Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 December, 2010 - 03:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
सुरण
मिठ
तुप
चिंच कोळ
क्रमवार पाककृती:
सुरणाच्या चकत्या पाडून साल काढा म्हणजे साल काढायला सोप्पे जाते.
मोठ्या चकतीचे कापुन त्रिकोण करा.
ह्या त्रिकोणांना चिंचेचा कोळ करुन त्यात पाणी घालुन सुरण उकडून घ्या. उकडल्यावर भांड्यातले पाणी काढून सुरणाच्या फोडी ताटात काढा. त्याला मिठ चोळा. पॅनवर तुप किंवा तेल टाकुन खरपुस भाजुन घ्या.
वाढणी/प्रमाण:
४ ते ५ जणांसाठी
अधिक टिपा:
तुम्ही मिठाबरोबर मिरचीपुडही घालु शकता. उपवास नसेल तर मिरपुडही लावता येते. मिरपुडचे काप खुप छान लागतात.
उपवासासाठी करताना जर शिंगाडापिठ असेल तर भजी करु शकता. वरीच्या तांदळात काप घोळवुन शॅलोफ्राय करु शकता.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एकदम टेस्टी लागतात असे काप.
एकदम टेस्टी लागतात असे काप.
याचे लॅम्थो पण करता येतील. मी करते.
असे : http://www.maayboli.com/node/18171
जागु, नावात जरा बदल कर
जागु,
नावात जरा बदल कर "उपवासाचे" अस हवय....
आज शेवटचा गुरवार म्हणुन उपवासाच्या पदार्थावर आलीस वाटत.... पण उद्या शुक्रवार आहे....
जागू फोटो का गं नै टाकलास?
जागू फोटो का गं नै टाकलास?
हा आहे सुरण अशी सुरणाची पातळ
हा आहे सुरण
अशी सुरणाची पातळ चकती काढायची. जरा कलाकुसर करायची.
त्याचे असे त्रिकोणी काप करायचे.
चिंचेचा कोळ लावुन उकडून घ्यायचे म्हणजे खाजत नाहीत.
उकडल्यावर पाणी काढून एका ताटात काढायचे आणि त्याला मिठ आणि हवे असेल ते जिन्नस लावायचे.
आता तव्यावर खरपुस भाजायचे.
हव्या त्या आकारात डेकोरेशन करुन खा.
जागु तै, लैच भारी डेकोरेशन
जागु तै,
लैच भारी डेकोरेशन
निंबे, दक्षे, स्मिता
निंबे, दक्षे, स्मिता धन्स.
स्मिता स्पे. धन्स. बदल केला आहे.
जागु अंर्तयामी आहेस का?? माझा
जागु अंर्तयामी आहेस का?? माझा आयडी सखी_डी असुन माझ्या नावाच्या जवळपास पोहचलीस...
मला खुप आवडतात हे काप. पण इथे
मला खुप आवडतात हे काप. पण इथे सुरण मिळ्त नाहि त्यामुळे करता येत नाहित.
वा छान प्रकार. हेच काप
वा छान प्रकार.
हेच काप दुसर्या पद्धतीने केलेले माहित आहेत. मासे तळल्यासारखे लागतात. जागूने सांगितल्याप्रमाणे पातळ काप करून उकडून घ्यावेत. आले-लसूण, थोडा कांदा, कोथिंबीर एकत्र करून वाटून घ्यावे. हे वाटण, हळद आणि मीठ सुरणाच्या कापांना लावावे. तांदळाच्या पीठात घोळवून तव्यावर तेल सोडून तळावेत. मस्त लागतात. शाकाहारी माशाच्या तुकड्या!
किती वेळ उकडायचे? उकडले गेलेत
किती वेळ उकडायचे? उकडले गेलेत हे कसे समजते?
सखी ह्याला आंतरीक मैत्री
सखी ह्याला आंतरीक मैत्री म्हणतात !
shmt काय उच्चारायच मराठीत तुम्हाला ? धन्स.
मामी वेगळा प्रकार सांगितलात मस्त. आता पुढच्यावेळेस करुन बघेन.
मोहनप्यारे उकडल्यावर सुरणात सुरी किंवा चमच्याचा दांडा घालुन बघायचा. सहज गेला म्हणजे शिजला. लगेच शिजल्यावर सुरण मउ होतो. काप करायचे असताना अगदी जास्त पण शिजवु नका.
सुरण नव्हते म्हणून मी
सुरण नव्हते म्हणून मी बटाट्याचे काप असेच करुन पाहिले.. मस्त झाले होते. आता सुरणाचेही करुन बघेन.
<<शाकाहारी माशाच्या
<<शाकाहारी माशाच्या तुकड्या!>>आमच्याकडेही साधारणपणे असेच करतात.
टिप - सुरण घेताना पिवळसर रंगाचा व आतून खरबरीत असावा. आंतून गुळगुळीत व तांबूस असलेल्या सुरणाला "खा़ज" असते व शिजायलाही वेळ लागतो व चवीलाही तो जरा कमीच पडतो. [स्वानुभवाने पटलेला माझ्या भाजीवाल्या मित्राचा सल्ला ]
व्वॉव.. खायला मिळालं असतं
व्वॉव.. खायला मिळालं असतं तर्रर्......च्चं....
शाकाहारी माशाच्या तुकड्या>>
भाउ तुमची टिप अगदी बरोबर आहे.
भाउ तुमची टिप अगदी बरोबर आहे. तांबुस सुरण खाजतो जास्त.
जागु, अगं सुरण भाजीत येतो
जागु, अगं सुरण भाजीत येतो म्हणुन तो उपवासाला नाहि चालत. आंम्हिदेखिल माशे भाजतो तसेच तळुन खातो.. अन याची भाजी तर खुप छान होते वाटण घालुन.
भावना अग एरिया वाईज तिथल्या
भावना अग एरिया वाईज तिथल्या प्रथा असतात. ज्यांना जे सोईस्कर असत ती प्रथा पडते. आमच्याइथे सुरण कंदमुळ म्हणून उपवासाला खातात. मुगही खातात आषाढीच्या दिवशी कारण ते हलके असतात म्हणून मला वाटत विदर्भात भेंडे खातात उपवासाला.
मामी- शाकाहारी मासे भाऊ-फार
मामी- शाकाहारी मासे
भाऊ-फार उपयोगी टिप
जागू.. मस्त गं.. आम्ही इन्दौरला असेच तळलेले गराडू खाल्ले होते.. मस्त लागत होते त्यावर लाल तिखट,अमचूर्,चाटमसाला भुरभुरले होते..