इंदुरीतल्या मुलांनी पहाटे लवकर उठाव, पाढे म्हणावेत, श्लोक, स्तोत्र म्हणावीत. मोठ्यांना नमस्कार करावा. आई-अण्णांच ऐकाव, तसचं शाळेतल्या गुरुजी-बाईंना तर देवासमान मान द्यावा. अस साधं आणि सरळ आयुष्य चाललेल. लोकसंख्या जास्त आणि उत्पादन साधन, क्षमता कमी त्यामुळे छोट्या मोठ्या चोर्या, कधी लढाया पण व्हायच्या पण संस्कारांची पाळमुळं इतकी घट्ट होती की ही सगळी पेल्यातली वादळ ठरायची.
लहानपणापासुनच कष्टाची सवय मग तो अभ्यास असो की शेतातल काम अथवा व्यवहार. कुणी कुठेच कमी पडायच नाही.
शेजारचं उसगांव मात्र पुर्ण ऐषोआरामाच्या अधीन गेलेल. मुळातच लोकसंख्या कमी आणि प्रचंड मालमत्ता त्यामुळे सगळच आयत मिळायच. मग कष्ट कोण करेल?? तरीही पुढारलेल. जे काय नवीन असेल ते उसगावात असायच. सगळे शोध, सगळ्या अद्यावत यंत्रणा मात्र उसगावांत उदयास आलेल्या. त्यामुळे कोण अभिमान त्या उसगावच्या राजाला.
उसगांवचा राजा अमिबा हा अत्यंत धुर्त आणि चलाख राजा. कुठलेही कष्टाचे काम न करता महासत्ता तर आपणच व्हायच ही महत्वाकांक्षा उरात बाळगणारा. त्यामुळे नानाविध युक्त्या लढवुन तो इंदुरीत कायम अराजक माजवायचा प्रयत्न करायचा पण छुप्या मार्गाने. शेजार राष्ट्रांपासुन इंदुरीला होणार्या त्रासाला आळा घालण्याच्या प्रयत्नात तो इंदुरीच्या बरोबर असल्याचा आव आणायचा व त्याच शेजार राष्ट्रांना इंदुरीत दहशतवाद पसरवायला मदतही करायचा.
इंदुरी प्रगती पथाच्या मार्गावर, त्यामुळे अमिबा काळजीतच असायचा. अंगभुत हुशारी असल्याने इंदुरीचे लोक ठिकठिकाणी संधीच्या शोधात आणि जिथ जातील तिथं संधीच सोन करणारे. अर्थात या संधीच्या वाटा उसगावात पण. मग काय हळुहळु इंदुरीच्या लोकांनी तिथेही स्वत:ची छाप उमटवायला सुरवात केली. आणि कमी मोबदल्यात जास्त कामगार मिळताहेत, आपली काम होताहेत म्हणुन उसगावकर पण आनंदी आणि अधिक सुस्तावले.
हळुहळु या इंदुरीकरांची उसगावातील संख्या वाढायला लागली. त्यांच्याबरोबर त्यांची कुटुंब, त्यांचे आचार विचार, संस्कृती सगळच आयात व्हायला लागल. त्यांची संख्येने असलेली बरोबरी, तांत्रिकीकरणावरची पकड आणि आपल्या लोकांच त्यांच्यावर असलेले परावलंबत्व बघता संभाव्य धोके लक्षात यायला लागले अमिबाच्या.
कितीही झाल तरी एकाएकी या सगळ्यांना परतवुन लावण कठीण आणि अशक्य कारण त्यात उसगावचच नुकसान. अर्थात ज्यांच्यावर विसंबुन हा निर्णय घ्यावा ते तर विलासिनतेच्या आधीन झालेले. बर आपली शिक्षण पद्धतीही इतकी मजबुन नाही की लगेच पुढची पिढी तयात होऊन हे सगळ पुनः स्वतःच्या हातात घेइल.
आज जी आपली प्रतिमा आहे सर्व जगतात त्याचा पाया कुठेतरी इंदुरीच्याच लोकांनी मजबुत केलाय. पडद्यामागचे कलाकार असले तरी महत्वाचे आहेत. आपण या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याला आता खुपच उशिर झालाय. उसगावंच इंदुरीत रुपांतर होतय का काय हळुहळु?? नाही ते कधीच शक्य नाही. साम, दाम, दंड, भेद या कुठल्याही मार्गाचा आता यावर परिणाम होणार नाही कारण जे आहे ते जन्मजात आहे. रक्तात भिनलेल आहे ते अस सहजासहजी सुटणार नाही . काहीतरी विचारपुर्वक उपाय केला पाहिजे यावर.
अमिबाची विचारधारा सुरु झाली. कसं करता येइल यावर त्याने खुप विचार करुन एका प्रसन्न सकाळी सुटकेचा निश्वास टाकला. आता त्याला मार्ग सापडला होता. थोडसं नुकसान सहन करुन पुनः महासत्तेच्या मार्गावर जाण्यासाठी हा एकच उपाय त्याला सद्य परिस्थितीत योग्य वाटला.
