"The Syrian Bride" हा चित्रपट अरब/इस्त्राइली वादावर थोदासा बेतला असला तरी तो political movie मुळिच नाहिये.राजकिय घडामोडींचे परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर कसे होतात याच हे मजेशीर उदाहारण.
मोना ह्या द्रुझी (Druze-इस्लाम मधील एक पंथ. सिरीया/लेबनन मधे यांची बरीच वस्ती अढळते, लग्न संबंधा बाबत यांचे नियम कडक असतात.गैर द्रुझीशी लग्न केल्यास जातिबाहेर टाकले जाते अगदी शिया/सुन्नि सुद्धा चालत नाहित यांना) तरुणिच्या लग्ना भोवती सगळा चित्रपट फिरतो.गोलन हाइटस् या इस्राइली व्याप्त सिरीया मधे राहणार्या मोनाच तालेल या दमास्कस मधे राहणार्या दूरच्या नातेवाइकाशी लग्न ठरलय.एकदा का ती लग्न करुन सिरीयात गेली की ती सिरीयन नागरीक बनेल आणी तिला कधीच घरच्याना भेटण्यास येता येणार नाहि.कारण दोन्ही देशादरम्यान असलेली स्फोटक परिस्थीती.इकडे मोनाच्या लग्नाची घरी गडबड चालु आहे.हमीद हे तिचे वडील सिरीयन एकिकरणाचा पुरस्कार करतात आणी नुकतेच तुरुंगातुन सुटलेत.अमल(played wonderfully by hiam abbas) ही तिची मोठी बहीण जवळच राहते आणी नवर्या बरोबर तिच काही फारस चांगल सुरु नाहिये.दोन मोठ्या मुली असलेली अमल युनिव्हर्सिटीत पुन्हा शिकायला जायचा विचार करतिये आणी बायकोच्या एकंदर स्वतंत्र आणी outspoken व्यक्तिमत्वा मुळे आमिन वैतागलाय.मोना-अमलचा मोठा वकील भाउ हातेम मॉस्कोत राहतो.एका रशियन स्त्री शी लग्न केल्यामुळे वडिलांनी आणी समाजाने याला जतिबाहेर टाकलय.आठ वर्शांपासुन घरी न आलेला हातेम बहिणीच्या लग्नास घरी येणार असल्याची वंदता आहे.मारवान हा दुसरा भाउ इटली मधे थोडासा shady वाटणारा इम्पोर्ट्-एक्सपोर्ट चा व्यवसाय करतो आणी चांगलाच रंगीन ही आहे.सकाळपासुन घरात लग्नाची जोरात तयारी सुरु आहे, त्यातच हातेम ला घरात घेतलस तर आम्ही लग्नाला येणार नाही असे भावकितले लोक मोनाच्या वडीलांना सांगुन जातत.न पाहिलेला तालेल आणी घरचे पुन्हा कधीच दिसणार नसल्या मुळे मोना फारच nervous आहे.इतक्यात हातेम पत्नि आणी मुलासमवेत घरी येतो.वडील सोडुन सगळेच आनन्दात त्याला भेटतात.इकडे अमिन बायकोला आलेल युनिव्हर्सिटिच पत्र बघुन चिडलाय.अजुनही परोल वर असलेल्या मोनाच्या वडलांना तिला पोचवायला सिमेवर जात येणार नाही असे इस्त्राइली पोलिस अधिकारी सांगतो.लग्नाचा खाना अशाच tense वातवरणात पार पडतो.सगळेजण अगदी मोनाचे वडील सुद्धा सीमेवर तिला पोचवायला येउन थांबतात.सिमेच्या दुसर्या बाजुस नवरा मुलगा आणी मंडळी येउन थांबलियेत.इतक्यात पोलिस अधिकारी मोनाच्या वडेलांना तिथे आल्याबद्दल अटक करु म्हणतो.पण हतेम त्यांना वॉरंट नसेल तर अटक करता येणार नसल्याच सुनावतो.