आमच्या शेतावर काम करणार्या पार्वतीमावशींच्या घरी गेले होते. पार्वतीमावशी तशी काळी, बुटकी, सुमार अंगकाठी त्यात काळ्या कुळकुळीत केसांना चोपडलेल्या तेलाला उन्हात काम करताना चेहर्यावर ओघळावे वाटायचे त्यामुळे एकदम तेलाची देवी दिसायची. हातात चमचम करणार्या बांगड्या, नाकात चमकी, कपाळावर दारू पिणार्या, दुसर्या बाईशी राजरोस संबंध ठेवणार्या नवर्याच्या नावाचे कपाळभर कुंकू, अंगावर बहुतेक हिरवी किंवा जांभळी किंवा गडद लाल अशा मळखाऊ रंगाची साडी. गळ्यात काळी पोत नि चार सोन्याचे मणी. अशा अवतारात कायम वावरणार्या पारवतीचं घर कसं असेल याची कल्पना करता येत नव्हती.
तिच्या घरी गेले नि एक सुखद धक्का बसला. जेमतेम १०० उंबर्याच्या आमच्या गावातलं पार्वतीचं घर असं चंद्रावानी लख्ख असेल असं खरंच वाटलं नव्हतं. चार पायर्या चढून मग साताठ माणसं चहा प्यायला बसू शकतील एवढं अंगण. चक्क झाडलेलं. शेणापाण्यानं शिंपलेलं. मग उजवीकडे आधी नहाणी. कामापुरता आडोसा केलेली. बाहेर पाणी तापवायची चूल. त्यातली सकाळची राख आणि कोळसे नीट ढीग करून ठेवलेले. आंघोळीच्या बादल्या आणि पाणी तापवायचं जर्मनचं भांडं उन्हात लखलख चमकत होतं. तुळशीची कुंडी ओलांडली की दोन पावलांवर सैपाकघर. साधारण तीन माणसं एका वेळी जेवायला बसू शकतील एवढं मोठं. कोपर्यात चूल. थेट वर धुराडं. जमीन स्वच्छ सारवलेली. पायाला मऊ लागेलशी. भिंती पांढर्या मातीनं लिंपलेल्या. चुलीच्या बाजूला फडताळ. त्यावर साताठ 'इस्टीलचे' डबे. खाली ताटाळं. त्यात मोजुन ५ ताटं. खाली अजून एक कप्पा. त्यात एका बाजूला साताठ वाट्या, डाव चमचे वगेरे अडकवलेले. चार कप नि चार बशा नीट दुरडीत ठेवलेल्या. चुलीच्या दुसर्या बाजूला सोन्याची वाटावीत अशी पितळेची चार भांडी. पाण्याच्या घागरी. एक माठ नि एक बादली. तिथेच तांबेपेले रचून ठेवलेले.
कौतुकाने पार्वती चहा करायला गेली. आणि मी बाहेर आले. दुसरी खोली ही घरातल्या तीन प्रौढ, दोन तरूण अशा पाच लोकांची बैठक, झोपण्याची खोळी, कपडे ठेवण्याची जागा, देवपूजेची जागा नि टी व्ही बघण्याची जागा. ती ही अशीच स्वच्छ ! कुठे जळमट नाही.साठेलेली धूळ नाही. पाली झुरळं नाहीत की मुंग्यांची रांग नाही. कपडे फडताळात घडी घालून ठेवलेले. भिंतीवर देवतांच्या तसबीरी. गांधीजी आणि बाळासाहेब ठाकरे पण. शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान !
पार्वतीने आणलेला गोडमिट्ट चहा प्यायले नि तिच्या सासूशी गप्पा मारत बसले. घरातले सगळे सकाळी आठ वाजता न्याहारी करून नि डबे घेऊन कामाला जातात. शेतावर, फॅक्टरीवर मजुरी करतात नि संध्याकाळी सात साडेसातला घरी येतात. घरातले सगळे घरातली कामंही करतात. आता लवकरच पार्वतीला दोन सुना येणार आहेत म्हणून सगळे खुष होते.
