मेडीकल कॉलेजच एक वर्ष off घेउन दोन मित्र latin america explore करण्यास निघालेत.अर्जेंटीनातुन त्याना चिली, पेरु आणी शेवटी अमेझॉन च्या तिरावरिल लेपर कॉलनीत जायचय.शेवटचा स्टॉप थोडासा medical experience गोळा करण्यासाठी, बाकी सगळ्या प्रवासाचा उद्देश thrill आणी fun हेच.साडेचार/पाच महिन्यांचा हा प्रवास यातिल एकाच आयुष्य पुर्ण बदलण्यास कारणिभुत ठरला.
२३ वर्षांचा अर्नेस्टो "फूसेर" गवेरा (गाएल गार्सिया बर्नाल) आणी तिस वर्षांचा आलबेर्टो "मियाल" ग्रॅनाडो (रोड्रिगो दे ला सेरना) दोघेही हि ट्रिप बर्याच दिवसांपासुन प्लॅन करतायत.लक्ष आहे ८००० कि.मी चा हा प्रवास मियालच्या norton 500 motorcycle वर संपवुन व्हॅनेझुएलात त्याच्या ३०व्या वाढदिवशी पोचायच.प्रवासाच्या सुरुवातिपासुनच फूसेर डायरी लिहितोय.पहिली नोंद अशी "this isn't a tail of heoric feats, it is about two lives running parallel for a while, with common aspiration and similar dreams".
फुसेरला आत्तपर्यंत पुस्तकात वाचलेला अमेरिका पाहायचाय तर मियालला पोरी.फुसेर चे आईवडील त्याच्या अस्थम्यामुळे थोडेसे चिंतेतच आहेत.प्रवासाच्या सुरुवातिपासुनच त्यांची "mighty one" दगा देतिये. ब्युनोस आइरिस मागे पडलय, हळुहळु आजुबाजुचा प्रदेश बदलतोय पहिला स्टॉप आहे मिरामार हे रिझॉर्ट, इथे चिचिना हि फुसेर ची श्रिमंत girlfriend आपल्या आइ वडिलांसोबत सुट्टी घालवतिये.चिचिनाचा निरोप घेउन जेंव्हा हे दोघे निघतात तेंव्हा मियालला तिने दिलेले $१५ दिसलेत.इकडे अँडीज पर्वतांच्या कडेने दोघांचा पुढचा प्रवास सुरु आहे.वाटेत दोघे कित्येकदा मोटरसायकल वरुन आपटलेत, तंबू बरेचदा उडुन गेलाय, पैसे संपत आलेत, फुसेर ला मध्येच अस्थम्याचा अटॅक येतोय, एकदा तर बदक मारुन भाजुन पण खाल्लय.इकडे मियालला ते $१५ दिसतायत, त्याल मस्त ट्रिट करायचिये पण फुसेर च म्हणण आहे की हे पैसे तिने बेदिंग सुट साठी दिलेत, जर ते मायामी पर्यंत पोचले तर.शेवटी चिलिमधे "mighty one"ने अखेरचा श्वास घेतला.मियाल अक्षरशः ढसाढसा रडतोय.हिचहायकींग करत पुढचा प्रवास सुरु आहे.फुसेरला लिहिलेल्या एका पत्रात चिचिनाने आपण आता त्याच्यासाठी वाट पाहु शकत नसल्याच कळवलय.आता बरेच बेघर, जमिनदाराने जमिनी बळकावउन हाकललेले, कम्युनिस्ट असल्यामुळे पोलिसांचा ससेमिरा मागे लागलेले लोक भेटतायत. हळुहळु दोघेही थोडेसे गंभीर होत चाल्लेत.आईला लिहिलेल्या एक पत्रात फुसेर म्हणतोय "as we left the chuquicamata we could feel the world changing, or was it us" एवढ्यात मियालचा ३० वा वाढदिवस आलाय पण ते इतके थकलेत की साजराच करु शकत नाहित.ठरलेल्या वेळेच्या जवळपास एक महिना मागे पडलेत ते.माचुपिचुचे अवशेष पाहताना फुसेर ला प्रश्न पड्लाय इतकी प्रगत संस्क्रुती असणार्या लोकांना कस काय हरवल गेल? मियाल म्हणतोय मी इथल्याच एका मुलीशी लग्न करतो मग आपण त्यांना एक करुन क्रांती घडवु त्यावर फुसेर च म्हणण आहे बंदुक आणी दारुगोळ्याशिवाय क्रांती कशी शक्य आहे.शेवटी दोघे अमेझॉन च्या लेपर कॉलनीत पोचतात.नदिच्या एका बाजूला कुष्ठरोग्यांची घर तर दुसर्या बजूला डॉक्टर्स अशी विभागणी फुसेरला फारशी रुचली नाहिये.दोघे हळुहळु इथे चांगलेच रमत जातत.कुष्ठरोग्यांबरोबर फुटबॉलच्या मॅचिस्, तिथेच जेवंण, त्यांच्या बरोबर घर बांधण यात फुसेर चांगलाच गुंतलाय.मियालला कॅराकस मधल्या हॉस्पिटल मधे कामच निमंत्रण आलय तो फुसेरला पण कॉलेज नंतर तिथेच ये म्हणतोय पण फुसेरला यावर खूपच विचार करावा लागणार आहे.मुक्कामच्या शेवटच्या दिवशी डॉक्टर्स नी फुसेरच्या २४व्या वाढदिवशी पार्टी ठेवलिये, रात्री मधेच तो सर्वांना सोडुन पलिकडे पोहत जातो आणी आपली शेवटची रात्र कुष्ठरोग्यांसमवेत घालवतो.सकाळी दोघेही सर्वांचा निरोप घेउन निघालेत, कॅराकसच्या विमानतळावर मियाल फुसेरला निरोप देतोय.पाच महिन्यांच्या या प्रवासात दोघेही खुप जवळ आलेत.फुसेर अर्जेंटीनाला परत चाललाय कॉलेजची शेवटची term संपवायला आणी इकडे मियाल होस्पिटलमधील नोकरी सुरु करणार आहे.दोघांनाही अगदी भरुन आलय निरोप देताना.यानंतर फुसेर आणी मियाल ला भेटण्यास आठ वर्षं लागली.१९६० मधे आलबेर्तो ग्रॅनाडोला क्युबात येउन रहायच आणी काम करायच निमंत्रण मिळाल.ते आल होत त्याचा जिवलग मित्र "फुसेर" आणी आता कमांडर "चे गवेरा" याकडुन.
