दिर्घकथा : जलजीवा (भाग- ७)

Submitted by निमिष_सोनार on 11 January, 2011 - 10:27

दिल्ली आणि मुंबईहून आलेली टीम आसंद जवळच्या एका शहरातल्या हॉटेलमध्ये सात वाजता येवून थांबली होती. त्यात त्रीशा आणि भार्गवी दोन्ही होत्या.

त्यांनी आल्यावर सेटल झाल्यावर अमेयला कॉल केला.

पलीकडून अमेयचा फोन उचलला गेला आणि तो उचलला होता अशोकरावांनी.

त्या जंगलाच्या मध्यभागी तळ्याच्या जवळ भर पावसात अमेयला शोधून शोधून थकलेले अशोकराव, जितिन आणि धोंडू हे तिघे उभे होते.

शेवटी जवळपास मोबाईलची बीप बीप ऐकू आल्याने त्यांना अमेयचा मोबाईल सापडला आणि त्यांनी तो उचलला. पण, बॅटरी फारच थोडी उरली होती.

अशोकराव- "हॅलो! कोण?"

भार्गवी- "हाय.. अमेय?... मै भार्गवी बोल रही हू... नाफ्ट चॅनेल की टीम से."

अशोकराव- "अरे. ओके. मला तुम्हाला हे सांगायला थोडं अवघडल्यासारखं होतय की, अमेय हरवलाय, जंगलातून गायब झालाय. आम्ही त्याला शोधतोय."

सांगतांना अशोकरावंचा आवाज थरथरत होता.

कॉल अचानक कट झाला. कारण मोबाईलमधली बॅटरी संपली होती.

भार्गवीने आपल्या टीमला हा निरोप दिला. ती ही हादरली होती. पण बोलता बोलता अचानक कॉल कट झाल्याने त्यातले बारकावे तीला कळले नाहीत.

भार्गवी- "पण, अमेय ऐसे कैसे गायब हो सकता ऐ, समझ नही आ रहा है!"

त्रीशा- "आपण, लेस्टर बेनेटला कॉल करूयात का? की आधी वस्तुस्थिती जाणून घेतल्या नंतरच काय ते ठरवायचे?"

टीम बराच वेळ चर्चा करत होती. जर अमेय खरंच हरवला असेल तर शूटींग पुढे करायची की परत जायचे की आणखी काही?

त्यांनी प्रथम वस्तुस्थिती जाणून मगच लेस्टर बेनेटला दुसर्‍या दिवशी कॉल करायचे ठरवले. शूटींगचा स्पॉट आणि इतर माहिती या टीमला ही होतीच.

पण, अमेयवीना ही शूटींग? शक्य नव्हते. अमेय ची शूटईंग करतांनाची स्टाईल, त्याची बोलण्याची लकब आणि तो स्वतः हे अगदी लोकप्रिय होते. अमेयच्या या आणि इतर अनेक वैशिष्ट्यांमुळेच त्याहे व्हिडीओज खुप लोकप्रिय झाले होते. बरेच लोक फक्त तो एखाद्या व्हिडीओत अ‍ॅन्कर आहे म्हणून फक्त त्याची डॉक्युमेंटरी वगैरे बघायचे.

भार्गवी -"अरे त्रीशा, एक मिनीट! अमेय के काका के घर चलते है हम सब.... किसी के पास उनका अ‍ॅड्रेस तो जरूर होगा?"

त्रीशा- "लेकीन, अब यहासे बस मिलेगी क्या हमें?"

टीम मधील एक जण राहुल म्हणाला- " मै नीचे जाकर पूछ्ताछ करके आता हू, वरना कल चलेंगे...!"

****

इकडे अ‍ॅनाची आई बेशुद्धावस्थेत होती. तीला अचानक भोवळ आलेली होती आणि त्यानंतर तीला मोठ्या हॉस्पीटलमध्ये अ‍ॅडमीट केले गेले होते. तीने एन. एच. एस. मधून पूर्ण सुटी घेतली होती आणि तीची आई दाखल असलेल्या हॉस्पीटलमध्ये ती आली होती. संध्याकाळी मुख्य डॉक्टर नुकतेच आले होते आणि ते तीच्या आईला चेक करायला आतमध्ये गेले होते.

डॉक्टरांच्या येण्याची वाट बघत ती बाहेर बेंचवर बसली होती.

तीच्या सोबत मदतीला म्हणून बाजूच्याच रस्त्यापलीकडे राहाणार्‍या तीच्या एका मित्रास - जेफ ट्रेल यास ती घेवून आली होती. ते दोघे स्कूलमध्ये सोबत शिकले होते. तो संध्याकाळी मदत लागल्यास पुन्हा येणार होताच.

....आता संध्याकाळी तीने पुन्हा अमेयला कॉल केला पण कुणी उचलत नव्हतं.

नंतर पुन्हा कॉल लावल्यानंतर मोबाईल स्वीच ऑफ येत होता.

तीने त्याला कॉल करण्याचा नाद तात्पुरता सोडून दिला. पुन्हा तीला रडू यायला आले.