दुसरा प्रसंग. एका मैत्रिणीचं एका मोठ्या शहरातलं घर. बर्याच दिवसांनी गेले होते. ही मैत्रिण दिसायला एकदम स्मार्ट. गोरीपान. भरपूर कमावणारी. आधुनिक कपड्यात वावरणारी. चार लोकांमध्ये बोलताना छाप पाडणारी. आत्मविश्वास ऊतू जाणारी. नवरा पण अगदी साजेसा केला. अनेक पार्ट्यांमध्ये सगळ्यांचे डोळे क्षणभर तरी या दोघांवर टिकत.
हिच्या घरी गेले. दारापुढे तीन चार दिवसांचा कचरा बिनझाकणाच्या डस्टबीन मध्ये ठेवलेला. त्याची दुर्गंधी ! दार उघडल्याबरोबर एक घाण भपकारा आला ! धुवून वाळत न घातलेल्या कपड्यांचा. पंखा लावला गेला. खिडक्या उघडल्या गेल्या. तेव्हा बरं वाटलं. हॉलमध्ये जमिनीवर सगळीकडे कारपेट होते. चकचकीत टी व्ही, सोफा, चार शोभेच्या कुंड्या, वॉल हँगिंग आणि पेंटीग्स खूप महागडी दिसत होती. त्यातले चित्र नेमके काय आहे ते कळतच नव्हते म्हणजे उच्च अभिरुची वगेरे असणार !
उत्साहाने मी घर बघायला सुरुवात केली. ती एकेक रूम दाखवत होती. हॉल बघून झालाच होता. सैपाकघर तसेच आधुनिक होते. बेडरूम प्रशस्त, हवेशीर आणि बाल्कनी लागून असलेली. मुलांची खोली पण रंगीबेरंगी आणि खेळण्यांनी भरलेली. ( तरी अजून मुलं व्हायची आहेत ! ) ती म्हणाली मी फ्रेश होऊन येते तोवर बस निवांत. मी म्हटलं मी तोवर चहा करते. मग मी सैपाकघरात गेले. कप घेतला, कपाच्या बुडाशी किटण साठलेलं होतं. दांड्यापाशी खूप मळ दिसत होता. चहासाखरेचे डबे शोधायला गेले तर डब्यावर एक मोठ्ठं झुरळ बैठक मांडून आपली मालकी दाखवत होतं. चमच्यांचा ड्रॉवर उघडला तर त्यातही कडेने झुरळाची विष्ठा आणि अंडी..दूध घ्यायला फ्रीज उघडला नि मळमळून आलं. एका वाटीतल्या भाजीवर फ्रीजमध्येही बुरशी आली होती. आंबट वरण बहुदा कालचे असावे. ते उघडेच होते. एका बाउलमध्ये काळी पडलेली कणिक होती. आणि चक्क फ्रीज मध्ये बटाटे आणि लसूण ठेवलेला होता ! ब्रेडचा पुडा आणि फ्लॉवरचा गड्डा यांच्यामागे दुधाचे भांडे होते. ते घेतले. चहात घातले. मग पिताना लक्षात आले की या दुधाला विचित्र वास लागलाय. कसाबसा चहा संपवला.
मैत्रिण मात्र अगदी रिलॅक्स होऊन गप्पा मारत होती. या त्या वस्तूच्या किमती, कपडे, फर्निचर, कामाला असलेल्या दोन बायका कशा विश्वासू आहेत, नवर्याची नोकरी १० ते ६ वाली असल्याने तो किती निवांत असतो वगेरे वगेरे...
निघण्यापूर्वी फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये गेले. मोठे बाथरूम. शेवाळलेले. कमोडवर डाग ! फ्लश नीट चालत नाही. सर्वत्र केसांचे पुंजके. दाढी केल्यावर न धूता ठेवलेले दोन ब्रश. संपलेल्या टूथपेस्टच्या न फेकलेल्या ट्यूब्ज, अनेक प्रकारची अत्तरं नि साबणं नि शाम्पू नि अजून काय काय अस्ताव्यस्त आरशासमोरच्या टीच भर जागेत ठेवलेले. वॉशिंग मशिनवर आंघोळीच्या बादल्या नि त्यात भिजवलेले कपडे, आणि कळस म्हणजे घाणेरडे सॅनिटरी नॅपकिन्स कोपर्यात पडलेले !!!! पटकन बाहेर आले.
