Submitted by साती on 7 February, 2011 - 02:01
एक वस्तू मॉलभर या लागते शोधायला
थांबणे सोसेल तोवर लागते चालायला ||
हॉलभरुनी लोळणारे ड्रेस आणिक पुस्तके
पाहुणे येता कपाटी लागते कोंबायला ||
कोठल्या रोट्या रुमाली कोठल्या पोळ्या प्रिया
आण लोणी ब्रेड मी हे लागते भाजायला ||
आज राजा तू पहा थोडा टिव्ही वा झोप रे
मी फिरूनी मायबोली लागते वाचायला ||
दाढ दुखते आज माझी आज तू बोलून घे
एरवी तुज धाडसाने लागते बोलायला ||
एकदाची पाडुनी झाली गझल तरही पहा
वाहवा प्रतिसाद साती लागते वाचायला ||
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
दाढ दुखते आज माझी आज तू बोलून
दाढ दुखते आज माझी आज तू बोलून घे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
एरवी तुज धाडसाने लागते बोलायला || >>>
मस्तच ग![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाहवा साती..... भावना
वाहवा साती.....
भावना चांगल्या उतरल्या आहेत.... मस्तच आहे रचना.
(No subject)
मस्तच!
मस्तच!
दाढ दुखते आज माझी आज तू बोलून
दाढ दुखते आज माझी आज तू बोलून घे![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
एरवी तुज धाडसाने लागते बोलायला >>>> हा टोला लय भारी!!!
मस्तच!!
मस्तच!!
लै..लै भारी...
लै..लै भारी...
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
(No subject)
एकदाची पाडुनी झाली गझल तरही
एकदाची पाडुनी झाली गझल तरही पहा
वाहवा प्रतिसाद साती लागते वाचायला ||
>>>>>>>
वाह साती, याला म्हणतात काँफिडन्स.....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त जमलिये....... !!!
हॉलभरुनी लोळणारे ड्रेस आणिक
हॉलभरुनी लोळणारे ड्रेस आणिक पुस्तके
पाहुणे येता कपाटी लागते कोंबायला ||
म्हंजे घरोघरी .................!
दाढ दुखते आज माझी आज तू बोलून घे
एरवी तुज धाडसाने लागते बोलायला ||
भले शाब्बास!
दंतवैद्या, एवढे उपकार कर त्याच्यावरी,
तोंड राहो बंद, दे ती औषधे हिज प्यायला ||
एकदाची पाडुनी झाली गझल तरही पहा
वाहवा प्रतिसाद साती लागते वाचायला ||
हुश्श! थकली रे देवा!!!!!!!
(No subject)
झकास कविता आहे पण अजून शब्द्
झकास कविता आहे पण अजून शब्द् योग्य वापरता आले असते.
"दाढ दुखते आज माझी आज तू
"दाढ दुखते आज माझी आज तू बोलून घे
एरवी तुज धाडसाने लागते बोलायला |"
हाहाहाहा
हहपुवा
वा वा फार छान,खूप रिलेट
वा वा फार छान,खूप रिलेट होतेय्,विषेषतः,
हॉलभरुनी लोळणारे ड्रेस आणिक पुस्तके
पाहुणे येता कपाटी लागते कोंबायला ||
कोठल्या रोट्या रुमाली कोठल्या पोळ्या प्रिया
आण लोणी ब्रेड मी हे लागते भाजायला ||
आज राजा तू पहा थोडा टिव्ही वा झोप रे
मी फिरूनी मायबोली लागते वाचायला ||
हे तर अगदी अगदी!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
(No subject)
प्रतिसाद देणार्या सगळ्यांना
प्रतिसाद देणार्या सगळ्यांना धन्यवाद.
जबराट
जबराट![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)