माझी मराठी माऊली : ओवी

Submitted by अभय आर्वीकर on 26 February, 2011 - 22:40

माझी मराठी माऊली : ओवी

माझी मराठी माऊली, जसा ओंकाराचा वाण
शब्दशब्द मोहविते, हरपते देहभान ...॥१॥

माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती
ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती ...॥२॥

माझी मराठी माऊली, जसा गंगेचा प्रवाह
ओघवते उच्चारण, मन बोले वाह! वाह!! ...॥३॥

माझी मराठी माऊली, कोकिळेची कुहूकुहू
जशी पहाटेची साद, येते कानी मऊमऊ ...॥४॥

माझी मराठी माऊली, इंद्रधनुष्याचे रंग
आणि सुवासाने होई, चंपा, जाईजुई दंग ...॥५॥

माझी अभय मराठी, रेशमाची नरमाई
दिसे माऊली शोभून, सार्‍या जगताची आई ...॥६॥

गंगाघर मुटे "अभय"
.......................................................................
सर्वांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
......................................................................

गुलमोहर: 

माझी मराठी माऊली, इंद्रधनुष्याचे रंग
आणि सुवासाने होई, चंपा, जाईजुई दंग ...॥५॥

अशा खास कवितेतुन तुमच मराठीच अस्सल प्रेम दिसुन येतं !
Happy

"माझी मराठी माऊली, शब्दामध्ये सरस्वती
ओव्या, श्लोक वाचुनिया, सारे जन सुज्ञ होती ...॥२॥"
.... छान

मराठी दिनाचं औचित्य साधून ही कविता काल पोस्ट केलीत .... छान वाटलं

व्वा गंगाधरराव, सुंदर आहेत या ओव्या.

तुम्हाला व ईतर सर्व मायबोलीकरांना मराठी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!!