तेवढ्यात तिच्या बाल्कनीतून दिसणारा व्ह्यु बघायचा राहिलाय असा तिला साक्षात्कार झाला. माझ्यासमोर चपला आणून ठेवल्या. म्हणे खूप धूळ आहे तिथे ! तिचा तो घाणेरडा पसारा डोक्यात घेऊन घरी आले नि आधी आंघोळ केली.
पार्वतीच्या घरासारखी अनेक घरं पाहिली आहेत. अगदी एका झोपडी पासून चौसोपी वाड्यापर्यंत नि शहरातल्या वन रूम किचन पासून ते व्हिला पर्यंत. पण या माझ्या मैत्रिणीच्या घरासारखी घरं त्याहून जास्त पाहिली आहेत.
काही गोष्टी कशा डोक्यात जातात नि आपण काहीच करू शकत नाही ! पडद्यांना हात पुसून विशिष्ट भाग काळे झालेले असतात, बेसिनवरच्या आरशावर दात घासताना उडालेली रांगोळी असते, आरशाला टिकल्या चिकटवल्याने पडलेले डाग, कळकट कपातुन आलेला चहा, पाणी प्यायच्या भांड्याला लटकणारा लांबलचक केस, ड्रॉवरमध्ये नांदणारी झुरळं, कपड्यांचा घाणेरडा कुजका वास, फ्रीजमध्ये येणारा वास, केवळ हवा घरात खेळू न दिल्याने घरभर असणारा कोंदट वास....
ह्म्म... लक्षातच येत नसेल का हे घाण आहे, आरोग्यासाठी खूप वाईट आहे म्हणून ? की सवय होते ? की कसे मॅनेज करावे, कसे स्वच्छ करावे हे कळतच नाही ? बहुतेक असेच काहीतरी असावे.
यावर खरंच खूप सोपे उपाय असतात. फार वेळखाऊ पण नसतात. ते लक्षात येणे महत्त्वाचे. मनात आले हे तुम्हा सर्वांशी शेअर करावं.
तुम्हाला माहीत असलेल्या साध्या सोप्या, कमी खर्चिक आणि घर
सुंदर स्वच्छ ठेवण्यासाठी मदत करणार्या अशा काही टिप्स इथे प्लीज शेअर करा.
शेजारी शिवाजी महाराज आणि
शेजारी शिवाजी महाराज आणि त्यांच्या बाजूला आमीर खान >>>
दुसरा किस्सा: याईक्स.
सायो, नुसता प्रतिसाद ? टिप्स
सायो, नुसता प्रतिसाद ? टिप्स द्या हो...
तुझा लेख वाचून घर आवरायला
तुझा लेख वाचून घर आवरायला गेले. एक हप्ता पूर्ण झाला. आता उरलेला करेन.
माझे एक रूटीन आहे ते इथे
माझे एक रूटीन आहे ते इथे लिहीन पण स्वच्छतेला पर्याय नाही.
आळशीपणावर उपाय काय..स्वतःच्या
आळशीपणावर उपाय काय..स्वतःच्या घरात स्वतःला तरी बरे वाटले पाहीजे इतपत स्वच्छता हवीच.. पुष्कळ बॅचलर मुलींच्या फ्लॅटचीही हीच अवस्था असते.. जिने दुध आणुन तापवुन घेतलेय तिने पातेलं स्वच्छ नाही केलं की ते ३ दिवस तसंच.. अवघड आहे.
किचनमध्ये चिमणी नसेल तर फोडणीचे तेल कट्ट्याच्या फरशीवर उडते आणि थोड्या दिवसांनी चिकट होउन सहजासहजी निघत नाही. त्यापेक्षा ओटा आवरतानाच हातासरशी पटकन पुसुन घ्यायचे , १५ दिवसातुन एकदा साबनाच्या पाण्याने पुसुन घेतलं तरी त्या फरशा सहज स्वच्छ, चमकदार होतात.
