Submitted by तुष्कीनागपुरी on 24 January, 2011 - 12:26
फार झाली फार झाली आसवे
पापण्यांना भार झाली आसवे
गाव हा ओसाड का झाला असा?
याच जागी ठार झाली आसवे
राख केले वेदनेला जाळुनी
पेटता अंगार झाली आसवे
भोग होते आर्जवी पाशातले
भोगता गर्भार झाली आसवे
दुःख त्यांचे पाहताना लाजली
गोठली, बेकार झाली आसवे
तुषार जोशी, नागपूर
१० नोव्हेंबर २०१०, २२:३०
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
सर्व ओळी स्वतंत्ररीत्या छान
सर्व ओळी स्वतंत्ररीत्या छान वाटल्या.
(मतला सोडून)
धन्यवाद!
-'बेफिकीर'!
बेफिकीर जी, तुम्ही प्रतिसाद
बेफिकीर जी,
तुम्ही प्रतिसाद दिलात म्हणून धन्यवाद. साध्या सुध्या रचनेला तुम्ही दिलेले प्रोत्साहन मला लक्षात राहिल. तुम्हाला जे शेर सपाट वाटत असतील ते सरळ सांगत चला, मला शिकायलाच मिळेल.
(विद्यार्थी)
तुषार
तुषारजी, मला जे वाटले ते
तुषारजी,
मला जे वाटले ते प्रामाणिकपणे म्हंटले. क्षमस्व, आपल्याला राग आला असल्यास!
मी विद्यार्थी नाही आहे का? मी माझा वरील प्रतिसाद आपल्याला नको असल्यास रद्द करून टाकेन.
अरे, वेगळा अर्थ घेऊ नका
अरे, वेगळा अर्थ घेऊ नका बेफिकीर. तुम्ही गझलांना प्रोत्साहन देता हे मला आवडते. तुमच्या अभिप्रायाचा राग तर आला नाहीच पण तुम्ही नि:संकोच पणे असेच लिहित जा अशी विनंती आहे. अगदी एखादा शेर सपाट वाटला तर कसे सांगू? किंवा याला काय वाटेल असे न समजता सांगत जा हीच विनंती.
(विद्यार्थी) असे मी लिहिलेय ते सवयीने, रागाने नाही काही. मी फारच हौशी कलाकार आहे हो. लेखन हा प्राथमिक उपक्रम नाही. चोखंदळ वाचकांच्या अभिप्रायांनीच शिकायला मिळते हा माझा विश्वास आहे.
(विनयपूर्वक)
तुषार
ओक्के दोस्त, तुमच्याबरोबर
ओक्के दोस्त, तुमच्याबरोबर त्या दिवशी झाली होती तशीच छान चर्चा होऊ शकेल नक्कीच!
तुम्ही पार लांबून आलेला होतात.
मतला फक्त आवडला पुलेशु
मतला फक्त आवडला
पुलेशु
तुषार राव..... तांत्रिक
तुषार राव..... तांत्रिक दृष्ट्या अत्यंत चोख गझल.... पण ''पहिल्या ओळीचा प्रभावी समारोप दुसर्या ओळीत व्हावा '' हे फक्त मतल्यात झाल्याचे दिसत आहे.
मात्र आपण फार चांगलं लिहू शकता हे सर्वार्थाने जाणवत आहे.
पुलेशु.
गाव हा ओसाड का झाला असा? याच
गाव हा ओसाड का झाला असा?
याच जागी ठार झाली आसवे
भोग होते आर्जवी पाशातले
भोगता गर्भार झाली आसवे
हे दोन फार आवडले...
भोग होते आर्जवी पाशातले भोगता
भोग होते आर्जवी पाशातले
भोगता गर्भार झाली आसवे>>>
हा विशेष आवडला..
पुलेशु...
छान. दुःख त्यांचे पाहताना
छान.
दुःख त्यांचे पाहताना लाजली
गोठली बेकार झाली आसवे
येथे गोठली नंतर स्वल्पविराम अपेक्षित आहे ना?
@अलकाजी, हो, तसा बदल केलाय,
@अलकाजी, हो, तसा बदल केलाय, धन्यवाद