जे आहे ते तर आपण बदलू शकत नाही पण जे येणार आहे ते तर आपल्याला हवं तस आपण बदलू शकतो. फक्त थोडा प्रयत्न आणि मानसिकतेच खच्चीकरण गरजेच होत. आणि अमिबासाठी हे काही अवघड काम नव्हत अर्थात या कामात त्याला इंदुरीतलेच लोक मदत करणार याची त्याला खात्री होती. कसं असत ना तांदळाबरोबर खडे, नदीतल्या पाण्याबरोबर वाळु, चांगल्या बरोबर वाईट आणि संस्कारांबरोबर संस्कृतीची कुचेष्टा करणारेही समकालीनच असतात. आणि असेच खडे तो वापरणार होता अगदी नकळत त्यांच्याही.
जागतीकरणाचे वारे वहायला लागले. जस इंदुरीतले संस्कार, हुशार लोक उसगावात गेले तस तिथली संस्कृतीही हळुहळु अंगिकारु लागले. एखाद्याचा सहवास माणसाला हळुहळु त्याच्यासारखच बनवतो. मग कपड्यांबरोबर खाद्यपदार्थ, तिथली बोली भाषा हळुहळु इंदुरीत प्रवेश करती झाली.
हे बदल सुरवातीला सगळ्यांना हवेहवेसे वाटले. थालिपीठ, उपम्याची जागा बर्गर नुडल्स ने घेतली. नारळपाण्याऐवजी ठिकठिकाणी पेप्सी, कोक अगदी खेडोपाड्यात मिळायला लागले. गमतीची गोष्ट म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी कोसो दूर जाणार्यांना पेप्सीच्या बाटल्या मात्र वाण्याच्या दुकानात मिळायला लागल्या.
जागतीकरणात आम्हीही काही मागे नाहीत हे दाखवण्याची चढाओढच लागली जणू. खाण्याबरोबर पिणही आलं आणि पेयपानाबरोबर अपेयपानसुद्धा. मॉडर्न होण्याच्या नादात आपली संस्कृती म्हणजे अडाणीपणा वाटायला लागला इंदुरीकरांना. नाविन्याच्या झालेल्या मार्यापुढे आपण आजवर जे केल ते सगळ मुर्खपणाच वाटायला लागल. वडिलधार्यांसमोर मानही वर न करणारे बरोबरीने पार्ट्या करायला लागले. सगळे या बदलाच्या इतके अधीन झाले की, आपण आपलच नुकसान करतोय हे त्यांच्या गावीही नव्हत.
काही वर्षापुर्वीच शांत, सुसंस्कृत इंदुरी आता हळुहळु उसगावच्या मार्गावर जायला लागल. नाही म्हणायला बोटावर मोजण्याइतपत लोकांना हे कळतही होत, ते प्रयत्नही करत होते हे सगळ टिकवायचा. पण हा ग्लोबलायजेशनचा परिणाम इतका खोलवर होता की या तुटपुंज्या लोकांचा आवाज आतल्याआतच जिरवला जात होता.
राहणीमान, विचार करण्याची पद्धती हळुहळु उसगांवकरांसारखी व्हायला लागली इंदुरीतल्या लोकांची. कमी कष्टात भरपूर पैसे कमवण्याचे मार्ग त्यांना सुचायला लागले. बुद्धीचा वापर नको त्या ठिकाणी व्हायला लागला. आणि आपण आता तू आणि मी झाले. स्वतःपुरत बघायची सवय लागली हळुहळु सगळ्यांना.
दहावी- बारावी झालेल्याला कॉलसेंटरमधे १५-२०हजार पगार मिळाल्यावर कोण कशाला पुढचं शिक्षण घेणार?? आणि इथच सगळ चुकल. इंदुरीतल्या तरुण पिढीवर पुर्ण उसगांव संस्कृतीचा अंमल झाला. नवीन काय करण्याची, शिकण्याची उमेदच हरवुन बसली.
आणि इकडे अमिबा खळखळुन हसला. त्याला अभिप्रेत असलेलं सगळ होत होतं हळुहळु. आता फक्त एकच काम हा तरुण वर्ग तर झाला आता पुढची पिढी. तिला उठताच यायला नको म्हणुन तो शेवटचा डाव टाकणार होता.
इंदुरीतली शिक्षण पद्धती, अतिषय उत्तम. परवचे, पाढे अगदी घोकुन पाठ करुन घेतलेले. मास्तरांच्या छड्या खाऊन विषय समजुन शिकलेला. गणितात अंगभुत हुशारीला पाठांतराची जोड म्हणुन तर कॉम्प्युटर प्रोग्रमिंगसारखे विषय चुटकीसरशी सोडवणारी इंदुरीतली मंडळी. मेंदुत खोलवर रुजवलेल अस सहजासहजी जाणार नव्हत मग पुढच्या पिढीला हे मिळुच दिल नाही तर अमिबाचा धुर्त मेंदू विचार कर्ता झाला.
