Submitted by चिनूक्स on 4 January, 2011 - 02:38
तन्वीर हा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांचा मुलगा. एका अपघातात सोळा वर्षांपूर्वी त्याचं निधन झालं. तन्वीरच्या जाण्याचं दु:ख बाजूला ठेवून त्याचा वाढदिवस साजरा करावा, अशी कल्पना पुढे आली, आणि तन्वीर सन्मान सोहळ्याला सुरुवात झाली. दरवर्षी ९ डिसेंबरला, तन्वीरच्या वाढदिवशी, हा सोहळा डॉ. श्रीराम व दीपा लागू यांनी स्थापन केलेल्या रूपवेध प्रतिष्ठानातर्फे पुण्यात आयोजित केला जातो.
भारतीय रंगभूमीसाठी महत्त्वाचं योगदान देणार्या ज्येष्ठ रंगकर्मींना हा पुरस्कार दिला जातो. काहीसे विस्मृतीत गेलेले हे दिग्गज पुन्हा लोकांसमोर यावेत, त्यांचे विचार रसिकांपर्यंत, आजच्या तरुणांपर्यंत पोहोचावेत, त्यांनी रंगभूमीसाठी खाल्लेल्या खस्ता, त्यांचं रंगभूमीबद्दल असलेलं प्रेम यांचा यथोचित गौरव व्हावा, हा या पुरस्कारामागचा हेतू. गेल्या काही वर्षांत रंगभूमीवर आपल्या कामाने ठसा उमटवणार्या तरुण रंगकर्मींना नाट्यधर्मी पुरस्कारानं गौरवलं जातं. या रंगकर्मींना त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी प्रोत्साहन मिळावं, देशभर फिरून काही नवीन शिकता यावं, यासाठी ही शिष्यवृत्ती देण्यात येते. रुपये एक लाख, मानचिन्ह हे तन्वीर सन्मानाचं स्वरूप आहे. नाट्यधर्मी पुरस्कारविजेत्याचा रुपये पन्नास हजार व मानचिन्ह देऊन गौरव केला जातो.
२००४ साली पहिला तन्वीर सन्मान ज्येष्ठ दिग्दर्शक, नाट्यशिक्षक व दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक श्री. इब्राहिम अल्काझी यांना देण्यात आला. श्रीमती विजया मेहतांच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेला. या प्रसंगी श्री. अल्काझी यांचे शिष्य श्री. नसिरुद्दीन शाह व नाटककार श्री. गिरीश कर्नाड आणि श्री. महेश एलकुंचवार यांचीही भाषणं झाली. पुढच्या वर्षी 'ललितकलादर्श' या संस्थेचे संस्थापक व ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक श्री. भालचंद्र पेंढारकर यांना श्रीमती आशा भोसले यांच्या हस्ते तन्वीर सन्मानाने गौरवण्यात आलं. त्याच वर्षापासून नाट्यधर्मी पुरस्काराच्या रूपानं तरुण रंगकर्मींना शिष्यवृत्ती देण्यास सुरुवात झाली. श्री. चेतन दातार हे या पहिल्या पुरस्काराचे मानकरी होते. श्री. विजय तेंडुलकर, पं. सत्यदेव दुबे, कवलम नारायण पाणीक्कर, श्रीमती विजया मेहता यांना आजवर तन्वीर सन्मानाने गौरवण्यात आलं आहे. गजानन परांजपे, संजना कपूर, नाटककार रामू रामनाथन, कणकवलीला बालरंगभूमीची चळवळ चालवणारे श्री. राजेंद्र चव्हाण यांना नाट्यधर्मी पुरस्काराने सन्मानित केलं गेलं आहे.
नटश्रेष्ठ डॉ. श्रीराम लागू आणि श्रीमती दीपा लागू यांच्या रूपवेध प्रतिष्ठानानं केलेला हा सन्मान अतिशय महत्त्वाचा आहे. रंगभूमीप्रती असलेल्या जबरदस्त निष्ठेचा रंगभूमीसाठी आयुष्य वेचणार्या लागू दांपत्यानं केलेला हा सन्मान आहे. या सोहळ्यांतील भाषणं, मुलाखती हा एक मोलाचा सांस्कृतिक ठेवा आहे. भारतीय आणि जागतिक रंगभूमीवरही आपलं नाव अजरामर करणार्या थोर रंगकर्मींनी केलेली भाषणं, त्यांच्या मुलाखती, त्यांच्या समकालीनांनी, शिष्यांनी त्यांच्याबद्दल मांडलेले विचार येणार्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील, यात शंकाच नाही. हे विचारधन सर्वांपर्यंत पोहोचावं, तरुणांना सहज उपलब्ध व्हावं म्हणून तन्वीर सन्मान सोहळ्यांतली भाषणं, मुलाखती मायबोलीवर ऐकण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. येत्या वर्षभर दर महिन्याला काही भाषणं आपण या विभागात ऐकू शकाल.
