गोष्ट आहे बरीच जुनी.त्यातली माणसं आता कुठे आहेत्,काय करतात ठावूक नाही. जेव्हा जवळ होती तेव्हा अन दूर गेली तेंव्हाही,फोन ही नव्हते,फेसबुक कशाला इंटरनेटही नसावंच कदाचित. पण सगळीजणं प्रत्येक धाग्यावर बरोबर असायची.शिव्याही नव्हत्या अन नव्हती वाहवाही...तरीही सगळे एकअमेकांच्या कंपूत असायचे!..पाट्लांच्या मुलीच्या याद्याला पाठकांच्या बापूना बोलावलं जायचं,कुलकर्ण्यांच्या आजोबांच्या बरोबरीनं मह्मद चाचा पान तंबाखूच्या चंच्या सोडायचे...लोकांना तेन्व्हा मंदीर बाबरी काही माहित नव्ह्तं,टी.व्ही.आल्यावर पुढे कळालं !!!
असो,नमनाला घडाभर झालं! तर एका गावात्,आम्ही रहात होतो.परवा तेज यांच्या ललित मध्ये वाचलं अगदी तसं वातावरण प्रत्येक घरात्.घरं सगळी बैठी,कौलारू..
अशाच एका घरात एक काका काकू आणी काकांची आई,दोन मुले असे कुटुंब रहायचे.. काका आणी माझे बाबा एकाच कार्यालयात काम करायचे.काकू शहरात वाढ्लेल्या,बहुतेक त्यांचं लव्ह मॅरेज असावं..म्हणजे तसं ऐकलेलं अंधुकसं आठवतय..
काकाना वाचनाचा खूप छंद्.कविता करायचे,कधी कधी व्रुत्तपत्रातून लिखाण छापून यायचे..खूप हुषार होते,आम्हाला दहाव्वी बारावीला गणित शिकवायचे(तेहि फुकट!)खुप फिरलेहि होते,बरिच ठिकाणं रस्त्याच्या नावापरयंत पाठ होती...
"ते पितात" कधितरि घरातल्या आज्ज्या/आया/काकवानी एकमेकीना कुजबुजत सांगितलेलं ऐकलेले.तेन्व्हा लगेच, "शी ते दारुडे आहेत्?" असं मी म्हंटल्यावर डोक्यावर टप्पल पडलेली..चूप म्हणून!
बरं ते जाउदे,आणखी एक घडा भरला,बघता बघता..
ह तर त्या काका काकूंबरोबर आणी त्यांच्या दोन जुळ्या बाळांबरोबर्,आणी आज्जी असे सगळे मिळून गाणगापुरला सहलीला गेलो होतो...जाताना बरोबर सगळ्यानी दशम्या बरोबर घेतलेल्या,आईने घट्ट पिठले,तुप साखर पोळी, दाण्याची चटणी वगैरेचा डबा काढला,काकूनीही असेच काही आणलेले...
काकांच्या,बाबांच्या गप्पा रंगल्या होत्या,काकू,आज्जी,आई सर्वाना हवे नको बघत होत्या.एव्ह्ढ्यात काकूंनी विचारले,"कुणी ताक पिणार का?" काकुंनी इंडीयन रमच्या बाटलीतून ताक आणलेले.बाटलीवरचे लेबल वाचून दुसर्याच क्षणी बालवर्गातून प्रश्ण आला,"इंडीयन रम म्हण्जे काय गं आई?""कपाळ्"आई पुट्पुटली.काकू हसत होत्या.{एकदा शाळेत कुणीतरी "केसांची झुलपे वाढ्वून देवानंद होण्यापेक्शा ,अभ्यास करून विवेकानंद व्हा असा सुविचार लिहिला होता,तेन्व्हा घरी येऊन आईला ,हा देवानंद कोण असे विचारले होते.:)}!! तेन्व्हाही ती 'कपाळ" म्हणाली होति का? आठवत नाही...
तर थोड्याच वेळात माझ्या हुषार भावाने मला,कानात्"दारू दारू" असे खुस्फुसत सांगितले.आम्ही लगेच त्या ताकाकडे संशयाने बघितले.ते पांढरे शुभ्र ताकच होते,सिनेमात दिसते तसे सोनेरि बिनेरी नव्हते.