इकडच्या बाजुच्या इस्त्राइली अधीकार्याने मोनाच्या paasport वर stamp मारलाय आणी UNO ची एक अधीकारी तो घेउन पलिकडच्या सिरियन officerच्या शिक्क्या साठी येते.passport stamp बघुन सिरियन प्रवेश नाकरतो.तो म्हणतो हा नविन stamp आहे ज्यानुसार ती इस्त्राइल मधुन सिरीयात येइल, पण ती तर सिरियातच आहे आणी इस्त्राइली लोकांनी तो ढापला असला तरी तो काही इस्त्राइल बनत नाही.UNO ची बाइ पुन्हा इकडे येउन शिक्का बदलण्याची विनंती करते, पण इस्त्राइली म्हणतो हा तर नविन कायदा झालय.त्या बाइच्या इकडे तिकडे २/४ चकरा होतात दोन्हिकडचे ऐकायला तयार नाहियेत.दुसर्या दिवशी शब्बाथ असल्या मुळे सर्व offices lavakar बंद.मोनाच्या घरचे चान्गलेच काळजीत पडतात.ठरलेल्या दिवशी लग्न झाले नाही तर अपशकुन असतो आणी सगळी कगदपत्रे काढुन घेतल्या मुळे तिला आता घरी ही जाता येणार नाही.शेवटी सिरीयन अधीकारी तो शिक्का पुसल्यास प्रवेश मन्जुर करेल असे सांगतो.इकडे घरी निघालेला इस्त्राइली correction fluid ने शिक्का पुसुन देतो. UNO ची बाइ तो पासपोर्ट सिरियन बाजुस मंजुरी साठी आणते...पण......तिथे तर आता मघाचा अधीकारी नाहिये, शिफ्ट् सम्पल्यामुळे तो घरि गेलाय आणी हा नविन माणुस पासपोर्ट वरचा पुसलेला शिक्का पाहुन प्रवेश नाकरतो.UNO ची बाइ आत हात झटकुन आपल्याला काहिही करणे शक्य नसल्याचे सांगते.इकडे घरातले सगळे हवालदील होतात.शेवटी इतका वेळ गेट समोर एका खुर्चीत बसुन राहिलेली मोना सरळ उठुन सिरियन सिमेकडे चालु लागते आणी अमल उलट दिशेला.दोघीही ताठ मानेने आणी आत्मविश्वासाने आपापल्या भवितव्याकडे चालु लागतात आणी चित्रपट संपतो.
२००४ साली प्रदर्शीत झालेल्या या चित्रपटास दिग्दर्शीत केल होत eran ricklis यांनी आणी पटकथा होती suha arraf यांची.मजेशिर बाब अशी दिग्दर्शक इस्त्राइली आहे तर सुहा पॅलेस्तिनी आणी या चित्रपटास एइस्त्राइली film board नी finance केलय.
या चित्रपटात अनेक मजेशीर प्रसंग आहेत.भेटता येत नसल्या मुळे लोक सिमे वर लाउड स्पिकर घेउन एकमेकांशी बोलतात, मारवान च UNO Officer शी असलेल प्रकरण आता संपलय पण तरिही ती त्याच्यावर थोडीशी डु़ख ठेउन आहे आणी जाता जाता त्याला सुनावते समोरच्या दातात फट असलेल्या तुझ्यासारख्या पुरुशावर कधीच विश्वास ठेउ नये.आपल्या लग्नाच्या एकंदर गोंधळा कडे हताश होउन पाहत असलेल्या मोनाला तिचा फोटोग्राफर म्हणतो "there are no rules, marriage is like a watermelon.u can't tell what is inside till u open it up.it's a matter of fate"
हलका फुलका असला तरी चित्रपट पाहुन थोडस अंतरमुख व्हायला होतच.
नमस्कार नेतिरी, आपण ललित आणि
नमस्कार नेतिरी,
आपण ललित आणि चित्रपट अश्या दोन्ही विभागात हा धागा काढलात का? दोन्हीकडे वेगवेगळे २ धागे दिसताहेत. चित्रपट परीक्षण फक्त चित्रपट ग्रूपमध्ये लिहीणे अपेक्षित आहे.
आपण सहकार्य काराल ही अपेक्षा. धन्यवाद.