बिरबल आणि बादशहा, राजपुत्र ठकसेन, हिमगौरी... की विम्पी किड? चांदोबा, किशोर, चंपक आणि फँट्म, मॅन्ड्रेकचे कॉमिक्स.. छोट्यांना त्यांच्या आवडत्या पुस्तक/मासिकाबद्दल सांगण्याची संधी. पुस्तक कोणत्याही भाषेतलं असो, त्यांना ते का आवडतं याबद्दल त्यांनी मराठीत लिहायचं किंवा सांगायचं! कोणतं एकच नाही ठरवता येत? मग जेवढ्यांबद्दल लिहावं वाटेल तेवढ्यांवर लिहीता येईल. अगदी दहा ओळींपासून हज्जार ओळींपर्यंत..
ही स्पर्धा आहे हे लक्षात ठेवा!
१. स्पर्धेसाठी गट पुढीलप्रमाणे आहेत - इयत्ता पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी.
२. प्रवेशिका लिखीत (स्कॅन स्वरुपात), ऑडियो किंवा व्हिडियो स्वरुपात पाठवता येतील. निबंध मराठीत असावा.
३. प्रवेशिका marathibhasha@maayboli.com या पत्त्यावर पाठवावी. सोबत पालकाने आपला मायबोलीवरचा आयडी कळवावा. पाल्याचे नाव व गट लिहावा तसेच पाल्याचे नाव जाहीर व्हायला नको असल्यास तसे नमूद करावे.
४. प्रवेशिका पाठवताना ई-पत्राच्या विषयात कृपया Marathi Bhasha : Aavadate pustak असे नमूद करावे.
५. प्रवेशिका पाठवण्याची अंतिम तारीखः २० फेब्रुवारी, २०११
आता मोठेही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. वरच्या गटामध्ये न बसणारे सगळेजणही आपल्या प्रवेशिका पाठवु शकतील. मात्र मोठ्या गटासाठी ही स्पर्धा नसणार आहे.
संयोजक समितीशी marathibhasha@maayboli.com इथे संपर्क करावा किंवा ह्याच बातमीफलकावर आपला प्रश्न लिहावा.
मराठी भाषा दिवस २०११ च्या इतर कार्यक्रमांसाठी इथे बघा.
धन्यवाद
सर्व कार्यक्रम सुंदरच आहेत.
सर्व कार्यक्रम सुंदरच आहेत. मला वाटतं या निबंध स्पर्धेत मोठे मायबोलीकरही उत्साहाने भाग घेऊ शकतील. स्पर्धा नको हवं तर, नुसत्याच प्रवेशिका. खूप चांगलं वाचायला मिळेल याची खात्री आहे. बघा, विचार करुन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्तच संकल्पना आशूडीला
मस्तच संकल्पना![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आशूडीला अनुमोदन
हे हे हे हे ... शिर्षक
हे हे हे हे ... शिर्षक वाचताना एका ओळीत आल्यामुळे 'माझे आवडते संयोजक' वाचलं ... एकदमच दचकले की क्षणभर!
बाकी मस्त उपक्रम. शुभेच्छा!
मस्त!! पोस्टरही मस्त आहे.
मस्त!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पोस्टरही मस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हा, इथे कविता नाहिए. पण मोठे
हा, इथे कविता नाहिए. पण मोठे लोकांसाठि काय? फक्त वाचन किन्वा कविता?
मला पण लिहायचयं. मी कुठल्याच
मला पण लिहायचयं. मी कुठल्याच वयोगटात नाही बसतं![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
आशू डी ला अनुमोदन...
आशू डी ला अनुमोदन...:)
आशूला अनुमोदन. मोठ्यांनाही
आशूला अनुमोदन. मोठ्यांनाही वाव द्या![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अजून एक- पहिली ते तिसरीचा वयोगट. 'पुस्तक' वाचण्याइतकी, त्यावर बोलण्या/लिहिण्याइतकी ही मुलं मोठी असतात का? अनेकदा, आई-बाबा-आजी-आजोबांकडून गोष्टी 'ऐकल्या' जातात. स्वतःचं मत सुसंगत लिहू शकतात का ह्या वयोगटातली मुलं? जेन्युइन प्रश्न आहे माझा खरंच.
छान विषय. पहिली ते तिसरीचा
छान विषय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिली ते तिसरीचा वयोगट. 'पुस्तक' वाचण्याइतकी, त्यावर बोलण्या/लिहिण्याइतकी ही मुलं मोठी असतात का? अनेकदा, आई-बाबा-आजी-आजोबांकडून गोष्टी 'ऐकल्या' जातात. स्वतःचं मत सुसंगत लिहू शकतात का ह्या वयोगटातली मुलं? >>> अनुमोदन.
