बालगीत/बडबडगीत स्पर्धा
गेल्या वर्षीचा हा लोकप्रिय कार्यक्रम(स्पर्धा) यंदाही ठेवणार आहोत. मागच्या वर्षी भाग घेतलेल्या सगळ्या छोट्यांच्या बडबडगीतांनी मायबोलीकरांना भरभरुन आनंद दिला. यावर्षीही भरपूर सुंदर, गोड गाणी ऐकायला मिळोत. चला तर मग लागा तयारीला..
१. ही स्पर्धा एकाच वयोगटात घेण्यात येणार आहे: वय वर्षे ० ते ५
२. स्पर्धेसाठी प्रवेशिका marathibhasha@maayboli.com वर पाठवावी. सोबत पालकाने आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. पाल्याचे नाव व वय लिहावे तसेच पाल्याचे नाव जाहीर व्हायला नको असल्यास तसे नमूद करावे.
३. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयामधे Marathi Bhasha : Bolgani असे नमूद करावे.
४. स्पर्धेसाठी माध्यम: व्हिडीओ, ऑडिओ
५. स्पर्धकांनां एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवण्याची मुभा आहे
६. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख: २० फेब्रुवारी, २०११
अधिक माहितीसाठी संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क साधावा अथवा ह्याच पानावर आपला प्रश्न विचारावा.
मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.
धन्यवाद.
वा पोस्टर मस्तय! तयारीला
वा पोस्टर मस्तय!
तयारीला भरपूर वेळ दिलाय ते उत्तम केले. (कारण आम्हाला आजकाल शाळेमुळे इन्ग्रजी गाणीच जास्त येतात!)
पोस्टर अप्रतिम
पोस्टर अप्रतिम
कस्सलं गोड पोस्टर आहे!
कस्सलं गोड पोस्टर आहे! छोट्यांची मज्जाय!
सह्ही!! मस्त स्पर्धा आणि मस्त
सह्ही!! मस्त स्पर्धा आणि मस्त पोस्टर
गाणे बालगीतच हवे का कोणतेही
गाणे बालगीतच हवे का कोणतेही चालेल? (मराठी नक्की)
बघुया बाकी पोस्टर छानच आहे
बघुया
बाकी पोस्टर छानच आहे
अरे वा. गोड गाणी आणि क्यूट
अरे वा. गोड गाणी आणि क्यूट व्हिडीयो यंदाही तर! मस्त!
मस्त! पोस्टर खूऽऽप गोड आहे!
मस्त! पोस्टर खूऽऽप गोड आहे!
गोडु गोडु पोस्टर. ह्या
गोडु गोडु पोस्टर. ह्या स्पर्धेत आमी (लेकासाठी) नक्की भाग घेणार बाबा !!
monalip गाणे बालगीत/बडबडगीतच
monalip
गाणे बालगीत/बडबडगीतच हवे.
धन्यवाद.
मंत्र्/श्लोक चालतील का? ते
मंत्र्/श्लोक चालतील का? ते बडब्डगीत नाहीये हे नक्की माहितीय. पण विचारून घेतीय..
बस्के, फक्त बोलगाणी, बडबडगीते
बस्के, फक्त बोलगाणी, बडबडगीते चालतील मंत्र/ श्लोक नको.
धन्यवाद.
खूप ग्गोड पोस्टर, मज्जाय !
खूप ग्गोड पोस्टर, मज्जाय !
वा वा! तर आता गोड गोड क्यूट
वा वा! तर आता गोड गोड क्यूट छोट्यांची गाणी एकायला व पहायला मिळणार तर.
पोस्टर मस्तच!
छान स्पर्धा. प्रवेशिका
छान स्पर्धा. प्रवेशिका पाठवायचा प्रयत्न करणार. शाळेत जायला सुरवात व्हायच्या आधी आमचं पिल्लु बरीच मराठी बडबडगीतं म्हणायचा. पण आता मात्र शाळेतल्याच पोएम्स म्हणायच्या असतात.
प्रवेशिका म्हणजे
प्रवेशिका म्हणजे marathibhasha@maayboli.com वर मुलाचे नाव व वय पाठवले आहे. आणखी काही माहिती द्यावी लागेल का?
मेधा, तुम्ही फक्त नाव आणि वय
मेधा,
तुम्ही फक्त नाव आणि वय कळवले आहे. तुम्हाला व्हिडीयो किंवा ऑडियो घरी रेकॉर्ड करुन ती रेकॉर्डेड क्लिप आम्हाला पाठवायची आहे.