चांगला विषय मितान. अस्वछतेची
चांगला विषय मितान.
अस्वछतेची एक प्रवृत्तीच असते असं मला वाटायला लागलय. या घाणेरड्या लोकांना कळतच नाही आणि जाणवतही नाही की ते किती गलिच्छपणा करतायत. दुसर्याकडे गेल्यावर स्वच्छता बघूनही आपल्यात काही बदल करावा असं त्यांच्या मेंदुपर्यंतच पोहोचतच नसावे. अशांचे 'स्वच्छतेचे इंद्रिय' कामच करत नसते तर कोण काय करणार?
माझ्या बहिण तिच्या मैत्रिणीच्या घरी जेवायला गेली असताना, त्या मैत्रिणीने विळी घेतली, कोबी घेतला आणि डायरेक्ट चिरून जमिनीवरच ठेवला. मग गोळा करून (धुतला की नाही ते माहित नाही) भाजी केली. एका घरातील स्वयंपाकघरात तर जे फडके हात पुसायला वगैरे वापरतात, त्यानेच ओटा पुसणे आणि त्याने (अतिशयोक्ती नाही) ताट पुसणे हे प्रकार पाहिलेत.
घरात लहान मुल वगैरे असेल तर पसारा समजू शकतो पण धूळ आणि कचरा???
अश्विनीमामी, तुमच्या रुटिनची वाट पाहत आहे.
दुसर्याकडे गेल्यावर स्वच्छता
दुसर्याकडे गेल्यावर स्वच्छता बघूनही आपल्यात काही बदल करावा असं त्यांच्या मेंदुपर्यंतच पोहोचतच नसावे. अशांचे 'स्वच्छतेचे इंद्रिय' कामच करत नसते तर कोण काय करणार?>> मामी , अगदी .
आणि सायो म्हणाली तसे हा लेख वाचुन घर आवरायला घ्यावे असेही मनात आले.
दुसरा अनुभव खरंच याइक्स... पण
दुसरा अनुभव खरंच याइक्स...
पण हो हे असं मी पण अनुभवलंय. एका ओळखीच्यांच्या घरी.
एक पटकन आठवलं म्हणून.
काचेचा ग्लास/ स्टीलचे पेले विसळल्यावर उपडा ठेवला जातात आणि मग तो जनरली शोकेसमधे जातो. ज्यांच्याकडे त्याच ग्लासेसमधूनच दूध, ताक पासून आमटी आणि दारूही प्यायली जाते अश्यांकडे विशेषतः हे घडतं. अनेकदा ग्लासेस आतून पुसलेले नसले तर पाणी अर्धवट वाळतं. आणि शोकेसमधे ग्लास उपडे ठेवल्यावर आतमधे हवा कोंडली जाते. असे ग्लास पाणी प्यायला दिले तर पाण्याला फॉर्मॅलीन प्रकारचा विचित्र वास येतो. मग त्या घरात पाणीही पिऊ नये असं होतं.
ग्लासेस/ पेले यातून शक्यतो दूध, ताक, आमटी घेऊ नये आणि घेतलेच तर त्यासाठी वेगळे, पाण्यासाठी वेगळे, दारू-ज्यूस साठी वेगळे ग्लासेस वापरावेत. ग्लासेस धुवून ठेवायच्या जागी उपडे ठेवणार असल्यास हवा जाईल असे बघावे किंवा ग्लासेस/पेले सरळच ठेवावेत. दोन्ही शक्य नसेल तर मग कुणालाही पाणी देताना तरी निदान ते परत एकदा विसळून आणि पुसून द्यावेत.
टिप्समधे माझे २ पैसे!
खरच चांगला विषय. दुसरा किस्सा
खरच चांगला विषय.