पूनम, त्या वयोगटातली मुलं
पूनम, त्या वयोगटातली मुलं पूर्ण पुस्तकावर नाही पण निदान गोष्टीवर तरी मत व्यक्त करू शकतील असं वाटतंय. आणि 'गोष्ट का आवडली?' ह्या प्रश्नाचं उत्तर सुसंगत नसेल पण प्रामाणिक आणि निरागस तरी नक्कीच असेल असं मला वाटतं![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण स्पर्धा आवडत्या
पण स्पर्धा आवडत्या 'पुस्तकावर' आहे ना?![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असो.
शाळांमध्ये पहिलीपासून रोज १५
शाळांमध्ये पहिलीपासून रोज १५ ते २० मिनिटे वाचन करावे हा गृहपाठ असतो. अगदी छोटेसे पुस्तक का असेना. त्यावर अनेकदा बोलायला/एखादा परिच्छेद लिहायलाही सांगतात. तेवढेच अपेक्षित आहे. म्हणूनच शब्दमर्यादा इ कोणतेही बंधन घातलेले नाही.
मोठ्यांच्या सहभागाबद्दल निर्णय घेऊन लवकरच कळवण्यात येईल.
धन्यवाद.
मस्तच. मज्जा येणार तर.
मस्तच. मज्जा येणार तर.
संयोजक, निबंध लिहीताना तो
संयोजक, निबंध लिहीताना तो मराठी भाषेत लिहीणं अपेक्षित आहे नं?
पन्ना, हो >>त्यांना ते का
पन्ना, हो
>>त्यांना ते का आवडतं याबद्दल त्यांनी मराठीत लिहायचं
असे वर परिच्छेदात आहे. ते आता स्पर्धा नियम/माहितीतही लिहिले आहे.
धन्यवाद.
धन्यवाद संयोजक.
धन्यवाद संयोजक.
मोठ्यांच्या सहभागाबद्दल
मोठ्यांच्या सहभागाबद्दल निर्णय घेऊन लवकरच कळवण्यात येईल.>> धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्या सगळ्यांच्या मागणीखातर
तुमच्या सगळ्यांच्या मागणीखातर संयोजक मंडळाने मोठ्यांच्या सहभागाविषयी निर्णय घेतला आहे.
मोठ्यांनाही या कार्यक्रमामध्ये सहभागी होता येईल. फक्त मोठ्या गटासाठी हि स्पर्धा नसणार आहे हे लक्षात घ्या.
वर तसा बदल केला आहे.
धन्यवाद.
थॅन्क्स संयोजक _ संयुक्ता एक
थॅन्क्स संयोजक _ संयुक्ता
एक प्रश्न > लिखीत (स्कॅन स्वरुपात) प्रवेशिका म्हणजे स्वहस्ताक्षरातच हव्यात का? टाईप केलेलं वर्ड मधून मेल केलेलं चालणार नाही का?
प्रवेशिका लिखीत (स्कॅन स्वरुपात) ऑडियो किंवा व्हिडियो स्वरुपात पाठवता येतील.>>> लिखित किंवा ऑडियो किंवा व्हिडीयो ना? जर तसं असेल तर http://www.maayboli.com/node/23044 वर तसा बदल अपेक्षित आहे
डुआय, मोठ्यांनी त्यांच्या
डुआय,
मोठ्यांनी त्यांच्या प्रवेशिका इमेल किंवा वर्ड मधे टाइप करुन पाठवल्या तरी चालतील.
टाइप केलेला मजकुर संयोजकांना कॉपी पेस्ट करता आला पाहिजे.
धन्यवाद
बरं. धन्यवाद
बरं. धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझी पुतणी दहावीत आहे. तिला
माझी पुतणी दहावीत आहे. तिला निबंध लिहायचा आहे. तर माझी पाल्य म्हणून ती साहित्य पाठवू शकते का?
संयोजक _ संयुक्ता, मेल
संयोजक _ संयुक्ता,
मेल केल्ये.
माझी पुतणी दहावीत आहे. तिला
माझी पुतणी दहावीत आहे. तिला निबंध लिहायचा आहे. तर माझी पाल्य म्हणून ती साहित्य पाठवू शकते का?
कृपया मार्गदर्शन करा.
मानुषी, इथे मायबोलीकरांच्या
मानुषी,
इथे मायबोलीकरांच्या किंवा त्यांच्या मुलांच्या प्रवेशिका स्विकारत असल्यामुळे कृपया तुमच्या पुतणीच्या पालकांना किंवा स्वतः पुतणीलाच मायबोलीवर सदस्यत्व घ्यायला सांगुन त्या आयडीने प्रवेशिका पाठवण्यास सांगा.
धन्यवाद.
ओके. धन्यवाद!
ओके. धन्यवाद!
नमस्कार संयोजक _
नमस्कार संयोजक _ संयुक्ता,
मेलचं उत्तर मिळेल का?
डुआय तुम्हाला मेल
डुआय
तुम्हाला मेल केल्ये
धन्यवाद!
मला नाही मिळत आत्ताच केल्ये
मला नाही मिळत
आत्ताच केल्ये का?
डुआय स्पॅम फोल्डरमधे गेली आहे
डुआय स्पॅम फोल्डरमधे गेली आहे का ते बघणार का?
Pages