ग्लोबलायझेशनच्या जमान्यात या जुनाट शिक्षण पद्धतीला कोण विचारतय??? आता इंदुरीत वयाच्या १२ वर्षापर्यंत परिक्षाच होत नाहीत. फक्त निरथक प्रोजेक्टच मुलांच्या डोक्याला लावुन दिलेले आणि मुलांनी गुगलुन माहिती गोळा करुन पुर्ण केलेले. ५० मधल्या ४० जणांचे प्रोजेक्टस सारखेच असतात कारण गुगल सगळ्यांच एकच जरी मेंदू वेगवेगळा असला तरी, तरीही क्रियेटीव म्हणतात टीचर त्यांना.
परिक्षाच नाही म्हणुन अभ्यासाची काळजी नाही. विचार करण्याची, पाठातंराची गरज नाही. साधी साधी गणित सोडवायला कॅल्क्युलेटर आहे समोर मग कशाला पाढे पाठ करायचे. सगळ आयत मिळतय म्हणल्यावर मग कशाला मुले विचार करताहेत? घरातले आईबाबाच भांडतात, उद्धार करतात आजी आजोबांचा मग ही मुल कशाला मान ठेवतील? आई/मम्मी दोन मिनिटात नुडल्स देते तर बाबा/डॅडी लेज, नगेटची पॅकेट्स देतो मागायच्या आधी.
घरात दिवा लावायला कुणीच नसत मग कशाला शुभंकरोती आणि सकाळी उठवायला आईला वेळच नसतो मग कोण करेल पुजा??
इकडे अमिबाला हव ते साध्य झाल्याने तो आनंदी आणि त्याची आउटसाईड रिसोर्सिंग बंद केल्याची घोषणा ऐकुन परतलेले इंदुरीतल्या लोकांचे लोंढे. आता इथं उसगावाप्रमाणे सगळ मिळत बर्गर, पिझ्झा, मुलांच्या शाळा, पण स्थिरता नाही आणि उसगावाइतका पगार नाही.
इकडे उसगावात मेरी तिच्या जॉर्जला पहाटे लवकर उठवते पाढे म्हणायला लावते. जीजसची प्रार्थना करायला आणि मोठ्यांना रिस्पेक्ट द्यायला लावते.
टीप - पुर्ण काल्पनिक
इंदूरी आणि उसगाव मधलं चित्रण
इंदूरी आणि उसगाव मधलं चित्रण छान जमलयं. पण त्याला जबाबदार अशी कारणे सर्व एकांगी वाटली. असं कित्येक देशात घडतयं. असोत. प्रयत्न चांगला आहे. फक्त सर्व बाजूंनी विचार करायला हवा. कारणे शोधताना प्रत्येक घटक समान पद्धतीने हाताळले गेले पाहीजे.
खड्डे इथेही आहेत अन तिथेही .. वेळ असेल तर खड्डे बुजवत चला किंवा मागल्याला पुढे खड्डा आहे एवढं सांगायला जमलं तरी रस्ता आणि ऐम टिकवून ठेवता येईल.
१९७७ मधे मोरारजींनी कोक ( या
१९७७ मधे मोरारजींनी कोक ( या बरोबर आयबी एम , सीमेन्स अन अशा इतर एम एन सी ) ला हाकलेपर्यंत कोक खेड्यापाड्यात सुद्धा मिळत होता . तेंव्हा ओबामा बहुतेक शाळेत असतील.
१९९० च्यापुढे ( बहुतेक राजीव गांधींच्या कारकिर्दीत ) कोक , पेप्सी अन इतर ब्रँड परत आले. त्यावेळेस ओबामा लॉ स्कूल मधे असतील. तेंव्हापासून हे त्यांचं कारस्थान चालू आहे का ?
तेच ते आणि तेच ते, कंटाळा आला
तेच ते आणि तेच ते, कंटाळा आला हो!
प्रचंड एकांगी लेख. इंदुरीतली उत्तम शिक्षण पद्धती, उसगावात कमी कष्टात जास्त पैसे मिळतात वगैरे मुद्दे तर प्रचंड विनोदी आहेत.
इंदुरीत फक्त शहरी-मध्यमवर्गियच राहतात का?
रिमोट कंट्रोल किंवा
रिमोट कंट्रोल किंवा हायकमांडने लादलेले हे नेतृत्व नव्हे. पक्षांतर्गत निवडणूक लोकशाही पद्धतीने जिंकून त्यांनी उमेदवारी मिळवली होती. घराणेशाही म्हणून नव्हे. >> मस्तच
अगदीच बाळबोध! याला रुपक
अगदीच बाळबोध!
याला रुपक म्हणता येणार नाही
स्वाती २,नितिन आणि आगाऊ यांच्या पोष्टी पटल्या
.भारत आणि अमेरिका असं सरळ लिहूनही काहीच फरक पडला नसता.
तुम्ही यापेक्षा नक्कीच छान लिहू शकता.
पु.ले.शु.
अगदीच बाळबोध! याला रुपक
अगदीच बाळबोध!
याला रुपक म्हणता येणार नाही >>>> अनुमोदन. रुपक कसे वापरायचे त्याचा थोडा अभ्यास करायला हवा.
Pages