पैज/सार्वमत/सर्वेक्षण

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

खालीलपैकी कुठले शीर्षक उद्या 'सकाळी' दिसेल ?
१. पुणेकरांना पावसाचा सुखद दिलासा
२. पर्जन्यराजाचे/वळीवाचे पुण्यात (गडगडाटी) आगमन
३. मॉन्सून/वळीव पुण्यात दाखल
त्या बातमीत खालीलपैकी कुठले छायाचित्र असेल ?
१. संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची धावपळ झाली आणि त्यांना मिळेल त्या छपराखाली 'असा' आसरा घ्यावा लागला.
२. कालच्या मुसळधार पावसाने रस्ते चिंब ओले झाले आणि जागोजागी पाण्याची डबकी तयार झाली.
३. 'ये रे ये रे पावसा...' मुलांनी पहिल्या पावसात चिंब भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
कृपया लवकरात लवकर (पक्षी ती बातमी छापून येण्याआधी) इथे मत नोंदवा.
सर्वात जास्त जुळणारे उत्तर देणार्‍यांना बक्षीस : हार्मनी विद्यापीठाच्या 'वर्तमानपत्रातील बातमीचे शीर्षक कसे द्यावे' या अभ्यासक्रमाला विनामूल्य प्रवेश.
माध्यम प्रायोजक : कोणीही नाही.

प्रकार: 

स्लार्ट्या, दोन्ही बाबत एक नम्बरची ऑप्शन जर तो पेपर "सकाळ" असेल
जर तो लोकसत्ता वा तत्सम असेल तर ३ व २
पुढारी असेल तर २ व ३
छापुन येणारे फोटो, अर्थातच, गेल्या वर्षीच्या किन्वा त्याही आधीच्या पावसाळ्यात काढलेले असतील! Proud

ओके लिम्बू Happy खरंतर पहिल्या वाक्यातल्या 'सकाळी' या शब्दावर श्लेष अपेक्षित आहे तर जन्तेने ते लक्षात घेऊन तेवढेच उत्तर दिले तरी चालेल. Happy

  • *** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine, and probably not necessary. ***

माझं मत ३ आणि ३ ला Happy
लवकर होऊदे मॉन्सून दाखल, फार ऊन आहे सध्या Sad

आत्ताच्या पावसामुळे २ आणि १ अशी बातमी यायची शक्यता Happy

पडला का पाउस शेवटी.. वावा.. इथे पण काल वादळी वारा आणि गारांचा पाउस झाला...

३,३ दिसेल. पण नंतर इथल्या तिथल्या रस्त्यांवरील खड्डे दिसु लागतील.

"सकाळी" या शब्दावरचा श्लेष कळ्ळा नाही बुवा, जरा तूच एक्स्प्लेन करुन सान्गशील का?

लिंबू, सकाळी म्हणजे 'सकाळ'मध्ये अशा अर्थाने श्लेष Happy
काल बत्ता पाऊस (म्हणजे बत्त्यांचा नव्हे) झाला, त्यामुळे आज लगेच आली आहे बातमी - ३ आणि २,३. झाडे पडण्याचा 'अँगल' अनपेक्षीत होता आणि एकापेक्षा जास्त छायाचित्रे येण्याचाही Happy असो. तर चिन्या, पूनम(मतबदलाकडे दुर्लक्ष करून :)) यांना बक्षीस आणि सर्वांचे अभिनंदन Happy

    *** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine, and probably not necessary. ***

    धन्यवाद धन्यवाद!
    ते हार्मनी विद्यापीठ कुठेशी आलं? Proud

    शाम्बायोसिसच्या समोर बांधणार आहोत, सुरू झाले की कळवतोच Happy

      *** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine and probably not necessary. ***

      ए उत्तर बित्तर जाउ दे हा प्रश्न्न विचारण्याची तुझी आयडियाच भन्नाट आहे. लई भारी.
      ....................अज्ञात

      Happy धन्यवाद. लिंबू, लोकसत्ता आणि पुढारीबद्दलचे तुझे अंदाज बरोबर आहेत का हे तूच बघ आणि ते बरोबर असतील तर तुलाही बक्षीस Happy

        *** The opinions expressed herein are not necessarily those of my employer, not necessarily mine and probably not necessary. ***

        सकाळी सकाळी 'सकाळात' २ /२ कारण खडयात रस्ते आहेत ना! Happy
        दीपक
        "Reality is an intensely personal experience..subject to all forms of perceptual biases."