प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयात कृपया Marathi Bhasha : Bolgani हे लिहायला विसरु नका.
तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा.
धन्यवाद.
आमचं पिल्लू २० महिन्यांचं
आमचं पिल्लू २० महिन्यांचं आहे. गाणी म्हणता येतात पण "आमची बाळी छान गाणं म्हणते" म्हणून ऊठावणी केली की बरोब्बर अवसानघात होतो. प्रत्येक ओळीला धक्का मारावा लागतो. त्यामुळे केवळ आईबापाची हौस म्हणून असं धक्का मारके बडबडगीत चालेल का? वाटल्यास स्पर्धेत नका घेऊ.
प्रॅडी मला देखिल हाच प्रश्न
प्रॅडी मला देखिल हाच प्रश्न पडलाय.आमच्याकडे प्रत्येक ओळ म्हणण्यासाठी काहीतरी अमिश द्यावे लागते..मधेच दुसर्या विषयांवर गप्पा सुरु होतात...नाहीतर फक्त गाळलेल्या जागा भरा करायचे असते.
प्राडी, पूर्वा 'बोलगाणी' वर
प्राडी, पूर्वा
'बोलगाणी' वर तुमच्या छोट्यांच्या प्रवेशिका नक्की पाठवा
-धन्यवाद!
prady, purva अगदी अगदी,
prady, purva अगदी अगदी, माझेही तसेच आहे, माझा लेक remix म्हणतो, म्हणजे एकही गाणे पुर्ण म्हणत नाही, .... पण आता मी पण पाठवेन प्रवेशिका
दोन गाणी येतील का पाठवता?
दोन गाणी येतील का पाठवता?
तोषवी, दोन गाणी पाठविता
तोषवी, दोन गाणी पाठविता येतील.
वरच्या घोषणेतही आता तसं स्पष्टपणे लिहीलं आहे.
धन्यवाद.
कृपया सर्वांनी वरची सूचना
कृपया सर्वांनी वरची सूचना क्रमांक ३ लक्षात ठेवावी.
धन्यवाद.
संयोजक, आताच श्रीयाची
संयोजक, आताच श्रीयाची प्रवेशिका पाठवली आहे. मिळाली का ते कळवणार का?
आमच्या बाईंचा रेकॉर्डिंगसाठी
आमच्या बाईंचा रेकॉर्डिंगसाठी अजून मूड लागत नाहीये.
संयोजक, आत्ताच प्रवेशिका
संयोजक, आत्ताच प्रवेशिका पाठवली आहे.
जरा शंका आहे....मी हे रेकॉर्डिंग माझ्या नोकिया मोबाईल फोनवरून केलं आहे. पाठवलेल्या मेलमधली अटॅचमेंट मी उघडून पाहिली. मला नोकिया मल्टिमिडीया प्लेअरमधून ऐकू येतंय व्यवस्थित.
पण मायबोलीवर उघडताना वेगळा फॉर्मॅट लागेल का ???
( प्रस्तुत विषयातील माझं ज्ञान अगाध आहे त्यामुळे कृपया मार्गदर्शन करा.)
संयोजक, आताच प्रवेशिका पाठवली
संयोजक, आताच प्रवेशिका पाठवली आहे. मिळाली का ते कळवणार का?
एक सूचना --
@६. साहित्य पाठवण्याची अंतिम तारीख: २० फेब्रुवारी, २०१०
तारिख २० फेब्रुवारी, २०११ अशी पाहिजे. बदलाल का .
रुणूझुणू, आपल्या प्रवेशिका
रुणूझुणू, आपल्या प्रवेशिका (३) मिळाल्या आहेत .. ह्या फाईल्स चालतील का ह्याबद्दल लवकरच आपल्याला कळवू ..
ही फक्त प्रवेशिका मिळाल्याची पोचपावती आहे तशी इमेलही पाठवली आहे) ..
***
जयु, घोषणेतली चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद .. सुधारणा केली आहे ..
आपली प्रवेशिका अजून मिळालेली नाही, मिळाली की पोचपावती देऊच ..
परत एकदा धन्यवाद ..
वावा सुंदर पोस्टर!! यंदा
वावा सुंदर पोस्टर!!
यंदा आर्या आणि आदिचे गाणे ऐकायला मिळणार तर
Pages