पण एकूणच्,'खोकला झालाय' या कारणाने,सगळ्यांनीच ताक प्यायला नकार दिला!!
काकू मात्र हसत होत्या.त्यानी आरामात ताक पिले,जेवणं आटोपून पुन्हा पत्ते,बित्ते सुरु झाले..काकांच्या कवितांना सगळेजण दाद देत होते,काकू मंद हसत्"हो,माहितिय" च्या मोड्मध्ये होत्या.
ट्रीप छान झाली,थोड्या दिवसानंतर त्या लोकांची बदली झाली.मधून मधून काकांची सुंदर अक्शरात पत्रे येत्,मुला बाळांची,कुटुंबाची खुषाली इत्यादी इत्यादी. अशीच सहा सात वर्षात तुरळक पत्रामधून काका बर्याचदा काहि तरि अध्यात्मिक लिहित्..आमच्या डोक्यात काही शिरत नसे म्हणजे ते अध्यात्मिक लिहितात
असे म्हंटल्यावर मात्र पटकन संदर्भ लागे,नाही असे नाही पण बाबा हसून्,"इंडीयन रमच्या बाटलीतले ताक" असे म्हणत आणी आईला हसू येई्. हसता हसता आज्जी कवळी सांभाळे.
हळु हळु काकांचा कफ्फलक कि काय म्हणतात तो पणा वाढू लागलेला.नोकरी गेली/सोडली/नवी मिळाली..संदिग्ध माहिती...
एक दिवस काका घर सोडून निघून गेले...!! धक्का!आई बाबा दचकले..काकूना भेटायला गेले...काकू रडत होत्या..दोन इवलिशि पिले कुशीत घेऊन्..आधार कुणाचा,म्हातार्या सासूचा..!खूप शोध घेतला वेड्यासार्खा...काका सापडले नाहीत्.परत येणार नाहीत असं चिठ्ठीत लिहिलेलं!!
मधली किति वर्शं गेली,कधी भेट झाली की काकांचा विषय हमखास निघत असे..हळू हळू डोळ्यातले पाणी आटले..राग दुखःही...सगळं विसरून काकू नोकरीला लागल्या...मुलं पुढे व्यावसायिक शिक्षण वगैरेच्या निमित्ताने होस्टेलला राहू लागली.सासूबाई गेल्या.काकू एकट्याच..पण खूप आश्वस्त आता!
एक दिवस एका लग्नात अचानक भेटल्या.शेजारी जेवायला बसताना,ताकावरून इंडीयन रमच्या बाटलीतले ताक आठवले!
"आले होते परवा परत"! मी आणि आई चकित्!"मग?"
त्याला म्हंटलं,"कशाला आलात?" झालं आता सगळं! आता मुलं,कोलेजात जातात्,बापाचं नाव काढून रडत नाहीत्.तुझा काय उपयोग?"
आम्ही दोघी निशब्द!
"हिमालयात गेला होता म्हणे स्वतःच्याच शोधात्.रडला ती मनशांती नाही मिळाली त्याला तिथे!
आता म्हणे,परत आलोय."
मी त्याला खुंटीवर टांगलेलं मंगळसूत्र दाखवलं...
मला त्याचं वाईट वाटलं ,मी त्याला थोडे पैसे दिले, सांगितलं,"जा बाबा इथनं.."
ऐकून डोकं बधीरच् ! हे रमच्या बाटलीतलं ताक काकांनी कसं रिचवलं असेल्?काकूंसारखं आरामात की पुन्हा हिमालयात?!!
माहित नाही..माहीत नाही...जास्त विचार करण्याइतपत आपल्याला डोके नाही.
छान लिहिलयं. आवडले.
छान लिहिलयं. आवडले.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
काय काय या दुनियेत घडत असतं -
काय काय या दुनियेत घडत असतं - अगदी कल्पनेपलिकडलं........
चांगलं मांडलंत तुम्ही.
छान आहे कथा. लेखन शैली आवडली
छान आहे कथा. लेखन शैली आवडली
धन्यवाद सर्वांचे.
धन्यवाद सर्वांचे.
आवडलं.
आवडलं.
छान उतरलीये. कथेतल्या वळणाने
छान उतरलीये. कथेतल्या वळणाने किंचित झटका बसला.