दुसरा किस्सा खुप भयाण आहे... पण असे किस्से बघितलेत जे बघुन किळस ला पण किळस येइल
मुंबईत एका ओळखिच्यांच्या घरी दुपारी चहाला गेलो होतो. हॉल मधे अंधार/ खिडक्या बंद... सोफ्यावर, टेबलावर वर्तमान्पत्र, टपाल इतस्तः पसरलेले. दरवाज्यातच चपला, बुट विखुरलेली. किचनमधे इतकी घाण... कचर्याचा डब्बा उघड्यावर, ओट्यावर पसारा, सिंक मधे उष्टी-खरकटी भांडी, तुंबलेल पाणी, त्यातच खरकट टाकलेल. अगदी चिकनची हाडं सुद्धा :य्याक्क: आठवुन सुद्धा शिसारी येते. चहा सुद्धा नको म्हंटल मी... माझ्या साबांना तर अगदी मळमळायलाच लागल होत ती हाडं वगैरे बघुन...
दुसर्या एक काकु, दुधावरची साय कचर्यात फेकतात
बाथरुम मधेच अंडरगार्मेट्स वाळत घालणे, बेसिनवरच टुथब्रश ठेवणे, कंगव्याला केस तसेच... ईईई...
जाऊदे..
बेसिनवरच टुथब्रश ठेवणे,<<<
बेसिनवरच टुथब्रश ठेवणे,<<< आँ???
म्हणजे आडवा म्हणतेयस का?
आमच्याकडे एका ग्लासात पेस्ट आणि ब्रश उभे करून ठेवलेले असतात बेसिनवरच. त्याची किळस येते लोकांना?
हे वाचून मला ही Shel
हे वाचून मला ही Shel Silverstein ची कविता आठवली. मुलांना फार आवडते.
http://cwmi.css.cornell.edu/TrashGoesToSchool/Sarah.html
म्हणजे आडवा म्हणतेयस का?<<<
म्हणजे आडवा म्हणतेयस का?<<< हो आडवा.. एक नाही.. ४.. अख्ख्या फॅमिलीचे .. त्याच्याच शेजारी केशजडित कंगवा :य्याक्क:
लालु, छान कविता आहे
केशजडीत कंगवा हे खरंच याक्क!
केशजडीत कंगवा हे खरंच याक्क!
शक्यतो रोजची स्वछता रोज केली
शक्यतो रोजची स्वछता रोज केली तर इतकी कामं साचणार नाहीत. फ्रिजमध्ये वस्तु ठेवतांना त्याची वर्गवारी करुन ठेवले तर जास्त सोपे पडेल्....म्हणजे अगदी वरच्या कप्पयात्.....दुध, दही, लोणी (दुध पातेल्यात ठेवले असेल तर त्यावर जाळीची ताटली ठेवावी, दही घरी लावलेले असेल तर त्यावर पण झाकणी ठेवायला विसरु नये.
मधल्या कप्प्यात अन्न उरले असल्यास शक्यतो झाकणाच्या डब्यांमध्ये व्यवस्थित झाकण लाऊन ठेवले तर त्या त्या पदार्थांचा वास फ्रिजला येणार नाही. - कितीही कंटाळा आला तरी फ्रिज २-३ दिवसांनी एकदा बघुन नको असलेल्या गोष्टी काढुनच टाकाव्यात.
भाज्या म्हणजे फ्लॉवर वैगेरे - पाठीमागचे सगळे काढुन, मग फ्लॉवरचे तुरे कापुन डब्यात ठेवले तर त्याचाएक उग्र वास फ्रिजला लागत नाही
कप्पे ठरवुन वस्तु ठेवल्यात तर त्या सापडायला सोप्या पडतात.
भांडी घासल्यानंतर ती पालथी घालायला - वापरुन जुने झालेले दोन टर्किशचे टॉवेल ठेवलेत तर बरे पडते, एक वापरला की धुवायला टाकायचा, दुसरा काढायचा.