शक्यतो तीची आई वाचणार नव्हतीच. पण तीला आशा होतीच!

पण डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी तो निरोप सांगितला.

डॉक्टर- "मिस अ‍ॅना, आय अ‍ॅम व्हेरी सॉरी टू से... युवर मदर हॅज ऑन्ली टूमॉरोज टाईम. शी इज नाऊ कॉन्शस अ‍ॅण्ड कॅन स्पीक.. ती आता शुद्धीवर आहे आणि, तीच्या जवळ फक्त उद्याचा दिवस आहे. तीला तू घरी घेवून जावू शकतेस. तू स्वतः डॉक्टर असल्याने तुला माहिती आहे की हा आजार किती तीव्र आणि असाध्य आहे... मी माझ्या परीने प्रयत्न केले..."

अ‍ॅनाला रडू कोसळले आणि तीला प्रकर्षाने अमेयची आठवण आली. पण फोन लागत बव्हता. काय झाले याला?

आज दुपारनंतर त्याने फोन का केला नाही? त्याचा फोन का लागत नाही आहे?

तेवढ्यात कारने जेफ आला आणि रडणार्‍या अ‍ॅनाला पाहून त्याच्याही पोटात गोळा आला आणि त्याला पुढची धोक्याची सूचना आपोआप समजली. डॉक्टर ने त्यालासुद्धा समजावून सांगितले आणि अ‍ॅनाला आधार देण्यास सांगितले.
मग ते तीघे हॉस्पीटलच्या अँम्ब्युलन्स ने अ‍ॅनाच्या घरी आले. प्रवासात आई निश्चल पडून होती आणि अ‍ॅना सारखी रडत होती.

घरी बेडवर आईला व्यवस्थीत झोपवल्यानंतर अँम्ब्युलन्स आणि इतर कर्मचारी सूचना देवून निघून गेली.....

जेफ- "रात्री मी थांबू का मदतीला?"

अ‍ॅना- " यस, प्लीज. थॅन्क्स! तू खालच्या हॉलमध्ये झोपू शकतोस.. खरंच प्लीज थांब आजच्या रात्री... आईला काही त्रास झाला तर तुझी फार मोलाची मदत होईल."

जेफ- "आय वील ब्रीग यु अ सॅण्डविच ऑर समथिंग..?"

अ‍ॅना- "नो आय एम फाईन"

जेफ- "काहीतरी खावून घे. अशाने तब्येत बिघडेल. मी आणतो. तोपर्यंत आईशी बोल् टिची काळजी घे...तीला काही बोलायचे असेल! चल येतो."

जेफ कारने बाहेर निघून गेला.

अ‍ॅना ने पुन्हा अमेयला फोन लावला पण व्यर्थ.

मग तीला अचानक आठवलं की त्याचा मुंबईचा पत्ता आणि त्याच्या भावाचा अमोलचा नंबर तीने एकदा कुठेतरी लिहून घेतला होता. तो शोधायला ती टेबलाकडे वळताच तीला आईने हाक मारली.

आई- "अ‍ॅना.. इकडे ये.. मला तुला काहीतरी सांगायचंय!"

अ‍ॅना ला हुंदका आवरला गेला नाही- "आई... सांग ना"

आई- "अमेय ला फोन केला होतास? "

अ‍ॅना- "नाही... फोन लागत नाही आहे."

आई- "माझी शेवटच्या दोन इच्छा आहेत: एक म्हणजे तुम्ही दोघांनी लग्न करावे आणि दुसरी म्हणजे तुझ्या बाबांच्या काही गोष्टी मला तुला आताच सांगायच्या आहेत."

अ‍ॅना- "तसंच होईल आई. सांग कोणत्या गोष्टी आहेत त्या?"

आई- "माझा लॅपटॉप ऑन कर!"

अ‍ॅना ने लॅपटॉप ऑन केला. विंडोज सुरू झाले.

टास्क बार आणि स्टार्ट मेनू दिसयला लागला.

आई- "डी ड्राईव्ह मध्ये माझी एक एक्सेल फाईल आहे, ती पासवर्डनेच ओपन होते. त्यात माझे सगळे ईमेल आणि बँकेचे पासवर्ड आहेत..."

अ‍ॅना- "ममा... ते ठीक आहे. या पैशांच्या गोष्टी आता इतक्या महत्त्वाच्या नाहीत...."

आई- "मी काय म्हणते ते पुढे ऐक्....त्या फाईलमध्ये तुझ्या वडीलांच्या अनेक सिडीज ओपन करण्याचे पासवर्ड्स लिहिलेले आहेत. ते फक्त तुलाच देण्याचे मला त्यांनी सांगितले होते... त्या सीडींमध्ये बरीच रहस्ये आहेत...."

आई पुढे म्हणाली- "त्या सिडीं मध्ये बरीच रहस्य आणि माहिती आहे. ती मी तुला सगळी आता सांगू शकत नाही. पण, त्यातली कोणती माहीती जगजाहीर करायची आणि कोणती नाही हे सगळं त्यात लिहिलं आहे. ते पाळ!!!

