आनंद ने सुचवल्याप्रमाणे, खड्या पारश्याच्या दिशेने चढलो नाही पण उतरलो यावेळेस.
खुपच अवघड रस्ता आहे. मधे एक १० फुटाचा पॅच तर experts बरोबर नसतील तर केवळ अशक्य.
इंग्रजांनी केलेली मोडतोड आणि भरीस भर म्हणुन दरड कोसळुन मागचा दरवाजा पुर्ण खचला आहे.
पण तरीही बांधकामाचे कोउशल्या आणि भव्यता जाणवतेच.
खडा पारशी अगदी base ला जाउन बघीतला. [हा वाट चुकल्याचा झालेला फायदा]. केवळ अप्रतिम.
या वाटेने खाली उतरले तर आपण नाणेघाटात येउन पोहोचतो. फ़क्त मधे चार एक किलोमिटर चे पठार पालथे घालावे लागते
या वाटेने पण खेकडे बरेच भेटले. एका आडव्या मोठ्या खडकावर तर छोटी छोटी शे - दीडशे पिल्ले चिकटुन बसली होती. बदामी कलरची ती पिल्ले अगदी बकुळीच्या ताज्या फुलांसारखी दिसत होती.
खचलेला दरवाजा
कपारीतुन जाणारी वाट
निसरडी खाली खोल उतरणारी वाट
धान्याचे कोठार. ही एक खोली दिसते आहे अशा आत अजुन तीन आहेत, ज्या पुर्ण कातळात खोदलेल्या आहेत, त्यात अजुनही जाळलेल्या धान्याची राख सापडते
खडा पारशी
बुरुजाच्या कडेने खाली उतरणारी हिच ती वाट
खडा
खडा पारशीला वानरलिंगी असेही म्हणतात.. वॅली क्रॉसिंगसाठी हा उत्तम सुळका आहे.. खडा पारशी वर चढाई करुन मग इकडे जीवधनवर वरती दोर ओढुन घ्यायचा.. मोठे मोठे दगड बरेच आहेत ह्या बाजुला जीवधनवर.. त्यांना आरामात बांधता येतो रोप.. साधारण २००-२५० फूट असेल अंतर.. लक्षात नाही नक्की किती ते..
खाली नाणेघाटाच्या गुहेत राहिला की नाही? आणि खडा पारश्याच्या पोटातच एक गुहा आहे.. मस्त आहे ती पण राहायला...
तन्या,
तन्या, पहिल्यांदा जिवधन केला तेंव्हा राहीलो होतो नाणेघाटात. या वेळेस फक्त जेवण गुहेत केले.
>> खडा पारश्याच्या पोटातच एक गुहा आहे.. मस्त आहे ती पण राहायला... >>
मी पुढे जाउ लागले तर, तिथे बिबट्या बसला आहे आणि तो तुला 'भो' करणार आहे असे सांगुन मला मागे वळण्यास भाग पाडले आमच्या कही सहकार्यांनी.
क्या बात
क्या बात है.
नाने घाटात कुठला तरी फलक सापडल्याची बातमी अशातच वाचली होती. तो कुठला फलक आहे ते माहीती आहे का?
खेकड्यांच
खेकड्यांची पिल्ले पहिले काहि दिवस केवळ सुर्यप्रकाशावर जगतात, असा उल्लेख मारुति चितमपल्लीनी केला आहे.
खेकड्यांची एक वेगळी जात असते, त्यांना सॉफ्ट शेल म्हणतात, ते न सोलता खाता येतात (म्हणे).
नाणेघाटातल्या दगडी रांजणाचा उल्लेख नाही झाला.
बाकि त्या आधीच्या सहलीत मी पण धावती भेट दिली होती बरं का !
हे लेखन कसे अपलोड करायचे. असे
हे लेखन कसे अपलोड करायचे. असे लेखन करन्याचि मेथड सांगावी.
मी पुढे जाउ लागले तर, तिथे
मी पुढे जाउ लागले तर, तिथे बिबट्या बसला आहे आणि तो तुला 'भो' करणार आहे असे सांगुन मला मागे वळण्यास भाग पाडले आमच्या कही सहकार्यांनी
>>
असेच त्यानी त्या बिबट्यालाही भो केले होते. एक भयानक मुलगी येणार आहे म्हणून....
मस्त फोटोज अन वर्णन . रॉबीन
मस्त फोटोज अन वर्णन .
रॉबीन