Submitted by अरुंधती कुलकर्णी on 26 February, 2011 - 03:31
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
माठाची पाने निवडून, स्वच्छ धुवून, चिरून घ्यावीत. कांदा बारीक चिरावा. फोडणीसाठी कढई/ पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्यावा. त्यात वाटण, लसूण पाकळ्या व आल्याचा तुकडा घालून परतावे. माठाची चिरलेली पाने, मीठ घालून ते परतावे. मुगाची डाळ घालून परतून घ्यावी. गूळ घालावा. भाजी शिजत आली की वरून नारळाचे दूध घालून ते सुकेपर्यंत भाजी परतावी.
वाढणी/प्रमाण:
तीन ते चार माणसांसाठी
अधिक टिपा:
१. मूळ कृतीत गूळ नाही. आवडत नसल्यास घालू नये. मी घातला आहे.
२. नारळाचे दूध अजून जास्त घालू शकता. भाजी अगदी पूर्ण सुकेपर्यंत न परतता ओलसर ठेवूनही चांगली लागते.
३. ह्याच पध्दतीने मेथी, पालक यांच्या पालेभाज्याही करता येतात.
४. मूग डाळ, नारळाचे दूध, तीळ इत्यादींमुळे ह्या भाजीला एक प्रकारचा मऊसूत पोत येतो.
माहितीचा स्रोत:
लक्ष्मीबाई धुरंधरांचे पुस्तक
आहार:
पाककृती प्रकार:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तांदळाच्या भाकरीबरोबर छान
तांदळाच्या भाकरीबरोबर छान लागेल. आमच्याकडे हे पुस्तक, मुळ आवृतीमधले होते.
दिनेशदा, माझ्याकडे सध्या त्या
दिनेशदा, माझ्याकडे सध्या त्या पुस्तकाची १९ वी आवृत्ती आहे!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ही भाजी पोळीबरोबरही चांगली लागली. वाटण लावून माठासारखी पालेभाजी करता येते हेच मला नवीन! त्यामुळे चव कशी असेल ह्याबद्दल जरा धाकधूकच वाटत होती. पण छान लागते ही भाजी, सो नो प्रॉब्लेम!