कॅलेंडरची १२ पाने

Submitted by देवनिनाद on 1 January, 2011 - 12:36

नुकतीच उपसली कॅलेंडरची १२ पाने
तुम्ही आम्ही प्रत्येकाने,
रुळत होते जुनेच जर-तर
तोवर सुरु झालं, नवं कॅलेंडर

खुले नवे मार्ग सारे
संकल्पाचे नवे राजवाडे
कुणी जिंकती जग सारे
रेंगाळलेला घेतोय आढे-वेढे

मी असाच रे, तो तसाच रे
हीच लेबल पुन्हा सर्वत्र
नव्या पानांच नववर्ष
तुम्ही आम्ही निमित्तमात्र ...

मग कळत नकळत
काही दिवसातच
उपसली जातील
पुन्हा ह्या ही कॅलेंडरची १२ पाने

- देवनिनाद

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

छान.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद !! बाय दी वे. वेळ मिळालाच तर सोम ते शनि ८.३० वाजता व्वा ! काय साँग हाय आणि आलं आलं सिनेमावालं हा दर रविवारी ११.३० वाजता झी टॉकीजवर पाहात जा.

बाकी, तुझं छान चाललं असेलच, शुभेच्छा

सस्नेह
देवनिनाद

उल्हास, वारा धन्यवाद !! वारा, अरे आहेस कुठे !! मायबोलीवर किती दिवसांनी तूझी झुळूक दिसली.

शुभेच्छा !!

सस्नेह !!
देवनिनाद

छान Happy

छान.

मु़कू, जागू तुमचे आभार.

मुकू, सुचवलेला शब्द खरचं छान आहे. पण उपसणे ह्या शब्दा मागे एक धावपळ, दगदग .. असं अपेक्षित आहे, त्या तुलनेत पलटली हा शब्द सॉफ्ट जातो. असो. तुझ्या अभिप्राय आणि सुचनेबद्दल धन्यवाद मित्रा.