किचन मध्ये वापरायच्या न्यापकिन्सचे रंग ठरवुन घेतले की मग जास्त सोपे पडते....म्हणजे स्वयंपाक करतांना हात वैगेरे पुसायला डार्क निळ्या रंगाचे न्यापकिन्स तर ताटं, वाट्या, पेले पुसायला गुलाबी किंवा ऑफ व्हाईट
घरातली स्वछता करणे म्हणजे एक प्रकारचा व्यायामच असतो आणि त्यामुळे घर तर स्वछ होतेच पण त्या व्यायामाचा आपल्या शरिराला पण फायदा होतो....स्वछतेने मन प्रसंन्न रहाते.....
मितान खुप जास्त टिप्स दिल्या का ग.....??
बाहेरच्या खोलीत दिवाण /
बाहेरच्या खोलीत दिवाण / सीटींग वर ज्या बेडशीट घालतात त्याची अतिभयाण कंडीशन मी पाहीलीये... जे लो़ड / कुशन्स ठेवले होते.. त्याच्या आतला कापुस लोंबत होता कव्हर फाडुन ईईईक्स
विकत घेतल्यापासुन फेकुन द्यायच्या मधे धुण्याची प्रोसेस नसावीच बहुतेक
दिप्ती, तु लिहीलयस तसे माझे
दिप्ती, तु लिहीलयस तसे माझे पण भांडी वाळत घालायचे मोठे टॉवेल आहेत. प्लेट्स, ग्लासेस रॅक वर, चमच्यांसाठी वेगळा स्टँड.
भांदी घासायला पण वेगळे स्क्रबर्स्.स्पाँजेस आहेत. पाण्याची भांडी, ग्लासेस, काचेची भांडी यासाठी एक, बाकी स्वयंपाकाच्या भांड्यांना वेगळा आणि लेकीच्या भांड्यांसाठी अजुन एक. डिशवॉशरमधे सगळी भांडी स्पेशाली मोठी कढई वगैरे जात नाही ती हातानेच धुवावी लागतात.
डिशवॉशरमधे भांडी ठेवताना सुद्धा नीट डाळुन ठेवावीत. भांडी आधी थोडी हलक्या हाताने विसळुन मग थेवली तर नीट स्वच्छ निघतात आणि डिशवॉशर पण चोक वगैरे होण्याची शक्यता नसते.
हात पुसायला एक किचन टॉवेल आणि भांडी पुसायला दुसरा< अनुमोदन
फ्रिजमधे कप्पे ठरवुन वस्तु ठेवल्यात तर त्या सापडायला सोप्या पडतात<< अगदी बरोबर.
प्रत्येक क्रियेच्या विरुद्ध क्रिया वेळच्यावेळी पुर्ण झाल्या पाहिजेत असे कुठेतरी वाचले होते.. म्हणजे कपाट उघडल, सामान काढलं की कपाट बंद करणे, सामान विकत आणल की लगेच जागेवर लावुन ठेवणे.
आपल्या हाताला सवय लावुन घेणे महत्वाचे. थोडी शिस्तही हवीच. घरच्यांना सुद्धा सवय लावावी. नवर्यावर, मुलांवर जबाबदारी टाकावी. मुलांनाच त्यांचे खेळ आवरुन ठेवणे, रुम आवरणे याची सवय लावावी. बुट काढले की स्टँडवर ठेवणे, मोजे धुण्याच्या बास्केट मधे टाकणे. वर्तमानपत्र वाचले की आवरुन ठेवणे.. सध्यासाध्या गोष्टी असतात...
ह्म्म्म्म, भारी धागा मितान,
ह्म्म्म्म, भारी धागा मितान, लिहिते सवडीने,
लाजो अगदी अगदी, १०० मोदक तुला
लाजो अगदी अगदी, १०० मोदक
लाजो अगदी अगदी, १०० मोदक तुला<< स्मिते
मोदक केले की ओटा आवरणे, मोदक खाऊन झाले की प्लेट्स धुवुन ठेवणे, वाळल्या की जागेवर लावणे. उरलेले मोदक नीट डब्ब्यात भरुन फ्रिजमधे ठेवणे
अजुन एक, फ्रिज मधे सामान ठेवताना डब्यावर लेबलवर किंवा मार्कर वगैरे ने त्या दिवशीची तारिख घालावी. काही गोष्टी १-२ दिवसात संपवाव्या लागतात. काही ६-६ महिने पण टिकु शकतात (जॅम, लोणची, सॉस वगैरे). डब्यावर तारिख असेल तर फ्रीज साफ करताना काय ठेवायचे आणि काय टाकायचे ते लगेच कळते. एक्स्पायरी डेट्स जवळ आलेल्या वस्तु वापरुन टाकायच्या किंवा डेट उलटुन गेलेल्या वस्तु टाकुन देता येतात. इथे कंटेनर्स मिळतात त्याला अशी लेबल्स असतात, त्यावर मार्करने लिहीले की झाले. लेबल धुतले की मार्किंग निघुन जाते.