The Motorcycle Diaries हा स्पॅनिश चित्रपट चे गवेराच्या त्या चार पाच महिन्यांच्या मोटरसायकल भटकंतितील डायर्यांवर आधारित आहे.आता जवळपास एक दंतकथा बनलेला चे त्या भटकंतित पुर्ण बदलला.संपुर्ण लॅटिन अमेरिकेला भांडवलशाहिच्या विळख्यातुन सोडवयच असेल तर सशस्त्र क्रांती हेच उत्तर आहे हे त्याच्या मनात याच वेळेस बसल.मेडिसिन् सोडुन तो राजकिय चळवळित पडला, फिडेल कॅस्ट्रो बरोबर बॅटिस्टाची राजवट उलथवुन यांनी क्युबात कम्युनिस्ट राजवट आणली.शेवटी बोलिव्हियात CIA ने याचा दारुण अंत घडवुन आणला.तल्लख बुद्धिमत्ता, अन्यायाची चीड, साहस, प्रामाणीकपणा आणी hardcore communism यासाठी चे ओळखला जातो.म्रुत्युनंतर ४० वर्षांनी सुद्धा त्याची लोकप्रियता वाढतच आहे.(आयुष्यभर भांडवलशाहिचा विरोध केलेला चे आता Alberto Korda ने काढलेल्या त्याच्या एका फोटोग्राफ मुळे capitalist brand बनलाय)
चित्रपटाची फोटोग्राफी अतिशय सुंदर आहे.संवाद विनोदी आणी नेरुदांच्या कवितांनी नटलेले.फुसेर च्या प्रामाणीकपणामुळे अनेक अवघड प्रसंग येतायत.एकाठीकाणी खाण/निवरा मागायला गेलेले असताना घरचा माणुस या दोघा डॉक्टरांना हे माझ्या मानेवर काय झालय पहा म्हणतोय, फुसेर त्याला तुला ट्युमर आहे सांगतो.चिडलेला घरवाला मग यांच्या तोंडावर दार आपटतो.चिचिनाचे $१५ सुद्धा याने वाटेत भेटलेल्या एका गरिब जोडप्यास देउन टाकलेत.
गाएल गार्सिया बर्नाल हा अभिनेता हुबेहुब तरुण चे सारखा दिसतो, हळुहळु बदलत जाणारा फुसेर याने मस्त रंगवलाय.खरी मजा येते ती मियाल ला बघायला.गुबगुबित, तोंडात अगदी गोड शिवराळ भाषा, चेहर्यावर मजेशिर भाव.
तुमचा कोणताही particular political view नसेल किंवा चे बद्दल माहिति नसेल अगदी तो आवडतही नसेल (हो, बर्याच जणांना तो आवडतही नाही, क्युबात त्याने नंतर विरोध करणार्यांवर बरेच अत्याचार केले अस बोलल जात) तरिही आपल्या सर्वांनाच कधितरी असं मित्रांबरोबर बॅकपॅक करुन भटकायच असत, ज्यांनी हे केलय त्यानी nostalgia साठी आणी ज्यांच राहुन गेलय त्यांनी त्यातली मजा घेण्यासाठी हा चित्रपट जरुर पहावा.
चित्रपटाच्या अखेरीस त्याच्या डायरितील शेवटच वाक्य येत
"was our view too narrow,too biased, too hasty?
were our conclusions too rigid? maybe.
wandering around our america, has changed me more than i thought.
i am not me anymore, atleast i am not the same me i was".
या चित्रपटाबद्दल ऐकलयच,
या चित्रपटाबद्दल ऐकलयच, अधूनमधून झी स्टुडिओवर पण लागतोय, पण पाहणे झाले नाही. चे गवेराचा चेहरा असलेले टी-शर्ट्स आणि सध्या 'फिडेल, चे आणि क्रांती' हे क्युबन क्रांतीवर आधारीत पुस्तक वाचतोय, त्यामुळे या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढीस लागलीय. नक्की पाहण्याच्या यादीत हा चित्रपट आहे आत्ता.
वा! नेतिरी, वेचक
वा!
नेतिरी, वेचक चित्रपटांबद्दल लिहिण्याचा उपक्रम आवडला. सगळे लेख वाचते आहे.
मागच्याच महिन्यात बघीतला हा
मागच्याच महिन्यात बघीतला हा सिनेमा (नेटफ्लिक्सचा विजय असो). ह्याबद्दल लिहावे असे वाटले होते पण तुमच्याइतके सुरेख नसते लिहीता आले.