Submitted by साती on 8 February, 2011 - 01:27
हात नियतीचा धरूनी जायचे भटकायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ||
दर सुखाला दु:ख भागे काय मग बाकी उरे
रीत कुठली वापरू मी गणित हे उकलायला ||
बहुरूप्याचे खेळ नशिबा रोजचे चालायचे
आज कुठले सोंग घेशी तू मला भुलवायला ||
माझिया हक्कास जे जे ते मला बिनशर्त दे
मंदिरी मी यायचे ना तोंड वेंगाडायला ||
रे तुझ्या डफलीसवे मी डोलते उंचावरी
जाणते पडले तरी तू सज्ज सांभाळायला ||
गूढ भाषा ही तयाची, ना कुठे विद्यालये
लागली 'साती' प्रयत्ने अक्षरे गिरवायला ||
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
बहुरूप्याचे खेळ नशिबा रोजचे
बहुरूप्याचे खेळ नशिबा रोजचे चालायचे
आज कुठले सोंग घेशी तू मला भुलवायला ||>>>
सुंदर!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान गझल
माझिया हक्कास जे जे ते मला
माझिया हक्कास जे जे ते मला बिनशर्त दे
मंदिरी मी यायचे ना तोंड वेंगाडायला >>>
छान!
(अवांतर - काही जाणकारांच्या मते मज, तुज, माझिया, तुझिया, घेशी, देशी असे शब्द शक्यतो टाळावेत. मला त्यांचे मत पटते व त्या दृष्टीने मी प्रयत्नही करतो )
धन्यवाद!
काही जाणकारांच्या मते मज,
काही जाणकारांच्या मते मज, तुज, माझिया, तुझिया, घेशी, देशी असे शब्द शक्यतो टाळावेत. मला त्यांचे मत पटते व त्या दृष्टीने मी प्रयत्नही करतो
खरं आहे.
'माझिया प्रियाला प्रीत कळे ना' असल्याने हे शब्द ओढून ताणून आल्यासारखे न वाटता कॉमन वाटतात.
मी तसा प्रयत्न करत नाही कारण हे केवळ गझलेतच नाही तर कविता,भजने आणि प्रार्थनेत सुद्धा वारंवार येणारे शब्द आहेत.हल्ली तर सिरीयलच्या टायटलसाँगमध्ये पण
तरिही रोजच्या वापरातल्या भाषेतले शब्द वापरून केलेली गझल,कविता मला जास्त आवडते हे सांगणे न लगे.
(म्हणूनच अगदी अकृत्रिम लिहिणार्या बेफिकीर,शरद,कणखर गंगाधर आणि क्रांती यांच्या काव्याची मी चाहती आहे.) ,
आवडली गझल.
आवडली गझल.
साती, अकृत्रिम वरून एक गझल
साती,
अकृत्रिम वरून एक गझल आठवली ती देत आहे(अवांतर वाटल्यास क्षमस्व!!)
न सोचा न समझा न सीखा न जाना
मुझे आ गया खुद_ब_खुद दिल लगाना
ज़रा देख कर अपना जलवा दिखाना
सिमट कर यहीं आ न जाये ज़माना
ज़ुबां पर लगी हैं वफ़ाओं की मुहरें
खमोशी मेरी कह रही है फ़साना
गुलों तक लगाई तो आसां है लेकिन
है दुश्वार कांटों से दामन बचाना
करो लाख तुम मातम-ए-नौजवानी
पा ’मीर’ अब नहीं आयेगा वो ज़माना
ह्यातल्या एकाही शब्दाचा अर्थ उलगडून सांगावा लागत नाही....हे खरे अकृत्रिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद!!!
व्वा.. सुरेख..
व्वा.. सुरेख..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दर सुखाला दु:ख भागे काय मग
दर सुखाला दु:ख भागे काय मग बाकी उरे
रीत कुठली वापरू मी गणित हे उकलायला ||
वा!
प्रतिसाद देणार्या सगळ्यांना
प्रतिसाद देणार्या सगळ्यांना धन्यवाद!
शेवटची द्वीपदी खूप आवडली.
शेवटची द्वीपदी खूप आवडली.
सुंदर्.आवडली.
सुंदर्.आवडली.
दर सुखाला दु:ख भागे काय मग
दर सुखाला दु:ख भागे काय मग बाकी उरे
रीत कुठली वापरू मी गणित हे उकलायला ||
चपखल. सुरेख शेर!!!
माझिया हक्कास जे जे ते मला
माझिया हक्कास जे जे ते मला बिनशर्त दे
मंदिरी मी यायचे ना तोंड वेंगाडायला ||
रे तुझ्या डफलीसवे मी डोलते उंचावरी
जाणते पडले तरी तू सज्ज सांभाळायला ||
आहाहा!! हे वरचे शेर एकदम आर्-पार आहेत. फर्मास!!
बहुरूप्याचे खेळ नशिबा रोजचे
बहुरूप्याचे खेळ नशिबा रोजचे चालायचे
आज कुठले सोंग घेशी तू मला भुलवायला ||
माझिया हक्कास जे जे ते मला बिनशर्त दे
मंदिरी मी यायचे ना तोंड वेंगाडायला ||
आवडले![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रामकुमार.
मस्त! गझल आवडली!
मस्त! गझल आवडली!
प्रतिसाद देणार्या सगळ्यांना
प्रतिसाद देणार्या सगळ्यांना धन्यवाद!
>> माझिया हक्कास जे जे ते मला
>> माझिया हक्कास जे जे ते मला बिनशर्त दे
>> मंदिरी मी यायचे ना तोंड वेंगाडायला ||
मस्त!
"काय माझ्या वाटणीचे ते मला बिनशर्त दे
मंदिरी येणार नाही तोंड वेंगाडायला"
असं काहीतरी केल्यास थोडं अधिक सुटसुटीत होईल का?
(प्रत्येक शेराच्या शेवटी 'दंड' का दिले आहेत?
)
अभिनन्दन स्वाती, तू अधिक खोल
अभिनन्दन स्वाती,
तू अधिक खोल विचार केलास इतर प्रतिसादकांपेक्षा !
तुझ्या मताशी सहमत !
रामकुमार.
स्वाती धन्यवाद!
स्वाती धन्यवाद!