डिंकाचे लाडु

Submitted by पियापेटी on 15 January, 2011 - 06:30
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१.५ तास
लागणारे जिन्नस: 
  1. खारीक :१ किलो
  2. खोबरे:१ किलो
  3. डिंक :२०० ग्रॅम
  4. साखर:१/२ किलो
  5. गव्हाचे पिठ:३/४ किलो
  6. काजु:१ वाटी
  7. बदाम:१ वाटी
  8. तुप:३/४ किलो
  9. ओवा:५० ग्रॅम
  10. जायफळः१
  11. सुंठ:५० ग्रॅम
क्रमवार पाककृती: 
  • डिंक्,खोबरे,साखर,खारीक बारीक करुन घ्यावा.
  • तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन एकत्र करावे.
  • डिंक तुपात तळुन घ्यावा
  • तुपामध्ये खोबरे , गव्हाचे पिठ भाजुन साखर,काजु,बदाम,जायफळ,सुंठ एकत्र करावे.
  • एका मोठ्या कढ्ईत सर्व पदार्थ एकत्र करुन मळावे व लाडु बांधुन घ्यावेत.
वाढणी/प्रमाण: 
२० लाडु
अधिक टिपा: 

डायबेटीक लाडु कारायचे असतील तर साखर कमी करुन ५० ग्रॅम मेथ्या घालाव्यात.
खारीक बिया काढुन बाहेरुनच बारीक करुन आणावी/ खारीक बिया काढुन चाकुने कापावी व नंतर मिक्सर मधुन बारीक करावी.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई-माझी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users