=================================================
=================================================
कोकण हे जसे स्वच्छ,सुंदर समुद्रकिनारे, हिरव्यागार झाडांतुन धावणारी लाल मातीची पायवाट, कौलारू घरे, हिरवागार निसर्ग, प्रेमळ कोकणी माणसे या गोष्टींसाठी जरी प्रसिद्ध असले तरी ते प्रसिद्ध आहे ते इथल्या खाद्यसंस्कृतीसाठीही. कोकणात येऊन मासे, उकडीचे मोदक, सोलकडी, भाजणीचे वडे, हापूस आंबे, फणस, करवंद न खाणे म्हणजेच कोकण न अनुभवण्यासारखे आहे. तेंव्हा रत्ननगरी रत्नागिरीच्या शेवटच्या भागात आपण "कोकणी खाद्यभ्रमंती" करूया.
=================================================
=================================================
प्रेमळ इशारा – ENTER AT OWN RISK
=================================================
=================================================
व्हेज थाळीकोकणची प्रिती......वडे सागुती
मांदेली ताट
मांदेली फ्राय
चिकन बिर्याणी
सुरमई ताट
सुरमई फ्राय
स्वीट डिश
कोकण सफर आणि कोकणी मेव्याशिवाय कशी पूर्ण होणार???
कोकम सरबतहापूस आंबा (जुना फोटो)
हापूस आंबा(प्रदर्शनातील :()
हापूस आंबा(प्रदर्शनातील :()
फणस (जुना फोटो)
रानमेवा – करवंद (जुना फोटो)
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" – समाप्त
=================================================
रत्ननगरी "रत्नागिरी" – (१)
रत्ननगरी "रत्नागिरी" – (१) गणपतीपुळे, गणेशगुळे आणि भंडारपुळे
http://www.maayboli.com/node/22045
रत्ननगरी "रत्नागिरी" – (२) श्री क्षेत्र मार्लेश्वर
http://www.maayboli.com/node/22073
रत्ननगरी "रत्नागिरी" – (३) प्राचीन कोकण–एक अनोखे म्युझियम
http://www.maayboli.com/node/22107
रत्ननगरी "रत्नागिरी" – (४) डेरवणची शिवसृष्टी
http://www.maayboli.com/node/22137
रत्ननगरी "रत्नागिरी" – (५) रत्नदुर्ग किल्ला
http://www.maayboli.com/node/22164
रत्ननगरी "रत्नागिरी" – (६) थिबा पॅलेस, पावस, भाट्ये समुद्रकिनारा
http://www.maayboli.com/node/22195
रत्ननगरी "रत्नागिरी" – (७) कशेळीचा श्री कनकादित्य
http://www.maayboli.com/node/22224
रत्ननगरी "रत्नागिरी" – (८) श्री महाकाली (आडिवरे)
http://www.maayboli.com/node/22249
रत्ननगरी "रत्नागिरी" – (९) चिपळुण परीसर
http://www.maayboli.com/node/22298
चूक झाली आणि हा धागा उघडला...
चूक झाली आणि हा धागा उघडला...

कामावरचे २१ दिवस कसे जाणार काय माहित...
ते गुलाबजाम माझ्याकडेच बघत आहेत...
कोकम सरबत बेश्ट!
कोकम सरबत बेश्ट!
योगेश पभ
योगेश
पभ 
तोंडाला पाणी सुटलं खरच.....
तोंडाला पाणी सुटलं खरच..... मी मच्छी-मटण नाही खात पण आंबा, फणस, करवंद, कोकम सरबत म्हणजे मुंबईत राहणार्या माझ्यासारख्या कोकणी व्यक्तिचा वीकपॉईंट...... आणि त्यात कहर म्हणजे गुलाबजाम......
आता खाल्लेच पाहिजेत आज ३१च्या निमित्ताने.... आणि बिल तुमच्याकडेच पाठवुन देते
हेच खरं सौंदर्य कोकणातलं.