तुला माहीतीच आहे की तुझे वडील जहाजावर इंजिनियर होते. तू बरीच लहान असतांना ते वारले...झाली का ओपन फाईल"

अ‍ॅना- "ठीक आहे आई. सांग तुझ्या एक्सेल फाईलचा पासवर्ड.."

आईच्या त्या फाईलचा पासवर्ड म्हणजे वडीलांच्या नावाचा होता.

ऑर्थर हॉफमन.

पासवर्ड टाकताच फाईल ओपन झाली. सहज फाईलवर नजर टाकताच त्यात अनेक पुस्तकांबद्दल माहिती होती...अनेक सीडींची माहिती, त्यातल्या फाईल्स त्यांचे पासवर्ड व इतर अशी अनेक प्रकारची माहिती होती.

त्यात लिहीलेल्या प्रत्येक फाईलचा प्रत्येक पासवर्ड एकाच शब्दाने बनलेला होता पण फक्त त्यात नंबर्स वेगवेगळे होते.

तो पासवर्ड होता- "डेव्हिल्स स्क्वेअर"!! (DEVIL'S SQUARE)

(क्रमशः)

गुलमोहर: 

ऊत्सुकता वाढवणारे दिसतेय. पण थोडे मोठे भाग टाकाल का? वाचायला सुरुवात केली की लगेच संपतो, अशाने ऊत्सुकता राहत नाही.

छान लिहिलय.....<<वाचायला सुरुवात केली की लगेच संपतो, अशाने ऊत्सुकता राहत नाही.>> अनुमोदन

पण खरच भाग खुपच लहान टाकताय, आणि आम्ही हे पहिल्या भागापासुन सांगतोय....

कि कथेला दिलेल्या शीर्षकाच सार्थक व्हाव म्हणुन कथेचे भाग वाढवताय.......????

पण थोडे मोठे भाग टाकाल का? वाचायला सुरुवात केली की लगेच संपतो, अशाने ऊत्सुकता राहत नाही.>> निमिष, या वाक्याला अनुमोदन द्यायला आले होते, पण कथा उत्सुकता वाढवणारी असल्याने पटापट रहस्य समजावे असं वाटतं. त्यामानाने तुम्ही लवकर लिहीण्याचा प्रयत्न करत आहातच... Take your time... कारण कथासूत्र विस्कळू न देता, टायपो मिस्टेक्स टाळून टाईपणं कित्ती अवघड असतं हे चांगलंच अनुभवलंय... आठवड्यात २-३ भाग आले तरी चालतील (तेवढी मागणी मात्र नक्कीच करेन :फिदी:) पुलेशु चांगलं लिहीताय!!! Happy

माझ्या या कथेच्या सर्व वाचकांना सर्वप्रथम सप्रेम नमस्कार!
आपल्या सर्वांच्या सूचनेनुसार मोठे भाग टाकण्याचा प्रयत्न नक्की करेन.
जॉब सांभाळून लिहित असल्यामुळे थोडे वेळेचे बंधन येते.
...त्यामुळे इच्छा असूनही कधी कधी मोठे भाग टाकता येत नाहीत.
वेळेचे बंधन असल्याने विविध प्रसंग, संवाद कधी कधी नाईलाजाने आटोपते घ्यावे लागतात.
पण, कथेच्या दर्जात, आशयात आणि इतर गोष्टीत तडजोड न करता लिहायचे म्हटले म्हणजे थोडा जास्त वेळ लागतोच!
शक्यतो एक दिवसा आड एकेक भाग टाकण्याचा जो मी नियम ठरवला आहे, तोच शक्यतो मी पाळेन.
अन्यथा तसे न जमल्यास एकदम मोठा भाग जरूर टाकत जाईन!!
आपल्या सगळ्यांना कथा आवडते आहे; आणि आपण तसे आवर्जून कळवता त्याबद्दल धन्यवाद!
-- निमिष न. सोनार, पुणे --

निमिश तु म्ह्नजे माझा मराटि steavan spilberg आहेस जबरि लिहित आहेस सोल्लिड तुझ्अ ब्लोग असेल् त्र प्लिज सान्ग

धन्यवाद!
माझा मराठी साहित्याचा ब्लॉग- http://nimishnsonar.blogspot.com
चित्रपटविषयक ब्लॉग- http://filmyfire.blogspot.com
सुविचारांचा ब्लॉग- http://thinknimish.blogspot.com
तुम्ही मला ट्वीटर वर आणि फेसबुक वर फॉलो करु शकता-
twitter.com/thinknimish
facebook.com/thinknimish

निमिष जी, रागावलायत का? नवीन भाग नाही आला अजुन.....???
पण उत्सुकतेपोटीच भाग मोठे टाकायला सांगते कारण कथा आवडली कि ती कधी आणखी वाचायला मिळेल अस वाटत.....
मग येवु दे नवीन भाग लवकरच.........

मी ऑफिसमधेच वाचते हे आणि आता १५ दिवस सुट्टी वर चाललेय.....

जलजिवा कुठे हरवला रे??????
लवकर शोधा त्याला आणि पाठवा इथे...
मा.बो. वाट पाहत आहेत...................