सार्या जातींना खड्यात जावूद्या
सार्या जातींना खड्ड्यात जावूद्या
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||धृ||
नका कुणी हो जातपात मानू
नव्या कल्पना अंमलात आणू
जुने विचार मसणात जावूद्या
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||१||
ह्या जातींनी काय नाय केलं
माणसामाणसात भांडण लावून दिलं
सख्खेशेजारी वैरी होती
एकमेकांचे गळे कापती
मी उच्च तू निच ते म्हणती
असलं वाईट वागणं तुम्ही थांबवा
या जातींना खड्यात जावूद्या ||२||
ब्राम्हण, मराठा, शिंपी, सोनार
तेली तांबोळी कुणगर, महार
कोळी कोष्टी कोकणा भामटा
भिल्ल रामोशी मातंग बेमटा
किती जाती तुम्ही निर्माण केल्या
माणसामाणसात भिंती उभ्या झाल्या
आतातरी जातपात माननं टाकूनद्या ||३||
किती किती ह्या हो जाती
देशाच्या प्रगतीला खीळ घालती
देशात माणूसकीची जात तुम्ही राहूद्या
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||४||
ज्ञानदेवानं जात कधी मानली काहो?
नाय हो
साईबाबानं जात कधी मानली काहो?
नाय हो
राजाशिवाजीनं जात कधी मानली काहो?
नाय हो
शाहूराजानं जात कधी मानली काहो?
गांधीबाबानं जात कधी मानली काहो?
साने गुरूजींनी जात कधी मानली काहो?
सावरकरांनी जात कधी मानली काहो?
आंबेडकरांनी जात कधी मानली काहो?
नाय हो, नाय हो, नाय हो
मग तुम्ही आम्ही जातीवरून का हो भांडता?
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||५||
उच्चनिच करून काय मिळते?
दुसरा अन्न खातो तेच सार्यांना मिळते
या जातीमुळे माणसे हैवान झाली
इतर जातीला पाण्यात पाहू लागली
पुर्वजांनी केले ते काळाच्या पडद्याआड जावूद्या
आपल्या देशाची प्रगती होवूद्या ||६||
- पाषाणभेद (दगडफोड्या)
२२/०२/२०११
खरच सांगतो तितकी जमलेली
खरच सांगतो तितकी जमलेली नाही
ध्रुवपद पून्हा जुळत नाही ना.
छान आहे पाभे. ठेक्यात म्हणता
छान आहे पाभे. ठेक्यात म्हणता येणारं गाणं आहे हे तर.
वा पाषाणभेद... छान विचार आहे.
वा पाषाणभेद... छान विचार आहे. डॉक म्हणतात तसं पुन्हा एकदा ठेक्यात म्हणता येईल, असं गाणं लिहिलंय... जनजागृतीची मोहिम छान राबवताय...
ते ५ व्या कडव्यात तुम्हाला 'ज्ञानदेव' म्हणायचे आहे का? 'झानदेव' दिसतेय तिथे... तसे असल्यास संपादित केले तर बरे!
मुकुजी, ३ रे धृवपद ना? कदाचीत
मुकुजी, ३ रे धृवपद ना? कदाचीत तो टायपो असू शकतो. अन्यथा दुरूस्त करण्यासाठी कृपया मला मार्गदर्शन करा.
सानीजी, दुरूस्ती केली आहे.
काही सुचना करायच्या असतील तर बिनधास्त करा. मला काव्यातल्या चुका काढलेल्या आवडतील.
(अन नविन हिंदी गीत येथे वाचा: "मै तो हुं शम्मो शहाबादी"
http://pashanbhed.blogspot.com/2011/02/blog-post_22.html
)
झानदेवानं जात कधी मानली
झानदेवानं जात कधी मानली काहो?
नाय हो
साईबाबानं जात कधी मानली काहो?
नाय हो
राजाशिवाजीनं जात कधी मानली काहो?
नाय हो
शाहूराजानं जात कधी मानली काहो?
गांधीबाबानं जात कधी मानली काहो?
साने गुरूजींनी जात कधी मानली काहो?
सावरकरांनी जात कधी मानली काहो?
आंबेडकरांनी जात कधी मानली काहो?
यातील काही नावे कमी करुन पहा
झानदेवानं, साईबाबानं जात कधी मानली नाय
राजाशिवाजी, शाहूराजानं जात कधी मानली नाय
अश्या प्रकार ओळित बसवुन पहा
छान वाटेल.
सुचना चांगली आहे. ही कविता
सुचना चांगली आहे.
ही कविता ओपनसोर्स आहे. आपण योग्य तो बदल करावा.
रोहन, खुप छान आशय आहे
रोहन, खुप छान आशय आहे कवितेचा. शुद्धलेखनाच्या थोड्या चुका टाळशिल तर बर जसे -
शिर्षकात आणि इतरही
खड्यात - खड्ड्यात
भांडन - भांडण
ब्राम्हण - ब्राह्मण (??)
पाभे !! नेहमी प्रमाणेच वेगळा
पाभे !!
नेहमी प्रमाणेच वेगळा विषय वेगळी शैली !! अभिनंदन !!!
शुभांगी कुलकर्णीजी, दुरूस्ती
शुभांगी कुलकर्णीजी, दुरूस्ती केली आहे.
तरीही
ब्राम्हण - ब्राह्मण (??) बरोबर का?
भन्नाटच. अप्रतिम
भन्नाटच. अप्रतिम विचार.
पुन्हा सामाजिक प्रश्न हाताळला गेला आहे.. अत्यंत सुन्दर पद्धतीनं.
कविते च्या गणिता ची काळजी नसावी. भाव महत्वाचे.