हेच खरं सौंदर्य कोकणातलं. पाहुन अणि खाऊन मन तृप्त करणारं.
अरे ये... जल्ला तों पा सु.
अरे ये... जल्ला तों पा सु.
नुसतं वरsssssबाड... नुसतं
नुसतं वरsssssबाड... नुसतं वरsssबाड. अगदी असाच ताव मारावासा वाटतोय.
मस्तच... आयला..... कि बोर्ड
मस्तच...
आयला..... कि बोर्ड भिजला कि तोंडाला सुट्लेल्या पाण्याने....
आणि हो एक नमूद करायचे राहिले
आणि हो एक नमूद करायचे राहिले कि, जर तुम्ही रत्नागिरी शहरात असाल तर मारूती मंदिर तिठ्याजवळच असलेले "हॉटेल आमंत्रण" (खास मासे/वडे सागुती खवय्यांसाठी) आणि "हॉटेल मिथिला" (खास व्हेज खाणार्यांसाठी) नक्कीच ट्राय करा.

हॉटेल आमंत्रणमध्ये उकडीच्या मोदकापासुन, मासे, वडे सागुती पर्यंत सगळेच मिळते.
जिप्स्या, "हॉटेल विवेक" मधलं
जिप्स्या, "हॉटेल विवेक" मधलं "सिताफळ आईसक्रीम" विसरलास??
आई.... ग... जेवणाच्या
आई.... ग... जेवणाच्या वेळेलाच हा भाग वाचायला घेतला...
योगेश एवढी छान रत्नागिरी सफर घडवलीस आणि या शेवटच्या भागाने तर नुसत्याच जिभल्या चाटायला लावलेस की रे....
नाहि रे राजा, हि कोकणातली
नाहि रे राजा, हि कोकणातली खाद्ययात्रा नव्हे. एकदा तूला कोकणात फिरवले पाहिजे.
तांदळाची पेज, खारवलेले आंबे, सोलकढी, सातकापे घावण, लवंगलतिका, चुनकापं, आंब्याची साटं, फणसपोळी, तवश्याचे धोंडस, कुळथाची पिठी, फणसाची भाजी, उकडीचे मोदक, ओल्या काजूची उसळ, कच्च्या करवंदाची चटणी, बिमल्याची कढी, काळ्या वाट्याण्याची उसळ, ओल्या जायफळाचे लोणचे, कदंबाच्या फळाचे लोणचे, शिळ्या भज्यांची आमटी, जिर्या खोबर्याचे वरण, नारळाच्या दूधातल्या शेवया, रसघावण, मुगाचे कढण, शेवग्याच्या पानांची भागी, खटखटे लाडू, मूगाचे लाडू, मालवणी खाजा, नेवर्या...
हि खरी खाद्यंती. (तरी मी शाकाहारीच पदार्थ लिहिलेत, ते सुद्धा सर्व नाहीतच )
पण यासाठी तूला कुणाच्या तरी घरी जावे लागेल...
ते मांदेलीचे ताट जरा इथे
ते मांदेलीचे ताट जरा इथे द्या.. मग सुरमयचे पण.
योग्या, झक मारलंय नी फोटो
योग्या, झक मारलंय नी फोटो बगले. जीव जाळलंस माजो...
चूकलो, चूकलो, मी पण चूकलो, की
चूकलो, चूकलो, मी पण चूकलो, की हा धागा बघायला आत डोकावलो

त्यातुन भरीस दिनेशभाऊची पोस्ट............ !
ती वाचली अन, आयला, आम्हाला काहीच माहिती नाही, अजाण बालके आम्ही, याचा साक्षात्कार झाला
>>>> पण यासाठी तूला कुणाच्या तरी घरी जावे लागेल... <<<<
आता तुम्हीच आमचे वाली, तुम्हीच थाटा बघु कोकणांत एक घर, नैतर सरळ रिटायरमेण्टनन्तरची तयारी म्हणून आत्तापासुनच असे सर्व पदार्थ पुरवणारी मेस काढा!
