व्हिडिओ कॅमेरा बिघडला!

Submitted by चंपक on 20 February, 2011 - 06:40

माझा २ वर्षे जुना सोनी कॅमकॅडोर मध्ये आता बटन ऑन केले कि, "रिट्रायव्हिंग' असा संदेश येतो आणि काहीच होत नाही. शुट, फोटो काही करु शकत नाही. सतत रिट्रयव्हिंग चालु राहते....... उपाय काय करावा?

बॅटरी काढुन, पुन्हा टाकुन ट्राय केले. जमले नाही.

त्यातील डाटा सेफ असेल का? काढता येईल का? भारतात नेउन? बॅकप आहे, पण काही व्हिडीओ चे नाही केलेले. ते जरा कमी महत्वाचे होते. ...
धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्य मित्राचा भाऊ व्यावसाईक कॅमेरा दुरुस्त करतो.. पुण्यात निलायम टॉकीज जवळ दुकान आहे.. त्याच्याकडे प्रयत्न करू शकता.. भारतात यायला लागेल पण Happy

सोनी सर्विस सेंटर आहे का तिथे दाखवावे. ते नक्की सांगतील काय मॉडेल आहे नंबर सांग म्हणजे मी इथे विचारू शकेन. माझ्या इथून वॉकिन्ग डिस्टन्स आहे सो स सें

आनंद, पुण्यातल्या हँडीकॅम दुरुस्त करणार्या दुकानाचं नाव सांगू शकाल ? माझा कॅमेरा पण चार्ज होत नाहीये Sad

चंपक, भारतात जाऊनच काय ते बघ! ईथे सर्विस सेंटर ला लई म्हणजे लईच कापतात! (असा कॅननबरोबरचा स्वानुभव आहे)