यंदा या सन्मान सोहळ्याचं सातवं वर्षं होतं. ९ डिसेंबर, २०१०, रोजी पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ज्येष्ठ रंगकर्मी श्रीमती सुलभा देशपांडे यांना तन्वीर सन्मान आणि तरुण अभिनेत्री श्रीमती वीणा जामकर यांना तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार श्री. नाना पाटेकर यांच्या हस्ते दिले गेले. नाट्य-साहित्य-चित्रपटक्षेत्रातले अनेक दिग्गज व रसिक या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्रीमती गौरी लागू यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं आणि ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक-समीक्षक व 'जागर' या नाट्यसंस्थेचे संस्थापक-सदस्य असलेल्या श्री. माधव वझे यांनी सुलभाताईंची मुलाखत घेतली.
वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', 'लालबाग परळ' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा', 'खेळ मांडियेला', 'जंगल में मंगल' यांसारखी नाटकं, वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. वयाच्या पाचव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण करणार्या वीणाने व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. आजपर्यंत तिने नऊ नाटकं, तेरा एकांकिका, दोन दीर्घांक आणि दहा चित्रपटांतून अभिनय केला आहे. 'आविष्कार' या नाट्यसंस्थेनं तिच्या नाट्यकारकिर्दीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजले आहेत. 'पलतडचो मुनिस' हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोंकणी चित्रपट यंदा बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला. टोरंटो चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला समीक्षकांचं पारितोषिक मिळालं.
उत्स्फुर्तता, नैसर्गिक अभिनय आणि भाषेविषयीची विलक्षण जाण ही वीणाची बलस्थानं आहेत. श्री. माधव वझे यांच्यासारखे ज्येष्ठ समीक्षक तिला 'उद्याची सुलभा' म्हणतात, तेव्हा तिच्या अभिनयसामर्थ्याबद्दल शंका उरत नाही.
पुरस्कारसोहळ्यात वीणाची ओळख इरावती कर्णिक यांनी करून दिली. इरावतीने अभिनय, लेखन, दिग्दर्शन या क्षेत्रांत नाव कमावलं आहे. पं. सत्यदेव दुबे आणि चेतन दातार यांची साहाय्यक म्हणून तिने काम केलं आहे. महेश एलकुंचवार, गिरीश कर्नाड यांच्या नाटकांचे तिने मराठी, हिंदी अनुवाद केले आहेत. 'तात्पुरती गैरसोय', 'वदनी कवळ घेता', 'तीच ती दिवाळी', 'मृगाचा पाऊस' ही इरावतीनं लिहिलेली काही नाटकं. 'राधा वजा रानडे', 'एक लेखकु लिहिता लिहिता', 'अलविदा' या नाटकांतून तिने अभिनय केला आहे. इरावती आणि वीणा या समकालीन आहेत.
वीणाची इरावतीने करून दिलेली ही ओळख...
नाट्यधर्मी पुरस्कार मिळवलेल्या वीणा जामकरचं हे मनोगत...
-------------------------------------------------------------XXXX---------------------------------------------------------------------------
'रंगायनच्या बाहेरच्या वर्तुळावर मी होते, आणि कोणती भूमिका माझ्या वाट्याला येते, याची मी वाट पाहत असे. स्वप्नातसुद्धा माझ्या वाट्याला न आलेल्या भूमिका मी करत असे. माझ्या नाटकांतल्या भूमिका सोडल्या तरी माझी मी मला कधीच आवडले नाही', असं लिहून ठेवणार्या श्रीमती सुलभा देशपांड्यांनी भारतीय रंगभूमीला काय दिलं, याची शब्दांत मोजदाद करणं अशक्य आहे. अनेक खस्ता खात, अभिनेत्री, दिग्दर्शिका, संस्थाचालक अशा अनेकविध भूमिका कसबीनं हाताळत त्यांनी प्रायोगिक, व्यावसायिक आणि बालरंगभूमीवर उत्तुंग कार्य निर्माण केलं. अतिशय संयत, व्यक्तिरेखेशी समरस होऊन केलेला उत्कट अभिनय यांमुळे सुलभाताईंनी अभिनय केलेली नाटकं, चित्रपट कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली.
विजय तेंडुलकर, विनायक पै, माधव वाटवे, विजया मेहता, अरविंद देशपांडे यांच्या बरोबरीने सुलभाताईंनी प्रायोगिक रंगभूमीवर प्रवेश केला. प्रायोगिक नाटकांसाठी छबिलदास मुलींच्या शाळेची जागा सुलभाताईंनी मिळवली आणि पुढची कित्येक वर्षं शाळेचं हे सभागृह महाराष्ट्रातल्या प्रायोगिक नाट्यचळवळीची राजधानी बनलं. आधी 'रंगायन' आणि नंतर 'आविष्कार' या संस्थांतून सुलभाताईंनी प्रायोगिक नाट्यचळवळीसाठी जीवाचं रान केलं. पुढे 'चंद्रशाला' या 'आविष्कार'च्या बालविभागाची जबाबदारी सुलभाताईंनी सांभाळली. आज रंगभूमीवर नाव कमावलेले अनेक नट-दिग्दर्शक सुलभाताईंच्या 'आविष्कार'मधून प्रकाशात आले. आजही महाराष्ट्रातल्या प्रायोगिक रंगभूमीशी संबंधित असलेले रंगकर्मी 'आविष्कार'शी नातं जोडून आहेत.
