहे
मला पण टॉम अँड जेरीच माहित आहेत.
शाब्बास नचिकेत, मस्त
शाब्बास नचिकेत, मस्त लिहिलीयेस कविता.
सगळे मुलगे 'हो जाये शुरु' करत असतात आणि मुलींना त्यात अज्जिबात इंटरेस्ट नसतो.
अगदी ग पूनम, बेब्लेडची पुन्हा खूप साथ आहे सध्या
मस्त केलेय की कविता. शाब्बास!
मस्त केलेय की कविता. शाब्बास!
शाब्बास नचिकेत! माझ्या
शाब्बास नचिकेत! माझ्या भाच्यांना आवडणारी कविता.... कार्टून नेटवर्क म्हणजे जीव की प्राण आहे नुसता.... त्यांना देखील तुझी कविता वाचायला देईन हां!
रच्याकने : सध्या बालसमुदायात सोनी वरची सी आय डी सीरियल अतिशय लोकप्रिय आहे. माझी भाचे मंडळी ती सीरियल, तिचे री-रन्स तासंतास बघू शकतात, त्यावर गप्पा मारू शकतात, आणि आता तर ते सी आय डी - सी आय डी खेळत असतात. एक जण दया होतो, एक अभिजीत इ. इ. आणि जिकडे तिकडे पुरावे शोधत हिंडत असतात!!!
छान कविता नचिकेत. अक्षराचं
छान कविता नचिकेत.
अक्षराचं वळण पण छान आहे.
शुद्धलेखन पूनम घेईलच करून योग्य वेळी..
वेळेत का नाही गं टाकलीस. खट्टू झाला असेल ना त्यामुळे नचि?
नचीकेत ...भारी आहे... टॉम
नचीकेत ...भारी आहे...
टॉम आणी जेरी लहान मुलांबरोबर मोठ्ठ्यानाही आवडत हे आणी वेब्लेड बाबतच निरीक्षण मस्तच रे...
मस्तच रे नचिकेत. मिहिकालाही
मस्तच रे नचिकेत.
मिहिकालाही आवडली कविता.
पूनम, बापसे बेटा सवाई आहे हो.
बेब्लेड जास्त खेळू नका आई
बेब्लेड जास्त खेळू नका
आई जोरात मारते हाका.>>>>
ही भारीये
भारीच आहे!
भारीच आहे!
नचिकेतची कविता भारी आहे एकदम.
नचिकेतची कविता भारी आहे एकदम. अक्षर पण छान आहे. त्याला शाब्बासकी
मनापासून धन्यवाद लोक्स
मनापासून धन्यवाद लोक्स
शाब्बास नचिकेत! मस्त जमलीये
शाब्बास नचिकेत! मस्त जमलीये कवीता!
२४/७ तुम्ही फक्त निक पाहता
२४/७ तुम्ही फक्त निक पाहता का? नचिकेतची कविता १दम मस्त जमलीये
पण पौर्णिमा, तुझे डोके कसे काय गरगरत नाही ग?
ह्याच खेळाची फॅशन माझा भाचा लहान असताना, म्हणजे साधारण ८-९ वर्षांपूर्वीही आली होती आणि तेव्हाही अशीच क्रेझ होती!>>> अगदी मला ८वते आहे. आपला भोवरा यांना नाही जमत पण ते बेब्लेड मात्र आवडते.
आता तर ते सी आय डी - सी आय डी खेळत असतात. एक जण दया होतो, एक अभिजीत इ. इ. आणि जिकडे तिकडे पुरावे शोधत हिंडत असतात>>> हा १ भयानक प्रकार. दया, अभिजीत ठीके, पण किलर कोणाला करतात?
मी लेकानं म्हटल्यावर
मी लेकानं म्हटल्यावर गोंधळलो
त्या एवजी माझा लेक त्याची कविता अस छान वाटलं असत
कविता छान आहे
Pages