Submitted by पियापेटी on 15 January, 2011 - 06:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१.५ तास
लागणारे जिन्नस:
- खारीक :१ किलो
- खोबरे:१ किलो
- डिंक :२०० ग्रॅम
- साखर:१/२ किलो
- गव्हाचे पिठ:३/४ किलो
- काजु:१ वाटी
- बदाम:१ वाटी
- तुप:३/४ किलो
- ओवा:५० ग्रॅम
- जायफळः१
- सुंठ:५० ग्रॅम
क्रमवार पाककृती:
- डिंक्,खोबरे,साखर,खारीक बारीक करुन घ्यावा.
- तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन एकत्र करावे.
- डिंक तुपात तळुन घ्यावा
- तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन साखर,काजु,बदाम,जायफळ,सुंठ एकत्र करावे.
- एका मोठ्या कढ्ईत सर्व पदार्थ एकत्र करुन मळावे व लाडु बांधुन घ्यावेत.
वाढणी/प्रमाण:
२० लाडु
अधिक टिपा:
डायबेटीक लाडु कारायचे असतील तर साखर कमी करुन ५० ग्रॅम मेथ्या घालाव्यात.
खारीक बिया काढुन बाहेरुनच बारीक करुन आणावी/ खारीक बिया काढुन चाकुने कापावी व नंतर मिक्सर मधुन बारीक करावी.
माहितीचा स्रोत:
सासुबाई-माझी आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरो वा
अरो वा
मस्त..!
मस्त..!
मस्त. मागच्या वर्षी मिळायला
मस्त. मागच्या वर्षी मिळायला हवी होती.
अरे वा! एकदम चविष्ट आणि
अरे वा! एकदम चविष्ट आणि पौष्टिक असतात हे लाडू.
एवढ्या साहित्यात फक्त 20च
एवढ्या साहित्यात फक्त 20च लाडू होतात? किलो मध्ये प्रमाण लिहिलंय म्हणून विचारतेय.
छान.
छान.