तन्वीर सन्मानाची रुपये एक लाखाची रक्कम सुलभाताईंनी बालरंगभूमीसाठी देऊ केली आहे. बालरंगभूमीवर कार्यरत असणार्या संस्थांना देणगी म्हणून, तसंच महाराष्ट्रातील शाळांत बालनाट्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी ही रक्कम वापरली जाणार आहे.
भारतीय रंगभूमीसाठी आभाळाएवढं काम करूनही कमालीची निगर्वी असणार्या या अभिनयसम्राज्ञीची श्रीमती गौरी लागू आणि श्री. माधव वझे यांनी करून दिलेली ही ओळख...
श्रीमती सुलभा देशपांडे यांची श्री. माधव वझे यांनी घेतलेली मुलाखत ...
भाग १
भाग २
भाग ३
भाग ४
------------------------------------------------------------XXXXX-------------------------------------------------------------------
पुरस्कारसोहळ्यात श्री. नाना पाटेकर यांनी केलेलं भाषण...
लागू दाम्पत्यानं तसंच या सोहळ्यांत गौरवलेल्या दिग्गजांनी, तरुणांनी आपल्याला भरभरून आनंद दिला आहे. आपलं आयुष्य समृद्ध केलं आहे. या नवीन वर्षात रंगभूमीच्या ध्यासापायी आयुष्य वेचणार्या ज्येष्ठ व श्रेष्ठ रंगकर्मींची मनोगतं मायबोलीवर ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल श्रीमती दीपा व डॉ. श्रीराम लागू तसंच 'रूपवेध प्रतिष्ठान'च्या सर्व विश्वस्तांचे मनःपूर्वक आभार. ही मनोगतं वापरण्यास परवानगी दिल्याबद्दल श्रीमती दीपा लागू, श्रीमती सुलभा देशपांडे, श्री. नाना पाटेकर, श्री. माधव वझे, श्रीमती वीणा जामकर, श्रीमती इरावती कर्णिक, श्रीमती गौरी लागू यांना धन्यवाद.
हे नवीन वर्ष आपणां सर्वांस आनंददायी व आरोग्यपूर्ण जाओ, ही सदिच्छा.
*** पुरस्कारसोहळ्यातली प्रकाशचित्रं - श्री. प्रकाश कान्हेरे, कान्हेरे फोटो स्टुडियो, पुणे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- या लेखातील सर्व ध्वनिमुद्रणांवर आणि पुरस्कारसोहळ्यातील प्रकाशचित्रांवर रूपवेध प्रतिष्ठान, पुणे, यांचा प्रताधिकार आहे. ही ध्वनिमुद्रणं आणि प्रकाशचित्रं इतरत्र कुठेही प्रकाशित करण्यास वा कुठल्याही प्रकारे वापरण्यास परवानगी नाही.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चिन्मय.. मस्त रे !! हे सगळं
चिन्मय.. मस्त रे !! हे सगळं इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार..
सुलभाताईंची मुलाखत खूप आवडली.. त्यांचा तेंडूलकर मालिकेतला लेख पण परत वाचला...
ह्या मालिकेच्या फ्रीक्वेन्सी तसच साईज ह्याबद्दल काही विचार करता येईल का ? कारण एका वेळी इतके सारे ऑडियो + लिखाण ऐकणं तसेच वाचणं जमत नाही.. एकदा लेख उघडला की "Mark as unread" करायची सोय नाहिये. त्यामुळे अर्ध्या गोष्टी वाचायच्या / ऐकायच्या राहून जाऊ शकतात. तर एकाच भागात इतकं सगळं देण्याऐवजी थोडं थोडं लिखाण प्रसिद्ध करता येईल का ?
चिनुक्स आणी इतर सर्वांचेही
चिनुक्स आणी इतर सर्वांचेही आभार !
पराग, तू म्हणतोस ते बरोबर
पराग,
तू म्हणतोस ते बरोबर आहे. प्रशासक आणि दीपाताईंशी बोलून याबद्दल काही करता येईल का, ते बघू.
व्वाऽऽऽ...!
व्वाऽऽऽ...! सुंदर..!
मायबोलीवर हे उपलब्ध केल्याबद्दल मनापासुन आभार..!
श्री.
गजानन परांज पे यांनाहि हा
गजानन परांज पे यांनाहि हा पुरस्कार मिळाला होता त्याची बातमी असेल तर क्रुपया टाकाल का?
आरतीसाय, कृपया हे बघा -
आरतीसाय,
कृपया हे बघा - http://www.maayboli.com/node/23987
Pages