<<रडला,भेकला,चार शिव्या पण दिल्या,मळमळ होती सगळी.हिमालयात पण न गोठलेली>>
इथे कुठेतरी ठिणगी पडल्यासारखं वाटलं...
नोरा, इथे लिहिताना अजून किंचित अधिक काळजी घेणार का? वाचताना त्रास वगैरे होण्याइतकं फॉर्मॅटिंग विस्कळीत नाही. पण मला स्वतःला एका चांगल्या लिखाणाला इतकंही "तीट" नको वाटतं.
उदा.
वाक्यं संपल्यावर दुसरं सुरू होण्यामधे जागा,
तसच, पुढीलसारखे शब्दं...
एक्मेकांच्या
नावापरयंत
तेन्व्हा मंदीर बाबरि क्काआआआआआही
होण्यापेक्शा
आणी
नोरा, माझा आग्रह नाही, विनंती आहे. हीच कथा पुन्हा संपादित होऊ शकते.
छान लिहिता आहात. वाचायला आवडतं हे नक्की.
मस्त.
मस्त.
मस्त.
मस्त.
कथा आवडली..
कथा आवडली..
आवडली. हल्लीच्या लोकांना दशमी
आवडली. हल्लीच्या लोकांना दशमी काय असते कळणार नाही क्वचित.
आवडलं. शीर्षक अगदी चपखल आहे
आवडलं. शीर्षक अगदी चपखल आहे
लै लै भारी...
लै लै भारी...
दाद : अगदी बरोबर, टायपोज गं.
दाद : अगदी बरोबर, टायपोज गं.
ललिता -प्रीति: धन्यवाद.
ललिता -प्रीति: धन्यवाद.
छान आहे लिहिण्याची शैली.
छान आहे लिहिण्याची शैली. आवडले
ह्हः धन्यवाद् गं.
ह्हः धन्यवाद् गं.
छान लिहीलय!
छान लिहीलय!
आवडली
आवडली
".काकांच्या कवितांना सगळेजण
".काकांच्या कवितांना सगळेजण दाद देत होते,काकू मंद हसत्"हो,माहितिय" च्या मोड्मध्ये होत्या."
सुंदर ऑब्झर्वेशन
धन्यवाद
धन्यवाद
खुप सुंदर
खुप सुंदर
Good story
Good story
वा! मस्तय. वर आणणार्यास
वा! मस्तय.
वर आणणार्यास धन्यवाद.
विनोदी असेल म्हणुन वाचले आणी
विनोदी असेल म्हणुन वाचले आणी वाईट वाटले संपल्यावर.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
असे बर्याच लोकांबद्दल वाचलेले
असे बर्याच लोकांबद्दल वाचलेले आहे. असे अतिहुषार (चांगल्या अर्थाने) , उच्च विद्यविभुषित, लेख-कविता करणारे, विचार करणारे लोक असे काही वागतात कि त्याचा थांगपत्ता सामान्य माणसाला सहज लागू शकत नाही. माझ्या माहितीतले एक गॄहस्थ असेच एका महाविद्यालयाचे मुख्याध्यापक. वाचन भरपूर. लेखनही खूप छान करत. अन निवॄत्त व्हायच्या अगोदरच म्हणजे वयच्या वयाच्या ५५-५८ व्या वर्षी त्यांची भ्रमिष्टासारखी अवस्था झाली. त्यांना शेवटचे २-३ वर्षे राहिले असताना नोकरी सोडून द्यावी लागली. सुदैवाने त्यांची मुले तोपर्यंत नोकरीला लागली होती. त्यामुळे त्यांनी संभाळले. पण, जेवढे आपण वाचत जाऊ तेवढे आपल्याला कळत जाते की जगात कितीतरी शिकण्यासारखे करण्यासारखे आहे. त्यातच त्यांना एकदा स्वतःचा शोध घ्यावासा वाटला. विठ्ठलपंतांसारखे ते पत्नीची परवानगी न घेता निघून गेले आणि नंतर ते परत आले. याचा अर्थ असा नाही कि की त्यांनी जे काही केले ते चुकीचे आहे. जे घडले ते घडले. चूक बरोबर हे सर्व सापेक्ष म्हणावे.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
छान लिहिलंय !
छान लिहिलंय !
Pages