अन त्यात तुमच्या त्या टेलिफुनवाल्या गायब चेल्याला कामाला लावा, कस?
अहो दिनेशदा..... बस कि
अहो दिनेशदा..... बस कि हो........
दिनेशदा, बरक्या फणसाची
दिनेशदा, बरक्या फणसाची सांदणं, उकडांबे, आळू (फळं) विसरलात की.
किती तरी शाकाहरी , गोड सुद्धा
किती तरी शाकाहरी , गोड सुद्धा पदार्थ राहिलेत की दिनेश तुमच्या लिस्टीत.
दा, मी अस्स्सल सातारी
दा, मी अस्स्सल सातारी
त्यामुळे कोकणातील जास्त पदार्थ माहिती नव्हते. 
आम्हाला काहीच माहिती नाही, अजाण बालके आम्ही, याचा साक्षात्कार झाला>>>>>लिंम्बुदा, अगदी, अगदी
यम्मी यम्मी !
यम्मी यम्मी !
खाद्य भ्रमंती हा शब्द वाचून
खाद्य भ्रमंती हा शब्द वाचून ही मालिका उलट्या बाजूने पहायला घेतली आहे
ज्यांचं कोणीही कोकणात नाही त्यांनी कोकण दर्शन कसं करावं ह्यावर कोणीतरी लेख लिहा रे. मला २०११ मधे जायचंच आहे - जमलं तर एप्रिल-मे मध्ये.
जिप्सी, दिनेशदा धन्स. दिनेशदा
जिप्सी, दिनेशदा धन्स. दिनेशदा तुमच्यामुळे सर्व पदार्थांची परत आठवण झाली.
स्वप्ना, कोकण भ्रमंतीसाठी
स्वप्ना, कोकण भ्रमंतीसाठी माझ्याशी संपर्क साधणार का ?
असो, योगेश, सध्या हॉटेलमधे जे मालवणी जेवण मिळते, ते खास करुन पर्यटकांसाठी केलेले असते. वरती तवंग येईल, इतके तेल कोकणात कुठले परवडायला ? शिवाय तिखट पण बेताचेच असते.
वडे वगैरे खास सणालाच करतात.
पण तरीही गावोगावच्या चवीत फरक असतो. राजापूर पूर्वापार सुक्या खोबर्याची पेठ होती, त्यामुळे तिथे थोडाफार सुक्या खोबर्याचा वापर. कांदा खोबरे भाजूनही घेतील. घाटमाथ्यावरची शेवटची गावे, जशी राधानगरी, गगनबावडा, मलकापूर, इथे दोन्ही खोबर्यांचा वापर करतात.
मालवणला ओल्या नारळाचा वापर. पण ते वाटण पाट्यावर वाटत असल्याने, गोव्यातल्यासारखे गंधासारखे वाटलेले नसते. गोव्यात रगड्यावर वाटतात. वरणात शक्यतो हिरवी मिरचीच असते. तिखटाची आमटी असेल तर ती कडधान्याचीच. तीसुद्धा शक्यतो काळ्या वाटाण्याची किंवा चवळीची. मटकी दुरापास्तच होती. मूग असतात पण त्याची सहसा खीर केली जाते. (ती उपवासाला चालते ) मटार मात्र आत्ताआताच मिळायला लागला.
भाज्या मिळणार त्या पावसाळ्याच्या आसपास. जानेवारीपासून ताज्या भाज्यांची वानवाच. अशा वेळी लोणची उपयोगाला येतात. जेवणाबरोबर कांदा घ्यायची पण रित नव्हती. पापडात पण उडदाच्या पापडापेक्षा, पोह्याचे, फणसाचे वगैरे पापड जास्त.
अनेक खास पदार्थ तांदूळ आणि नारळापासूनच केलेले असतात. रसातल्या शेवया (शिरवळ्या), रसघावण, सातकापे घावण, लवंगलतिका, चुनकापं, मोदक, पातोळ्या, आडसराचे वडे या सगळ्यात नारळ आणि तांदूळ हवेतच.