        वा वा वा!!!!!!धन्यवाद मला पारीतोषिक दिल्याबद्दल!!!!!

        हार्मनी विद्यापीठ >>> काय स्लार्टी साऊथ हार्मन ईंन्स्टीट्युट ऑफ टेक्नॉलॉजी वरुन का?

        सही आहे हे स्लर्टी. आता पुढच्या बातम्यांचे अंदाज?

        "पानशेत धरण अमुक इतके भरले"
        "अमुक भागात शेतकरी हवालदिल" ई.ई.

        तसेच, "पावसामुळे गाड्यांना उशीर, सिंहगड एक्सप्रेस कल्याण स्थानकातून परत पाठवण्यात आली" वगैरे ही Happy

        अमोल, तू म्हणतोस त्या बातम्या येतीलच आता हळूहळू. शिवाय 'लोकल बंद, उपनगरी प्रवाशांचे हाल' वगैरेसुद्धा... हे सर्व 'नेहमीचे यशस्वी' आहेत Happy
        केदार, Lol ते 'साऊथ हार्मन' मला माहिती नव्हतं Happy पुण्यातच आता अशा बर्‍याच साऊथ हार्मन आहेत अन् दिवसागणिक निघत आहेत. हार्मनी म्हणजे मला शाम्बायोसिस(ऊर्फ सिम्बायोसिस)ला कोपरखळी मारायची होती, पण साऊथ हार्मनसुद्धा चांगली आहे Happy

          ***
          असेच काही द्यावे घ्यावे
          दिला एकदा ताजा मरवा
          देता घेता त्यात मिसळला
          गंध मनातील त्याहून हिरवा
          - इंदिरा

          नवी मुंबईत मानसुन दाखल आज सकाळ पासुन रीमझीम पाऊस पड्त आहे.

          :-), अगदी, अगदी.. सकाळच्या निम्म्या अधिक बातम्या अशाच recycled असतात अशी मला खात्री आहे. वर्षानुवर्ष..सालबादाप्रामाणे यंदाही....गेल्या दहा वर्षाच्या सकाळच्या बातम्यांमधे फारसा फरक नाही...

          या वर्षी ज्या वाहिन्या पुराची जुनी छायाचित्रे किंवा चलचित्रे दाखवतील त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल असं मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सांगितल्याचं नुकतंच वाचनात आलं...
          याची खरंच काटेकोर अंमलबजावणी व्हायला हवी, तरच या वॄत्तवाहिन्या जरा तरी जबाबदारीने वागतील... बघुया काय होतंय ते...

          १ आणि १. नक्की हेच असणार......................

          उद्यासाठीच्या पैजा/मते/अंदाज यांचे स्वागत Happy

            ***
            Finagle's Third Law : In any collection of data, the figure most obviously correct, beyond all need of checking, is the mistake.

            >>> पुणे आणि परिसरात पावसाच्या सरी
            >>> पावसाने पुणेकरान्ना आनन्दाचा धक्का
            >>> पावसामुळे पुणेकरान्ची ताराम्बळ
            >>> पावसाने पुणेकरान्ना झोडपले
            सोबत, काळाशार आभाळाचा एखादा फोटो Happy

            पाऊस झाला रे आज.. उद्या ३ आणि २ वर माझी पैज Proud
            यावेळी विद्यापीठ बदला Wink
            -------------------------------------------
            Prioritize. It hurts (others) but helps (you).

            मेरा दुक्के पे दुक्का. Happy

            लोकसत्ता असेल तर सोनिया गांधी यांचा फोटो नि कुमार केतकरांचा अग्रलेख येईल की भाजप च्या कारवायांमुळे उन्हाने भाजून निघालेल्या जनतेला सोनियाच्या कृपेने दिलासा मिळाला.

            Happy Light 1

            Pages