नदीकांठ

Submitted by भाऊ नमसकर on 7 January, 2011 - 04:09

या सदरातल्या माझ्या "कोंकण"ला मिळालेला प्रतिसाद पाहून कांहीशा आधाशीपणेच हे "पेंट"मध्येच केलेलं दुसरं चित्र टाकतोय. जाणकारांकडून आता मात्र मला कानपिचकी "ओव्हरड्यू" आहे !

riverside2.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अप्रतिम.
पुन्हा एकदा प्रपोर्शन, डेप्थ छान! बारकावे देखिल मस्त! झाडाच्या बुंध्याचे शेडिंग, पाण्याचा प्रवाह, पाण्यातले प्रतिबिंब, टेकडीवरील घर>>> अनुमोदन

<<चित्राच्या तळाला सफाईदार पणे फुटपाथचा काठ दाखवलाय. तो बहुतेक गावात नसतो ना?>>दक्षिणाजी, समजा तो फुटपाथ नसून घराच्या कंपाउंडची भिंत आहे असं मी सागितलं व तुमचा त्यावर विश्वास नाही बसला तर तो दोष माझ्या चित्रकारितेचा आहे, तुमचा नव्हे ! Wink
अनपेक्षित इतक्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार.

हे खरच पेंट मधे आहे? जर तुम्हि तुमचि कला अमान्य करत असाल तर तो उंदिर (mouse) कुठुन आणला सांगा. तो नक्किच प्रोग्रॅम केलेला दिसतोये.

हम्म्म ssssssssss
मस्त भाऊ मस्त
क्या बात है ! क्या बात है ! क्या बात है !

पेंटमध्ये इतकं सुंदर काढू शकता चित्र विश्वासच बसत नाहीये. अफ्फाटच काढलंयत. पण चित्र बघितल्या बघितल्या सगळ्यात पहिल्यांदा मलाही तो फुटपाथच वाटला व दक्षिणासारखाच खटकला सुद्धा.

<<जर तुम्हि तुमचि कला अमान्य करत असाल तर तो उंदिर (mouse) कुठुन आणला सांगा. >> मोनालिप, गणपतिबाप्पा प्रसन्न होऊन मला म्हणाला " मायबोली वर एकदां तरी कौतुक व्हावं, एव्हढंच हवंय ना तुला ? जा या माझ्या ऊंदराला घेऊन कांही दिवस; पूरा करेल तो तुझा मनोरथ !" Wink
सर्वांस धन्यवाद.

पेंट मधून काढल्यागत वाटतच नाही... अगदी हाताने काढल्याइतके छान! डोंगर , पाण्यातील प्रतिबिंब, व्यवस्थित रेखाटलेल्या बॉर्ड्रर ... सुरेख!!

जबरी पेशन्सचं काम !! Happy (पण... मला 'कोकण' जास्त आवडलं.)
एका बैठकीत केलंत? किती वेळ लागला? (प्रश्न मूर्खपणाचा आहे का? पण मी चित्रकलेतली औरंगजेब आहे. त्यामुळे समजून घ्या :हाहा:)

धन्यवाद.
<<पण मी चित्रकलेतली औरंगजेब आहे.>> ललिता-प्रीतीजी, मी 'माऊस" वापरत असलो तरी औरंगजेबाला हैराण करणारा "दख्खनका चूहा" नक्कीच नाही. Wink साधारण एक-दीड तासांच्या दोन बैठकीत [ घरी असा अगदीं अखंड वेळ मिळणे अर्थात अशक्यच ] चित्र होतं.
<<मला तुम्ही पेंटिंग करताना पहायचय.>> किरू, सतत माझ्या खुर्चीखाली रांगत येऊन "स्टॅबिलायझर"शी खेळू पहाणार्‍या ९ महिन्याच्या माझ्या नातवाला घेऊन दोन तास बसायची तुमची तयारी असेल, तर केंव्हाही ! Wink
<<भाऊ, आता रंगाचं मनावर घ्याच.>>दिनेशदा, मनावर घेतलं, प्रॉमिस !

काका, आता ते पेन माउस आणि फोटोशॉपचं मनावर घ्याच.
बाकी चित्र मस्तच.
तो फुटपाथच वाटण्यापेक्षा मला रस्त्याला बाजूने दगड लावलेले असतात ना ते वाटले. म्हणून खटकले नाहीत. वळणावरचा रस्ता आणि बाजूने वाहते नदी असं काहीतरी..
माडखोल भागात आहे बघा ते तसं... Happy

Pages