फ्रिजर मधे सुद्धा भारंभार सामान भरु नये.
खरतर जेव्हढ आवश्यक तेव्हढच सामान आणाव. काय सम्पल, काय संपणार आहे, याची लिस्ट करावी आणि त्याप्रमाणे सामान आणाव, म्हणजे उगाच वस्तु आणुन कपाट भरत नाहीत.
दुसरा एक अतिभयानक किळसवाणा
दुसरा एक अतिभयानक किळसवाणा प्रकार म्हणजे. टॉयलेटची सीट. ही ओली दिसली की माझे डोकेच फिरते. शिवाय आपण कमोड वापरायला लागलोय पण त्याबरोबरच टॉयलेट पेपर्स असले पाहिजेत हे बरेचजणं लक्षात घेत नाहीत. घरातील पुरुष मंडळींना टॉयलेट वापरण्याआधी सीट उचलून वर करण्याची सवय लावणे गरजेचे असते.
मुळात कुणाकडे कमोड असेल तर
मुळात कुणाकडे कमोड असेल तर जायचीच इच्छा होत नाही.
गुडघ्यात प्रॉब्लेम असलेले ज्ये ना सोडले तर कमोडचा देशी पद्धतीपेक्षा काय जास्त उपयोग आहे खरं तर? फुकट आम्ही मॉडर्न म्हणून कमोड लावून घ्यायचे आणि ते नीट ठेवता पण येत नाहीत मग त्यात डास वाढतात.
बाकी पोटासाठी योग्य प्रेशर येत नाही आणि बसाउठायची सवय मोडते हे प्रॉब्लेम्स वेगळेच...
मागच्यावर्षी आर्चिज गॅलरीतुन
मागच्यावर्षी आर्चिज गॅलरीतुन एक छोटे पोस्टर आणले आहे ते टॉयलेट मधे लावलय घरी....त्यावर
"if you sprinkle, when you tinkle, be a sweetie and wipe the seatie" असं लिहीलय
मी फोटो टाकेन त्याचा.
आणि हे वाचून भारतीय
आणि हे वाचून भारतीय पुरूषमंडळींना फरक पडणारे?
लाजो , नक्की टाक फोटो. सही
लाजो , नक्की टाक फोटो. सही मेसेज आहे.
मला माझ्या घरात डब्यांच्या
मला माझ्या घरात डब्यांच्या ऑर्गनायझेशन बद्दल प्रॉब्लेम येतोय.
जागा अगदीच लिमिटेड आहे. रेन्टल असल्याने सोयी करून घेणे यावर पण मर्यादा आहेत. खाउचे डबे कश्या पद्धतीने मॅनेज करता यावर कोणी टिप्स दिल्यास फार बरे पडेल.
मी साधारण गोड वस्तू, नमकीन वस्तू, बिस्किटे, पाकीटे (सूप्स, पॉपकॉर्न, पापड इत्यादी) अशी वर्गवारी करते. पण कधी डबे कमी पडतात. कधी डबा मागे गेल्याने बरेच दिवस एखाद्या वस्तूकडे लक्ष दिलं जात नाही तर कधी मोठा डबा घेऊन बघितला तर जागा पुरत नाही.