श्रावणात मोठ्या काकडीपासून (तवशे) केलेले धोंडस. फणसाच्या दिवसात सांदण, कलिंगडाचे पांढरे साल किसून त्याचेही धोंडस करतात. फणसाची भाजी म्हणजे खासियतच.
चपात्या जेवणापेक्षा चहाबरोबर खायची रित आहे. भाकर्या असल्या तर त्या तांदळाच्याच क्वचित नाचणीच्या. ज्वारी / बाजरी दुरापास्तच.
चहासुद्धा कोराच. दूधदूभते मिळायला गायीम्हशी कुठे होत्या कोकणात ? आणि हे फार जूने नाही सांगत, माझ्या आजोबांनी आयूष्यात कधी चहा घेतला नाही. खीर असली तरी ती नारळाच्या दूधातलीच.
मधल्या वेळेसाठी खटखटे लाडू, खाजा, मूगदळाचे लाडू वगैरे. बेसनाचे लाडू क्वचितच.
फणसाच्या दिवसात फणस आणि आंबे असतील तर ते आंबे समोर ठेवतील.
आणि हो या सगळ्याबरोबर घराशेजारच्या बावीतले थंडगार पाणी हवेच. देशात सहसा विहीर घराजवळ नसते, कोकणात मात्र घराजवळच असते.
आणि माझे आजोळही कोल्हापूरचेच, तिथली सुबत्ता इथे नाही. (चार महिने पिकवायचे आणि बारा महिने खायचे ) त्यामूळे वाढणारा हात, हवं का ते बघूनच वाढणार.
आता आता कोकणात पर्यटक येताहेत, पण त्यांना अस्सल कोकणी जेवण मिळत नाही. (लिंबू च्या सूचनेचा विचार करायला पाहिजे )
कहर.. कहर आहे दिनेशदा...
कहर.. कहर आहे दिनेशदा... कहर... आता हे खायला एकदा कोणाच्यातरी घरी जायला लागणार...
योगेश ....... संपुर्ण
योगेश ....... संपुर्ण रत्नागिरी यात्रा नेहमी प्रमाणे अप्रतिम...........
दिनेशदा तुम्ही कोकणातलेच आहात
दिनेशदा तुम्ही कोकणातलेच आहात का? कोकणाची सर्वच माहिती तुम्हाला आहे.
अरे काय लिहिताय १-१ जण
अरे काय लिहिताय १-१ जण तोंडाला पाणी सुटलं, प्रचि तर अप्रतिमच
ए पकडा पकडा कि-बोर्ड गेला वाहुन.
जबर्आ फोटो रे योग्या
जबर्आ फोटो रे योग्या !!!
एकदा नोवांतपणे तळकोकणाची मोहीम काढुयात !!!
अवांतर :
नील वेद | 31 December, 2010 - 09:30 नवीन
मस्तच...
आयला..... कि बोर्ड भिजला कि तोंडाला सुट्लेल्या पाण्याने..
>>>>
च्यायला ही जरा जास्तच अतिशयोक्ती झाली नाही का
दिनेशदा, खरंच मी वरच्या पोस्ट
दिनेशदा, खरंच मी वरच्या पोस्ट वाचुन विचार करत होते, कोकणातले ईतर पदार्थांचि लिस्ट टाकावी , तर त्या खाली तुमचि पोस्ट वाचली . आईग! त्या सगळ्या पदार्थांचि नावे आठवून काय झालं सांगू? ह्या शहरात येउन आपण काय काय गमावल......छे ! विचारच करवत नाही !!!!!!!!
शोभा१२३ <<<<<जिप्सी, दिनेशदा धन्स. दिनेशदा तुमच्यामुळे सर्व पदार्थांची परत आठवण झ<<<<<>>>>> १००% अनुमोदन.
Pages