आईकडे प्रायोरिटी प्रमाणे वस्तू असायच्या. रोज लागणार्या पुढे, अधून्मधून लागणार्या त्याच्या मागे, कधीतरीच लागणार्या एकदम मागे. कधीतरीच लागणार्या ही क्याटेगरीच मी उडवून टाकलीये. कधीतरीच लागणार्या वस्तू जेवढ्यास तेवढ्या आणायच्या आणि तेव्हाच्या तेव्हा संपवून टाकायच्या.
मला चौकोनी आणि उभे असे डबेही मिळत नाहीयेत ज्यात चिवडा, शेव, चिप्स ची पाकिटे मावतील.
तर एकुणात असा जरा खाऊ पातळीवर घोळ आहे. जरा मदत करा बरं.
आणि हे वाचून भारतीय
आणि हे वाचून भारतीय पुरूषमंडळींना फरक पडणारे?<< पडला तर उत्तमच
नी, तु दोन मोठे प्लॅस्टिक
नी, तु दोन मोठे प्लॅस्टिक बॉक्स (कंटेनर्स) आणुन, एका बॉक्सात गोडाची पाकिट आणि दुसर्यात नमकिन पाकिट अस ठेऊ शकतेस. वेगवेगळ्या डब्ब्यांची जागा वाचु शकेल.
अगं तसंच करते. तेच तर लिहिलंय
अगं तसंच करते. तेच तर लिहिलंय ना.
पण दोन मोठ्ठे डबे असतील तर सगळा ड्रॉवर भरून जातो. मग बाकीच्या काही वस्तू अनाथ होतात.
तुला एखादी पँट्री ट्रॉली नाही
तुला एखादी पँट्री ट्रॉली नाही का घेता येणार किंवा एखादा ४-५ ड्रॉवर्सवाली सेपरेट व्हील्स असलेली ट्रॉली? जे सामान रोज लागत नाही किंवा साठवणीच सामान, खाऊचे न उघडलेले पुडे ते यात भरुन दुसर्या रुम मधे ठेवायच. लागेल तेव्हा ट्रॉली किचनमधी आणायची.
किंवा, तु मोठे स्टॅकेबल ट्रे मिळतात तसे आणु शकतेस आणि त्यात सामान ठेवायच. ट्रेज एकावर एक रचायचे.
सॉरी पण वर मांडल्या गेलेल्या
सॉरी पण
वर मांडल्या गेलेल्या बर्याच गोष्टींना अनुमोदन, तरीही दुसरी बाजूही पहाणे महत्त्वाचे वाटते. मला वाटतं A word of caution is necessary.
- स्वच्छता functional असावी. unhygenic vs rabid & military attitude to 'everything in its place and a place for everything' ही दोन टोकं झाली.
- दुसरे म्हणजे त्यांचे ते राहतायेत ना आनंदी? मग काही करा. सतत आदळआपट, धूसफूस, घरादारांच्या मागे कटकट आणि मग आपल्या perfection नुसार स्वच्छता होत नाही याची कटकट यात त्या स्वच्छतेचा जो काय शुभंकर आनंद असेल तो गमावून बसतो माणुस. (खरेतर- बायका). आणि भारताततरी स्वच्छ हे रिलेटीव्ह आहे. धूळ/माती/ कबुतरे आणि इतर कारणांमुळे. स्वच्छता is not an end in itself. की ती असते?
- आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत तर आपल्या देशात बोलायलाच नको.
- माणसाने जसे स्वतःच्या देवावरून इतरांस कमी लेखू नये तसेच स्वच्छतेवरून. शेवटी 'पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसा मनालाही लागू नये म्हणून जप हो श्याम' (कॉपीराईट : श्यामची आई) हेही (तितकेच) खरे आहे.
भरपूर पसार्यातले अगत्य किंवा इतर काही चांगलेही जर मला दिसणारच नसेल तर वाईट वाटेल मला स्वतःचे.
"if you sprinkle, when you
"if you sprinkle, when you tinkle, be a sweetie and wipe the seatie" असं लिहीलय
>>>> लाजो, हे वाक्य माझ्या गायनॅकच्या क्लीनिकमध्ये आहे. आणि मला खुपच आवडते.
Pages